(ही पोस्ट लिहायची तयारी साधारण तासभर केली.. भयंकर अभद्र शिव्या टाळून ही पोस्ट लिहिणे माझ्यासाठी कष्टप्रद होते म्हणून तो आवेग जरासा ओसरल्यावर हे टाईप करायला घेतलंय..)
आता भीतीने मन ग्रासायला सुरुवात झालीये.. पराकोटीचा संताप आणि उद्वेग हा हतबलतेकडे नेतोय.. ही अशी भावना +
आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) ने "ती" नको असलेली धोक्याची घंटा वाजवलीच.. कम्युनिटी ट्रान्समिशनची.. समूह संसर्गाची..
अनलॉक करण्याचा निर्णय जेवढा अपरिहार्य होता तेवढाच दुर्दैवीसुद्धा. स्थलांतराने हा प्रश्न भयंकर उग्र केलाय. +
ह्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्थेचे जे धिंडवडे, संबंधित नोकरशहा, अधिकारी, हॉस्पिटल्स, संबंधित नेते स्वतःच्या तुंबड्या भरून, काढत आहेत ते पाहता +
* पीपीई किटची किंमत किती असते? किती दाखवली जाते?
* फुफ्फुसाच्या संसर्गासाठी जे इंजेक्शन हवे असते त्याची कृत्रिम टंचाई कोणी केली? त्याची किंमत किती? ते कितीला विकले जाते +
* प्रत्येक कोरोना वॉर्ड एकच मार्गदर्शक नियमावली पाळतो?
* कोरोना वॉर्डची रोज स्वच्छता केली जाते?
* एका कोरोना वॉर्डमध्ये किती संडास बाथरूम असतात? +
असे असंख्य षंढप्रश्न उभे ठाकतात.. आणि जेंव्हा तुमच्या जवळचं कोणी ह्या दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकतं ना तेंव्हाचं ह्याचे गांभीर्य अनुभवायला येतं, अगदी जवळून..
ह्या प्रश्नांची उत्तरे +
दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असताना दिलासादायक साधी एक बातमी कानावर येत नसताना +
हे शासनाला कळत नसेल? जे सामान्य माणसाला कळतं ते +
हे शासन, संबंधित अधिकारी ह्या भयंकर तळतळाटाचे धनी होत आहेत.
पण आता मला हळूहळू भीती ग्रासू लागलीये हे खरं
- चेतन दीक्षित