एका सामाजिक कार्यकर्त्याची, सुधारकाची खुलेआम रस्त्यावर हत्या होते आणि सात वर्षं लोटूनही महाराष्ट्र त्याचा मारेकरी पकडू शकत नाही, त्याच्या रक्ताला न्याय मिळवून देऊ शकत नाही याची आम्हाला आज शरम वाटते!
#दाभोलकर
माणूस मारून विचार संपत नाही वगैरे फालतू गोष्टी...
खरं सांगायचं तर तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा मी लहान होतो. तेव्हा हिंदू जनजागृती समिती, सनातन प्रभातमधली
तुमची हत्या झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी नास्तिक झालो, तुमच्या चळवळीतल्या लोकांशी ओळख झाली, स्वतः थोडंफार सुधारकी लिहू लागलो. हे फक्त माझ्या बाबतीत झालंय असं नाही, माझ्या मित्रमंडळीत असे अनेक तरुण आहेत
तुमच्या काळात फेसबुक ट्विटर रेडिट वगैरे माध्यमे नव्हती, तुमचं कार्य हे त्या धार्मिक विद्वेषाने पेटलेल्या काळात जास्तच अवघड होतं. तरीही तुम्ही विवेकवादाची ज्योत टिकवण्यासाठी आमच्या पिढीचा जन्म व्हायच्या आधीपासून झटत आलात. आज आम्ही ज्या सहजतेने
तुम्ही तुमचं आयुष्य महाराष्ट्राच्या मातीत विवेकवादाची मशागत करण्यात घालवलं, त्याचा वसा आम्ही सांगत राहूच... पण तुमचं, पानसरे, कलबुर्गी यांचं
तुम्हाला केस टाकून छळणारे अजून संपलेले नाहीत. तुम्हाला धमक्या देणारेही संपलेले नाहीत. तुम्हाला मारलं तसं पुलावर गाठून मारू असं म्हणून सहज खुन्नस देणारे आम्ही आजही आजूबाजूला बघत असतो.
तुमचे मारेकरी सापडतील की नाही याची आम्हाला आज खात्री नाही. कायदा तुम्हाला न्याय मिळवून देईल याचीही वेडी आशा आम्ही बाळगणं सोडून दिलं आहे. पण तुमच्या
आम्ही शक्य तितकं बोलत राहू, शक्य तेवढी चिकित्सा करत राहू, शक्य तितकं तत्त्वासाठी भांडत राहू, शक्य तेवढं सनदशीर पण आक्रमक अशा पवित्र्याने लढत राहू आणि शक्य तेवढा तुम्ही जपलेला विवेकवादी प्रवाह मजबूत करत राहू एवढंच वचन सध्या देऊ शकतो!
#दाभोलकर