My Authors
Read all threads
टेक्निकल विश्लेषण Candlestick Pattern

या आधीच्या धाग्यात आपण candle बद्दल माहिती घेतली परंतु तिचे प्रकार किती व कोणते ते आज आपण पाहणार आहोत.

Candlestick chart मध्ये शेअर किमतीच्या Open, High, Low, close या ४ गोष्टी अंतर्भूत असतात. म्हणजे कोणतीही candle आपणास 👇
या महत्त्वाच्या ४ बाबी स्पष्ट करते. म्हणूनच हा चार्ट सामान्यतः बहुतांश लोक वापरतात. खालील आकृती मध्ये आपणास candle चे मुख्य दोन प्रकार आहेत जे आपण या आधी पाहिले होते.👇
आपण आता याचे प्रकार पाहणार आहोत. Candle चे खूप प्रकार आहेत जसे की, Single candle patterns, Double candle patterns, Reversal Patterns, Continuation Patterns.

आपण यातले काही महत्वाचे candle patterns पाहणार आहोत व या सर्व candles पाहून दिवसभरातील खरेदी विक्री बदल जाणून घेऊ.👇
१. Short bull candle (Green)

या केंडल मध्ये बाजार चालू झाल्यानंतर विक्री सुरू झाली परंतु जसे मागणीचे प्रमाण वाढले तसं तसे बाजार पुन्हा Open किमतीच्या वर आला. परंतु दिवसभरात बाजारात खूप जास्त पडझड न होता बाजारभाव एक High देऊन पुन्हा थोडा खाली येऊन बंद झाला. परंतु 👇
मागील धाग्यात आपण पाहिले की जर ओपन किमतीच्या वर जाऊन बंद होत असेल तर ती कँडल Bullish असते. म्हणजेच दिवस भरात बाजारात छोट्या प्रमाणात मागणी होती आणि ती बंद होते वेळेस ही कायम राहिली.

Short bull candle दर्शवते - बाजारात कमी व्यवहार झाला असला तरी दिवस भरात खरेदी झाली आहे.👇
Short red candle दर्शवते - बाजारात कमी व्यवहार झाला असून विक्री झालेली दिसते.

२. Marubozu candle

या कँडल मध्ये दिवसभरातील खरेदी आणि विक्रीचा अंदाज लगेच समजून घेता येतो. जसे की जर केंडल Bullish Marubozu असेल तर तिचा Open आणि Low सारखा असेल आणि High आणि Close सारखा असेल. 👇
म्हणजे ज्या भावात मार्केट खुले झाले तेथून मार्केट वरच्या दिशेने वाटचाल करत राहिले ते शेवटच्या मिनिटाला ही High वर बंद झाले. म्हणजे पूर्ण दिवस भरात मार्केट मध्ये खरेदी झाली. म्हणजेच आजच्या दिवशी बाजारात मागणीचे प्रमाण इतके होते की दिवस भर भाव चडता राहीला. या उलट जर Bearish 👇
Marubozu असेल तर आपण म्हणू की बाजारात मागणीचे प्रमाण खूपच कमी असल्याने की बाजार खुले झाल्या पासून बंद होई पर्यंत भाव पडत राहीला.

Bull Marubozu दर्शवते - दिवसभरात मागणी चे प्रमाण खूपच उत्साहवर्धक होते. दिवसभर बाजारात खरेदी झालेली आहे.👇
Bear Marubozu दर्शवते - दिवसभरात विक्री झालेली असून बाजारात खरेदीदार खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. दिवसभर बाजारात विक्री झाली आहे.

३. Doji

हा केंडल च प्रकार सर्रास आपणास चार्ट वर पहावयास मिळतो. ज्या मध्ये बाजार खुला झाल्यानंतर तेजी आणि मंदी दोन्ही सम समान संधी साधतात. 👇
बाजारातील भाव हा जरी Open किमतीच्या जवळ पास Close होत असला तरी दिवसभरात बाजार वर आणि खाली दोन्ही दिशेस जाऊन आलेले असते. याचा अर्थ बाजारातील खरिदीदार आणि विक्रिदार या दोघांतील स्पर्धेत दोन्ही ही समान ताकदीचे होते. आणि त्याच मुळे बाजार दिवस भर व्यवहार 👇
करून ही पुन्हा जिथे खुले झाले होते तेथेच बंद होते.

Doji दर्शवते - बाजारात मागणी पुरवठा सम प्रमाणात होता. बाजार सध्या कोणत्या ही एका बाजूस जाण्यास तयार नाही. बाजारात एका क्षणी कोणताही निर्णय घेता येत नाही.👇
४. Hammer

या कँडल ला त्याच्या दिसण्यावरून नाव देण्यात आले असले तरी या दिवसभरात बाजार एका हातोडी प्रमाणे काम करते. म्हणजेच बाजार ओपन झाल्यानंतर Selling pressure मुळे खाली पडते तर खाली मागणीत वाढ झाली की खरेदीदार पुन्हा बाजारभाव वर ठोकतात व बाजार पुन्हा खुल्या झालेल्या किमती 👇
जवळ येऊन बंद होतो. या मध्ये बाजारातील मागणीचा अंदाज येतो. तर या उलट Inverted Hammer या प्रकारात बाजारातील पुरावठा मागणीपेक्षा जास्त होऊन शेअर भाव वरून खाली ठोकला जातो.

Hammer दर्शवते- बाजारातील पडलेल्या किमती नंतर बाजारात मागणी वाढलेली आहे. 👇
Inverted Hammer दर्शवते - बाजारातील वाढलेल्या किमती नंतर बाजारात पुन्हा पुरवठा वाढलेला आहे.👇
हे काही महत्वाचे Single candlestick Patterns आज आपण पाहिले तर उद्या आपण महत्वाचे Double Candlestick Patterns पाहू. या आधीचे धागे वाचण्यासाठी ब्लॉगला भेट देऊ शकता. anrpstock.wordpress.com
@manju77077 @ShamalShingte @anu_bundhe @Annu_kadle @nastik_Shubham @ashaysant @MiBhandarkar
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Amolz(@🏠)

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!