त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न आला ,
'Who was the founder of it ?'
ठेंगडींनी डॉ. हेडगेवार हे नाव सांगितले त्यावर ते खासदारसाहेब कुत्सितपणे हसत म्हणाले ,
'I never heard his name ?'
ठेंगडी प्रचारक माणूस , शांत राहिले .
त्यावर मेनन म्हणाले '२ प्रश्नांची उत्तरे द्या पहिला पंडित नेहरू कधी वारले ?'
' मे १९६४'
'अहो ते विश्वनेते होते , नासेर टिटो यांच्या सोबतचे होते.'
मग मेनन ठेंगडींकडे वळले आणि म्हणाले ,
'आपले डॉक्टर कधी गेले ? आणि त्यांना किती माणसे तेव्हा ओळखायची ?'
मग आता मला सांगा ,
'डॉक्टर नेहरूंच्या २४ वर्षे आधी गेलेत आणि पंडितजी अगदी अलिकडे , पंडितजी विश्वनेता तर डॉक्टरसाहेब केवळ मध्य प्रांतात परिचित,
चर्चा बदलली होती ,
मेनन तत्क्षणी उत्तरले ' The length of one's shadow on future'.☺️आवडो नावडो पण ती Shadow , ती सावली किती मोठी आहे याची जाणीव सर्वांना आहे .
त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ...
उजाळिले तू तममय जीवन
संघयुगाचा शालिवाहन ...
शत शत अभिवादन ...
🙏🏻🙏🏻🙏🏻...
🖋️- शंतनु शरद पांढरकर
( संदर्भ : कार्यकर्ता - श्री. द. बा. ठेंगडी )