खूप छान कथा आहे एका "माणसाची" !!!वाचाच !☺️
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून गावाच्या दिशेनं परतीला लागली. नुसती धूळ शिल्लक उरलेल्या त्या बाजारातील आया बाया सुद्धा चपला फरफटत चालू लागल्या. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. (१)
तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली. आजीनं चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. (३)
"काय पायजे आजी?" त्यानं विचारलं.
आजीला त्यातल्या त्यात बर वाटून गेलं. (४)
ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं.
आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं?
आणि गाडीत कोणी पॅसेंजर्स नाहीत. (५)
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी.''
आजीचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. (६)
गाडी हलली तसा तो ओरडलाच,
"अगे म्हातारे....."
पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. (७)
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघ. इथंच उतरायचं ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. (८)
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता !"
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं. (९)
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली.
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजून दिलंय त्येका"
"त्यांनी ते घेतलं !! अग म्हातारे, तुझं डोकं फिरलं की काय ?" (१०)
हाच तो आधी "माणूस" बनलेला लोकराजा. त्यांच्या कार्याबद्दल आणखी काही सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारस.
विनम्र अभिवादन 💐☺️
(समाप्त)