My Authors
Read all threads
राजर्षी शाहू महाराज यांच्यावर झालेले कमरेखालचे वार...👇
राजर्षी शाहू महाराजांना ब्रिटिश साम्राज्य सत्तेशी राजनैतिक संबंध ठेवणे गरजेचे होते. आणि एक हिंदी मांडलिक संस्थानिक म्हणून राजनैतिक कर्त्यव्यही होते. रयतेचे भले हाच त्यामागील हेतू होता. याचे भान आजही ठेवणे गरजेचे आहे.
आजच्या राजकारणात विरोधकांकडून नेहमी उठणारा मुद्दा म्हणजे काँग्रेस नेत्यांनी ब्रिटिश सरकार सोबत जवळीक केली होती.ही जवळीक विरोधकांना न पटणारी असली तरी त्यामागे राजनैतिक हेतू आणि कर्तव्य असू शकतात याचा विचार केला जात नाही.याचे भान शाहू महाराजांच्या वेळी सुद्धा नव्हते आणि आजही नाहीये
ब्रिटिश सत्ताधारी शाहू महाराजांचे मित्र होते. आणि या मैत्रीमुळेच अनेक दहशतवादी शाहू महाराजांना आपला शत्रू समजत होते. या दहशतवाद्यांचा महाराजांच्या विरूद्ध द्वेष वाढत चालला होता.
हा द्वेष इतका वाढला की, दहशतवाद्यांनी "कर्नल फेरिस" लाच नव्हे तर राजर्षी शाहू छत्रपतींना सुध्दा बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा कट रचला होता.
दामू जोशी, प्रसादे, गुळवणी इत्यादी दहशतवाद्यांनी शस्त्रासाठी पैसा गोळा करण्याच्या हेतूने करवीर राज्यात ठिकठिकाणी दरोडे घातले. चोऱ्याही केल्या.
तेव्हा आपल्या राज्यात अशा दहशतवाद्यांकडून धोक्यात येणारी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शाहूंनी अशा दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे अथवा त्यासाठी ब्रिटिश साम्राज्यसत्तेचे सहकार्य घेणे‚ एक राज्यकर्ता या नात्याने गैर ठरत नाही.
याचबरोबर आणखीन एक प्रसंग लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. तो म्हणजे वेदोक्त प्रकरणापासून दुखावलेला ब्राह्मण वर्ग बहुसंख्येने या दहशतवाद्यांमध्ये होता आणि शाहूंचे राजकीय व सामाजिक विरोधक
लो. टिळक यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
वेदोक्त प्रकरणापासून लो. टिळकांच्या सल्ल्यानुसार या ब्राह्मण वर्गाच्या शाहूविरोधी कारवाया सुरूच होत्या. याच सुमारास
(सन १९०६) कोल्हापुरातील शाहूविरोधकांनी त्यांचे चारित्र्यहनन करून त्यांना समाजातून उठविण्याचे एक दुष्ट व घृणास्पद कारस्थान रचले होते.
शाहूंनी आपल्या राजवाड्यात एका सुस्वरूप तरुणीवर बलात्कार केल्याची निनावी पत्रे या विरोधकांनी गव्हर्नर जनरलपर्यंत पाठविली होती. Hitting below the belt या पद्धतीने राजर्षी शाहूंच्या विरुद्ध त्यांच्या शत्रूंचा संघर्ष चालू होता.
करवीरमधील या मंडळींना करवीर राज्यातील ब्राह्मण जहागीरदार‚ दक्षिणेतील ब्राह्मण संस्थानिक आणि पुणे‚ वाई‚ बेळगाव इ. ठिकाणच्या ब्राह्मण बुद्धिजीवींचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता.

क्रमशः
संदर्भ :-
१. शाहू छत्रपती आणि लोकमान्य‚ पृ. १६२
२. राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!