अर्थात छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह भाषा किंवा विधान करणारी ही एकच व्यक्ती नाही. साधारण वर्षे दीडवर्ष पूर्वी कुणीतरी सौरव घोषने हे केलंच होतं. (१/९)
#अग्रिमा_जोशुआ #शिवाजीमहाराज
का? कारण असं काही विधान केलं की एक समुदाय आपल्यावर चिडणार आणि अत्यंत जहाल टीका होणार.
परिणाम असा की थोडा सहिष्णू गट मग या पातळीवरची टीका चुकीची आहे अशी सहानुभूतीची भूमिका घेणार. (२/९)
#AgrimaJoshua #ShivajiMaharaj
दुसरं असं की माफी मागितल्या नंतर हे सगळे गुन्हे लख्ख धुऊन निघतात. म्हणजे प्रसिद्धी मिळाली, सहानुभूती मिळाली आणि शिवाय गुन्हा माफ.. (३/९)
बरं हे मुंबई पुण्यासारख्या महानगरात का होतं?
तर इथली स्थानिक मराठी माणसाची खरेदी करण्याची क्षमता कमी आहे. तुम्ही म्हणाल "काय संबंध??"
या सर्व इंग्रजी/हिंदी स्टँड अप कॉमेडी शो होणाऱ्या ठिकाणी मराठी माणसे किती असतात? (४/९)
मूळ मुद्दा इथं आहे की मुंबई महाराष्ट्रात राहूनही यांना इथली संस्कृती, इथली भाषा, इथल्या आदरणीय व्यक्ती यांच्याबद्दल आदर कधी वाटलाच नाही (५/९)
म्हणूनच मराठी माणसाने एकजुटीने पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणून कडक कारवाईची मागणी करायला हवी. (८/९)
गटारीत लोळणाऱ्यांना वर काढायला गेलं की आपलेच कपडे घाण होतात आणि गटारीत लोळणाऱ्यांना मात्र फुकटचा आनंद मिळतो. (९/९)
- चंदन तहसीलदार