बर्वे यांनी आपल्या कारकीर्दीत कोल्हापूर संस्थानात उच्च पदापासून शिपाई पर्यंत ब्राम्हण लोकांची नियुक्ती केली.
शिकलेल्या लोकांत ब्राम्हण सुमारे ८०% होते. आणि राहिलेल्या २०% मध्ये मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम इत्यादी लोक होते.
शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी एक ऐतिहासिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
‘सध्या कोल्हापूर संस्थानमध्ये सर्व वर्णांच्या प्रजेस शिक्षण देण्याबद्दल व त्यास उत्तेजन देण्याबद्दल प्रयत्न केले आहेत. परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीत सदरहू प्रयत्नांस जितके यावे तितके यश आले नाही‚
क्रमशः
१. Rajarshi Shahu Chhatrapati Papers.
२. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ.
३. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा (डॉ.जयसिंगराव पवार)