मॅनेजमेंटच्या जगात "अॅबिलिटी टू से नो!" - समोरच्याला नकार देता येणं - याला खूप महत्व असतं. हे "नाही", "नको", "नॉट इंटरेस्टेड" सगळ्याच बाबतीत वापरता यायला हवं.
बिझनेसमध्ये अनेक संधी समोर येतात - त्यातल्या कोणत्या निवडायच्या, कोणत्या सोडायच्या -
१+
हे कळायला हवं. अनेक प्रॉस्पेक्ट्स फार चटकन फळास येतील असे असतात. आपल्या बिझनेस मॉडलमध्ये थोडेसे बदल केले तर मोठ्या संधी समोर उभ्या राहू शकतात.
करायचे का हे बदल? करावेत का?
याचं ठोस उत्तर अर्थातच देता येत नाही. पण अश्या संधी जन्मभर समोर येत रहातील. दर ६ महिन्यांनी फोकस
२+
बदलत रहाणार का?
म्हणूनच "नॉट इंटरेस्टेड" म्हणत सरकणं आवश्यक असतं.
एखादा क्लायन्ट मोठं बिझनेस बकेट घेऊन येतो. पण त्याचा पूर्वानुभव अ ति श य वाईट असतो. रक्त जाळणारा प्रकार असतो. आपणच नाही, टीमला पण वैताग आणणारा, प्रॉडक्टिव्हिटी कमी करणारा प्रकार. अश्यावेळी विनयाने नकार देणं -
३+
किंवा - स्पष्ट नकार नं देता, संबंध बिघडू नं देता टाळणं - जमायला हवं.
हे सगळं बिझनेस वा मॅनेजमेंट स्किल म्हणून शिकायला हवं म्हणून शिकवलं जातंच.
पण हे कौशल्य फक्त तेवढ्यापुरतं आवश्यक आहे का?
मित्र मैत्रिणी कोण असावेत, कुणाबरोबर किती वेळ घालवावा, कुणाकडून मदत स्वीकारावी -
४+
कुणाला किती मदत देऊ करावी...या छोट्या दिसणाऱ्या पण आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठे परिणाम साधणाऱ्या गोष्टी आहेत.
आपण कुणाबरोबर जोडले जातोय, कुणाबरोबर संधी करतोय, कुणाला "समजून घेतोय", किती पदरात घेतोय - याच्या काही आपल्या लक्ष्मणरेषा आपणच ओढून ठेवायला हव्यात.
५+
गाडी घेण्याची इच्छा आहे - डोक्यात सतत विचार येत आहेत - एक मस्त सेकंड हॅन्ड गाडी मिळतीये - पण पैसे नाहीत, कोव्हीडमुळे नोकरी दोलायमान आहे -
तेवढ्यात -
पर्सनल लोन देऊ करणारा कॉल आला...!
अश्यावेळी मोह टाळून -
नाही, नको, नॉट इंटरेस्टेड - म्हणता यायला हवं.
६+
फार फार पूर्वी कधीतरी एक वाक्य वाचून गेलो होतो...डोक्यात अगदी फिट बसलंय ते.
चीट मी वन्स - शेम ऑन यू...चीट मी ट्वाईस - शेम ऑन मी!
एकदा फसलो, फसवलो गेलो...ठीकाय...समोरचा माणूस वाईट होता, परिस्थिती वाईट होती...समजून घेऊ.
पण तोच वा तसाच माणूस, किंवा तशीच परिस्थिती परत उद्भवली-
७+
जे अगदी ९९% होतंच! --- आणि त्या सापळ्यात आपण अडकलो...
तर बाकी सगळं एकीकडे - आपण फसवले जाण्याचाच लायकीचे असतो. फसण्याच्याच लायकीचे असतो.
आपणच घेतलेला निर्णय असतो तो.
म्हणूनच ही स्किल कमावणं आवश्यक आहे. नकार देण्याची.
लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली.
१+
कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं - मूलभूत मूल्यांचा - सगळा कचरा होऊन बसतो.
रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात.
ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा...बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या.
२+
रामायणात त्यांची दखल घेतली गेली आहेच. परंतु रावण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. कारण त्याच्या दुर्गुणांमुळे सगळे सद्गुण मागे पडले.
अहंकारी, दुराग्रही, वासनांध - हेच रावणाचं खरं रूप आहे.
Whether you are working as an employee or have your own business - please don't fall in the "Don't worry! You have time to figure it out!" trap, that's pretty famous these days amongst the Gurus of modern age success.
1+
Time is the most valuable commodity. Time lost in vain costs way more than anything else in our lives.
So, of course don't haste. Don't jump to conclusion too soon. Have a pinch of patience and perseverance.
2+
But, if after repetitive attempts you are not achieving success - please introspect.
Ask yourself if you can afford "experimenting" like there's no need to hurry and settling down somewhere.
८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा!) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.
त्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी!) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.
२+
त्या सर्व प्रक्रियेची फक्त रुपये १० किंमत मोजून मी माझ्या मोबाईलसाठी प्लास्टिकचं फोल्डिंग स्टॅन्ड विकत घेतलं.
ऑफिसला गेल्यावर बॅगेतून ते स्टॅन्ड काढून टेबलवर ठेवताना क्षणभर त्या अज्ञात डोकेबाजाला धन्यवाद देतो मी रोज.
मंदिर नको, शाळा-इस्पितळ बांधा - असं म्हणणाऱ्या लोकांची कीव येते.
यांना भारतातल्या शिक्षण, आरोग्य सेवेच्या समस्यांची फार्फार काळजी आहे.
५-६ महिन्यांपूर्वी हे लोक कोणत्या जंगलात गुडूप होते कुणास ठाऊक.
१+
भारतात शाळा इस्पितळं बांधायला हवेत हे कळायला यांना आधी मंदिर विषय चर्चेत यावा लागतो.
बरं हे इतके दळभद्री मेंदूचे आहेत की यांना फक्त मंदिराचाच प्रॉब्लेम नाहीये.
यांना मेट्रो, चांद्रयान, बुलेट ट्रेन, सरदार पटेल पुतळा - काहीही म्हटलं की शाळा इस्पितळं सुचतात.
२+
"तुम्ही मंदिर बांधा, मस्जिदी बांधा काय वाट्टेल ते करा - पण आम्हाला अमुक ठिकाणी तमुक प्रकारच्या शाळा, हॉस्पिटल्सची गरज आहे - त्याकडे दुर्लक्ष करू नका" - असं म्हणण्याचा प्रामाणिकपणा नाही यांच्यात.
On @elonmusk buying @Twitter - everyone's speculating complex, larger than life motives. How come nobody is talking about the obvious lowest hanging fruit : USER BEHAVIOR DATA ?