DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE Profile picture
Official Twitter account of District Information Office, PUNE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra.
Jul 13, 2020 10 tweets 3 min read
पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार
#व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा
#पुणे दि.13: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,
Jun 1, 2020 10 tweets 2 min read
#मिशन_बिगीन_अगेन" बाबत अधिसूचना जाहीर - जिल्हाधिकारी नवल किशोर राम #पुणे,दि. 1: @RajSarag
कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालिन उपाय योजनेचा भाग म्हणून राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्याक्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी  "मिशन बिगीन अगेन" बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे, असे  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
May 19, 2020 35 tweets 6 min read
#लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी
● राज्यात आता फक्त दोन झोन
● रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथिल @RajSarag
मुंबई, दि. १९: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर
May 11, 2020 12 tweets 3 min read
#पुणे जिल्हयात प्रवेश करणा-या नागरिकांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य -जिल्हाधिकारी राम @Collectorpune1 @RajSarag
पुणे दि.11 :- सद्यस्थितीत लॉकडाऊन मुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ
May 9, 2020 8 tweets 2 min read
#लाॅकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा #कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही- अनिल परब
#मुंबई : दि.९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शतीॆच्या अधिन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून
देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाॅकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
May 6, 2020 8 tweets 3 min read
#पुणे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम @collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneCityPolice @puneruralpolice @pcmcindiagovin
पुणे दि.6 :पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास,ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये
May 3, 2020 15 tweets 3 min read
#मुंबई, #पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी मुंबई - मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
@RajSarag @collectorpune1
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित
May 2, 2020 53 tweets 9 min read
#लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी @collectorpune1 @pcmcindiagovin
@PuneCityPolice @puneruralpolice @RajSarag
@PMCPune मुंबई, दि. २ : राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम
May 2, 2020 5 tweets 2 min read
#मुंबई आणि #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
@RajSarag @collectorpune1
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.
2️⃣ असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या
Apr 30, 2020 7 tweets 5 min read
#लॉकडाऊन मुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन #FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona
#SanitationWarriors #Awarenessofcoronavirus
@collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneZp @gsfunde1985 @suhassatwadhar @IamSPRathod कामगारांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित रहावे. #कुठल्याही अफवांना बळी पडू नका #जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी #पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी
Apr 25, 2020 10 tweets 4 min read
खाजगी रुग्णालय, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे -#उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार @RajSarag
@collectorpune1 #पुणे,दि. 25-पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालय ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथ पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन करण्याचेआदेश दिले होते.आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक
Apr 11, 2020 23 tweets 6 min read
व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित_
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी_गृहमंत्री अनिल देशमुख
#FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona
#SanitationWarriors #Awarenessofcoronavirus
@collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneZp @gsfunde1985
#मुंबई - सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व
Mar 15, 2020 11 tweets 3 min read
प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित भावनेने काम करावे-
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
#पुणे - #कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.कोरोना संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत विधानभवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,