My Authors
Read all threads
"छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील नाते"
आवर्जून वाचण्यासारखे..👇🏻
प्रबोधनकार ठाकरे खूप दिवसापासून आजारी असल्याची बातमी शाहू महाराजांना समजते तेव्हा शाहू महाराज आपल्या श्रीपतराव या कार्यकर्त्यांकडून पाच हजार रुपयाचा चेक मदत पाठवतात, ती मदत पाहताच ‘‘पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवे बनविली आहेत’’असे महाराज एका भेटीत म्हणाल्याचे त्यांना आठवते
आणि त्यांनी तो चेक घेण्यास नकार दिला. तेव्हा श्रीपतराव म्हणाले‚ ‘‘हे पाहा केशवराव‚ छत्रपतींचा प्रसाद आहे हा. नकार देणे बरे नव्हे.’’ तेव्हा प्रबोधनकारांनी ताडकन उत्तर दिले‚
‘‘असला प्रसाद छत्रपतीनेच काय प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने दिला तरी थुंकतो मी त्यावर; जा घेऊन. असल्या रकमा महाराज अशा कामी उधळत असतील तर त्यांच्याविषयी माझा आदरही ओहोटीला लागला‚ असे सांगा जाऊन त्यांना.’’
शाहू महाराजांना खरोखरच प्रबोधनकारांना मनापासून मदत करायची असावी अगर त्यांना त्यांची सत्त्वपरीक्षा घ्यायची असावी. हेतू काही का असेना; पण या प्रसंगी प्रबोधनकारांनी जो नि:स्पृहपणा व धाडस दाखविले त्यावर महाराज मनापासून खुश झाले.
जेव्हा महाराज मुंबईस आले‚ तेव्हा त्यांनी प्रबोधनकारांना भेटीस बोलावले. त्यांना पाहताच महाराज म्हणाले‚
‘‘काय रे वांड‚ लयी गुर्मी आली व्हय? आमच्या चेकवर म्हणे थुंकतोस?’’ त्यावर प्रबोधनकार म्हणाले −
‘‘महाराज गुर्मी कशाची? रागावू नका.आजवर मी आपली किंवा दरबारची काय अशी मोठी सेवा चाकरी केली की त्यासाठी आपण अयाचित पाच हजारांचा चेक मला द्यावा? तशीच ठळक कामगिरी होईल माझ्या हातून तेव्हाचा प्रश्न न्यारा. माफ करा सरकार‚पैशाच्या जोरावर गाढव बनणारा माणूस मी नव्हे.’'
यावर महाराज चांगलेच चमकले;

त्यावेळी शिक्षकाचा पगार दहा रुपये होता यावरून अंदाज लावता येईल ही रक्कम किती मोठी होती.
याच भेटीत प्रबोधनकारांनी आपण ‘भिक्षुकशाहीचे बंड‘ या विषयावर लेखन करत आहोत‚ असे सांगितल्यावर महाराजांनी त्यांना त्या विषयावरील संदर्भग्रंथांची नावे विचारली. ती त्यांनी सांगितली. त्या वेळी त्यांच्यात झालेला संवाद असा -
महाराज : सॅव्हेलचा प्रीस्ट्क्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ? वा वा‚ तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाहीसुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे.

प्रबोधनकार : मग आपणही त्या कक्षेत सापडता?
महाराज : सापडणारच. सध्याच्या राजेशाह्या काय अमरपट्टा घेऊन आल्या आहेत वाटतं? आजच आम्ही ब्रिटिशांच्या कृपेच्या धाग्यावर लोंबकळलेले आहोत. आज ना उद्या हा धागा तुटणारच. बरं ते असो. हे पाहा‚ अमेरिकेतील ‘आर.पी.ए.सीरिज’ची पुस्तके चांगली अभ्यास कर.
‘इंगरसॉल्स रायटिंग्ज अॅण्ड स्पीचेस’ तर नेहमीच. अभ्यासात असली पाहिजेत. इंगरसॉल वाचल्याशिवाय समाजसुधारणेची भाषा कोणी बोलू नये.’’ प्रबोधनकार पुढे सांगतात‚ ‘‘अशा कितीतरी संदर्भग्रंथांची नावे महाराज भडाभड सुचवित होते आणि कशात काय विषय आहे‚ यावर जिव्हाळ्याने प्रवचन करीत होते.
या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. फार काय; पण कित्येक पुस्तकांतले काही महत्त्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखविले. वरवर पाहणारांना महाराज अडाणी नि हेंगाडे वाटले‚ तरी अंतरंगाचा‚ मुख्यत्वे त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा‚
मागमूस इतरेजनांना सहसा लागतच नसे. आज तो मला लागला नि मी अगदी चाट पडलो. जवळजवळ अर्धा तास ते सारखे तन्मयतेने बोलत होते नि मी तितकाच तन्मय होऊन ऐकत होतो.’’
महाराजांनी सुचविलेल्या ग्रंथांपैकी एकही ग्रंथ प्रबोधनकारांकडे नव्हता. तेव्हा महाराजांनी लगेच मुंबईतील बुक सेलर्सकडून हवी तेवढी पुस्तके खरेदी करून त्यांचे बिल दरबारकडे पाठवून देण्याचा हुकूम केला.
एवढेच नव्हे‚ तर भिक्षुकशाहीच्या बंडाच्या दोन हजार प्रती आगाऊ खरेदी करून त्यांचा पाच हजारांचा चेक प्रबोधनकारांच्या हाती दिला आणि ते म्हणाले‚ ‘‘आता नाक मुरडशील तर ते इथेच छाटले जाईल. मग पुढचं पुढं.’’

क्रमशः
संदर्भ :-
१. कित्ता‚ पृ. २०० ते पृ. 203
२. राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!