आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी माझे योगगुरू प. प.श्री.जनार्दन स्वामी यांचा व त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पू. स्वामीजी हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठी या गावचे!
"शारीरिक व मानसिक आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत" असे ते म्हणत.त्यांनी योग प्रचार व प्रसारासाठी भारतभर भ्रमण केले.ते शाळांमधून योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवत, विद्यार्थ्यांना योगाभ्यासासाठी प्रेरित करत.
१९५१ मध्ये ते नागपुरात आले व पुढे येथे "योगाभ्यासी मंडळ" ही संस्था स्थापन
रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंघचालक पू.श्री. गोळवलकर गुरुजींशी त्यांचा दीर्घकाळचा घनिष्ठ परिचय होता. स्वामीजींनी योग प्रसारार्थ लिहिलेल्या बऱ्याचशा पुस्तकांना श्रीगुरुजीचेच "पुरस्कार" लेख आहेत.
आज भारतभर रा.स्व. संघाच्या शाखा व संघशिक्षा वर्गांमध्ये जो आसनांचा अभ्यासक्रम
स्वामीजींच्या कार्याची दोन ठळक वैशिष्ट्ये -
१) निःशुल्क योगिक रोगोपचार
२) स्त्रियांसाठी योगासन वर्ग
स्वामीजींचे योगासनांतून रोग निवारणाचे कार्य आजही "जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर" येथे अव्याहतपणे चालू आहे. आजतागायत येथून हजारो
"जीवनात सुख,समाधान व निरोगत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बुद्धिमान लोकं यथाशक्ती व निरंतर योगाभ्यास करतात!"
अधिक माहितीसाठी jsyog.org या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
संदर्भ ग्रंथ - योगमूर्ती - प्रज्ञाभारती डॉ वर्णेकर
|| हरिः ॐ||