My Authors
Read all threads
छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गाजलेले "डांबर प्रकरण" 👇

चित्र साभार :
चित्रकार - विजय चोकारकार | राजर्षी : उमेश सुर्यवंशी.
१४ फेब्रुवारी १९१४च्या रात्री उशिरा बादशहा सातवे एडवर्ड व महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्यास कोणीतरी डांबर फासल्याचे पहाटे पहाटे निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुढे हिंदुस्थान सरकारने रामकृष्ण हणमंत पागे या गुप्तचर अधिकाऱ्यास कोल्हापुरात पाठविले.
निश्चित पुरावा मिळाला नसल्याने कोल्हापूर येथील जैन बोर्डिंगमधील कोणातरी विद्यार्थ्याने हे राजद्रोही कृत्य केले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. लठ्ठे हे पूर्वी अनेक वर्षे याच बोर्डिंगचे अधीक्षक होते. तेव्हा लठ्ठे यांच्या चिथावणीने दोन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले‚
अशा तऱ्हेचा खोटा पुरावा तयार केला गेला. हेतू हा की‚ त्यामुळे लठ्ठे अडचणीत यावेत. कल्लाप्पाण्णा निटवे या जैन पंडिताने या कृष्णकृत्यास बराच हातभार लावला होता.डांबराचा डबा‚ त्याची पावती व इतर बनावट पुरावे तयार करून या कंपूने हे सर्व साहित्य लठ्ठ्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून
दिले. सर सबनिसांना हे कळताच त्यांनी लठ्ठ्यांना सावध केले. लगेच लठ्ठे हे सर्व आक्षेपार्ह सामान घेऊन तत्कालीन रेसिडेन्ट कर्नल वुडहाउस यांच्या बंगल्यावर गेले. ‘‘सद्य:परिस्थितीत तुम्ही कोल्हापूर सोडलेले बरे’’ असा त्यांनी लठ्ठ्यांना सल्ला दिला.
मालगाडीने लठ्ठे मिरजेस गेले व तेथून त्यांनी पुढे बेळगाव गाठले. त्यांच्यावर केस झाली. त्यातून ते निर्दाेष सुटले. पुढे ते एलएल.बी. झाले व त्यांनी बेळगावला वकिली सुरू केली.
या प्रकरणामुळे पुढे शाहू महाराज हयात असेपर्यंत लठ्ठ्यांनी कोल्हापुरात पाऊल ठेवले नाही‚ असे य.दि. फडके लिहितात.
भाऊराव कोरेगावला असताना त्यांना आपले पाहुणे निटवे यांचे पत्र भेटले. निटवेनी भाऊरावांनी तातडीने कोल्हापुरात यावे असे लिहिले होते. तेव्हा भाऊराव कोरेगावाहून त्यांच्याकडे कोल्हापुरास गेले.
जेवण झाल्यावर निटव्यांनी भाऊरावांना आपला बेत सांगितला‚ ‘‘ब्रिटिश राजा-राणींच्या पुतळ्यावर कोणीतरी डांबर टाकले आहे. हे दुष्ट कृत्य लठ्ठ्यांनी करविले आहे‚ अशी तू साक्ष दे म्हणजे झाले.’’
भाऊराव म्हणाले‚ ‘‘मी खोटी साक्ष कदापि देणार नाही.’’ ‘‘अरे‚ लठ्ठ्यांनी तुला जैन बोर्डिंमधून हाकलून दिले होते ना?
(भाऊराव दलित वस्तीगृहाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात हजर राहिले होते तेथून ते आपल्या जैन वसतिगृहात आल्यानंतर त्यांना लठ्ठे यांनी अंघोळ करण्याचे सांगितले पण भाऊरावांनी ते नाकारल्यामुळे त्यांना जेवण दिले नाही.
त्यानंतर भाऊरावांनी खिडकीचे गज तोडून भोजन गृहात प्रवेश केल्याने लठ्ठे यांनी जैन वसतिगृहातील भाऊरावांना काढून टाकले होते)

त्यांच्यावर सूड उगविण्याची ही नामी संधी तुला मिळाली आहे. तशी साक्ष देऊन तू मोकळा हो.’’
यावरून भाऊराव म्हणाले‚ ‘‘लठ्ठ्यांनी मला बोर्डिंगमधून काढले; पण तुम्ही मला आयुष्यातून उठवू पाहत आहात. मी मेलो तरीही लठ्ठ्यांच्या विरोधी साक्ष देणार नाही...’’
भाऊराव झोपी गेल्यावर निटव्यांनी आपल्या प्रेसमधील कागदाच्या गठ्ठ्यांवर रॉकेल ओतून त्यांना आग लावली व पोलिसांना बोलावून हा आमच्या पाहुण्यांचा मुलगा रात्री माझ्याकडे आला होता. त्यानेच ही आग लावली‚ अशी खोटी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी भाऊरावांना अटक केली.
तेथून पुढे सहा महिने भाऊरावांचा पोलिसांनी अतोनात छळ केला. ‘‘अजून लठ्ठ्यांविरुद्ध साक्ष दे. आम्ही तुला सोडतो’’ असे डी.एस.पी.डी.सी. फर्नांडिस म्हणत होता; पण भाऊराव त्यालाही नमले नाहीत.
मग कावळा नाक्यावर डी.एस.पी.चे ऑफिस होते. तेथे रोज सकाळी भाऊरावांना घेऊन जात व त्यांच्यावर थर्ड डिग्रीचे अत्याचार करीत.
त्यांना जमिनीवर पसरलेल्या हरभऱ्यावर उघडे करून झोपवीत व अंगावर मुसळ ठेवून चार-पाच पोलीस त्या मुसळावर बसून भाऊरावांचे अंग चिरडून टाकीत. यालाच ‘लाटणे’ म्हणतात. कधीकधी अर्धनग्न स्थितीत उभे करून ढुंगणावर चामड्याच्या पट्ट्यांनी बेशुद्ध पडेपर्यंत मारत असत.
भाऊराव पहिलवान असल्यामुळेच ते हा अत्याचार सहन करू शकत होते. एके दिवशी सकाळी पोलिसांनी भाऊरावांना प्रातर्विधीसाठी कावळा नाक्याच्या पूर्वेकडील बाजूस नेले असता भाऊरावांनी ही संधी साधून एका पडक्या विहिरीत खाली डोके वर पाय करून उडी मारली.
पण‚ विहिरीत बराच गाळ असल्यामुळे त्यामध्ये ते रुतून बसले व वाचले. पोलिसांनी भाऊरावांना वर काढले व त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करतो म्हणून दुसरा गुन्हा नोंदविला. आता त्यांची रवानगी बिंदू चौकाजवळील रविवार सबजेलमध्ये केली.
रोजची मारहाण चालूच राहिली. शेवटी‚ या त्रासाला कंटाळून भाऊरावांनी तुरुंगातील खोलीच्या खिडकीच्या तावदानाची काच फोडली. त्याचा चुरा केला व तो गिळून टाकला. वर रॉकेलच्या चिमणीतील तेलही ते प्याले; पण याही प्रकारात त्यांना काही झाले नाही. दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही आपण मरत नाही;
तेव्हा ‘आपल्या हातून काहीतरी जगावेगळे कार्य होणार‚ अशी तरुण भाऊरावांना अंधूकशी शंका चाटून गेली की नाही देव जाणो!’ नंतर काही दिवसांनी खास महाराजांकहून समजूत करून पाहावी म्हणून भाऊरावांस त्यांच्या भेटीस नेले.
भाऊरावांनी एकच उत्तर दिले‚ ‘‘या जगात जर मला आता काही आश्रयाचे व संरक्षणाचे ठिकाण उरले असे तर ते एकच - मरण - तेवढे आपण द्यावे म्हणजे झाले. मला जास्त बोलण्याची इच्छा नाही.’’ (प्रबोधन- ऑगस्ट‚ १९२९)
भाऊरावांचे वडील पायगोंडा पाटील हे इंग्रज सरकारच्या नोकरीत होते. त्यांनी सातारचे कलेक्टर ब्रँडोन व कोल्हापूरचे रेसिडेन्ट कर्नल वुडहाउस यांच्याकडे आपला मुलगा निरपराध आहे व त्याची कोल्हापूरच्या तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून अर्ज केला होता. त्यामुळे ही अपील भाऊरावांनी जिंकली.
डांबर प्रकरणात लठ्ठे व भाऊराव या दोघांना गुंतवण्याचा दुर्दैवी प्रकार काही विशिष्ट राजकीय कारणांमुळे घडला हे महाराजांना नंतर उमगले असणार‚ यात शंका नाही. कालांतराने महाराजांनी लठ्ठे यांची लेखी माफी मागितली. महाराजांनी लठ्ठ्याना पाठविलेल्या माफीपत्रात
सोवनी‚करमरकर‚म्हैसकर‚चिप्रीकर पाटील‚कल्लाप्पा निटवे यांनी आपली दिशाभूल केल्याचे स्पष्ट कबूल केले आहे.

क्रमशः

संदर्भ:
१. राजर्षी शाहू,कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे. (डॉ.जयसिंगराव पवार).

(सूचना- बराच भाग प्रबोधन याच हेतूने कॉपी पेस्ट केला आहे तरी क्षमा असावी 🙏 )
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!