मा. @PMOIndia ,
📢 #मरीन_ड्राईव्ह चे #खाजगीकरण करू नका 📢

भारतात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. खाजगीकरणाचा फायदा कदाचित पैशांमध्ये असेल पण #आरक्षण संपेल,स्वप्नं भंगतील आणि बेरोजगारी वाढेल हे नक्की. विमानतळ आणि रेल्वेनंतर आता सरकारी बँकांचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
उद्या आपल्या भारतात कशाचे खाजगीकरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जंगलांचे, हवेचे, पाण्याचे, वाघांचे, नद्यांचे, सैन्याचे अगदी न्यायालयांचे, कशाचेही खाजगीकरण होऊ शकते. आणि ते जनतेच्या हातात नाही. तसा प्रत्येकाला सारा भारत प्यारा.
पण किमान आपल्या आवडीच्या अमुक-अमुक गोष्टींचे खाजगीकरण करू नका यासाठी प्रत्येक *#कॉमन_मॅन' ने सरकारला सांगितले पाहिजे. म्हणूनच हे विनंती पत्र.
#समुद्र हा #केंद्रसरकार च्या अखत्यारीतला विषय. पण त्याआधी तो माझा, तुमचा, आपला आहे असेच
सर्वांना वाटते. #मुंबईच्या ज्या मरीन ड्राईव्ह वर बसून उद्याची स्वप्ने पाहिली, सुखदुःखात ज्या सागरी किनाऱ्याने साथ दिली तो " मरीन ड्राईव्ह " #भविष्यात खाजगी होऊ नये यासाठी सरकारला ही विनंती. त्याचे खाजगीकरण झाले तर कदाचित
सामान्य जनतेला मरीन ड्राईव्हवर एक चक्कर मारायला १००० रुपये किंवा समुद्राकडे बघून स्वप्ने पहायला १००००० रुपये मोजावे लागतील. खाजगीकरणाचे काही धोके वेळीच ओळखले पाहिजेत.
मला जसा मरीन ड्राईव्ह प्यारा वाटतो तसे तुम्हाला कदाचित एखाधा #किल्ला,एखादी वास्तू किंवा एखादी संस्था प्यारी वाटू
शकते. उद्या खाजगीकरणाचे हे #बोचरे वारे #नगरपालिका आणि ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तुमच्या आवडीची सार्वजनिक वस्तू किंवा एखाद्या #फुटपाथचे खाजगीकरण होऊ नये म्हणून तुम्हीही आपल्या लोकशाहीच्या सरकारला विनंती करू शकता.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Madhav Patil

Madhav Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!