iPragati Profile picture
10 Oct, 10 tweets, 2 min read
#आजचा थ्रेड #Thread 10-10-20
नैवेद्यासाठी पुरणच का?

अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती कडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपती ला घेऊन यायचा ते आग्रह करतात.
पण पार्वती ला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसूये कडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते.

जेवण सुरू होतं आणि अनुसूया एकेक पदार्थ वाढायला सुरू करते.
छोटा गणपती खूप आनंदाने जेवतोय पाहून अनुसूयेला ही बरं वाटत.
महादेव आणि पार्वती च जेवण संपतं पण गणेशाचं ताव मारणं सुरू राहतं.
पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्ह्णून सांगायचा प्रयत्न करते पण गणपती च सगळं लक्ष जेवणात. अनुसूयाला पण आता काळजी वाटायला लागते
कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात. तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत.

आणि एकदाचे सगळं जेवण संपतं पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही. मग अनुसूया स्वयंपाक घरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते.
आणि गणपती ला सांगते की, "मी माझ्याकडे जे सर्व होतं (पूर्ण) ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर".
गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो.
म्हणून त्या पदार्थाला पुरण (जे पूर्ण आहे ते) अस म्हटलं गेलं.
आणि ते पुरण मोदक रुपात (श्रध्दा आणि मातृत्वा च्या बंधनात बांधलेलं) गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला.म्हणून हिंदू लोकांत सणासुदीला पुरण केलं जातं. आज काल मोदकाचे खूप प्रकार झाले आहेत पण त्यांतल्या ingredients पेक्षा त्या मागचं symbolism समजून घेण्यासारखे आहे.
देवाला आपण जे पूर्ण श्रद्धेने अर्पण करतो ते आवडतं.

हिंदू दर्शन मध्ये प्रत्येक गोष्टी मागे काही कारण निश्चित असतं. Every symbol has definate meaning.
अजून एक छोटं उदाहरणं पहा, सरस्वती जी विद्येचं दैवत आहे ती दगडावर बसलेली पाहायला मिळते आणि
लक्ष्मी जी धनाची देवी आहे ती कमळावर बसलेली असते. विद्या ही दगडा सारखी ( we call it as Rock solid) अचल आणि स्थिर असते तर धन हे पाण्यावरच्या कमळासारखं अस्थिर असत.
आपण प्रत्येक गोष्टींच्या मागील जर कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हिंदू दर्शन आपल्याला Myth आणि अवैज्ञानिक वाटणार नाही.

*डॉ. सुशांत जोशी*

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with iPragati

iPragati Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @iPragS

1 Oct
आई तुळजाभवानी...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.
असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे

मंचकी निद्रा:-

देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे

सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?

मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.

देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼
१)घोर निद्रा :-
नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.
Read 10 tweets
1 Oct
ग. दि. मा.
1 ऑक्टोबर,आजचाच दिवस, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ.
गावच्या कुलकर्ण्यांची सून घरीबाळंतपणासाठी आलेली.गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता.संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली.
मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले.
कुणीतरी जवळच्या गावातील वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले. त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला. आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती.
Read 8 tweets
28 Sep
#आजचा थ्रेड 28-09-20
आपले किती Account Closed झाले

कसे आहात..??"
एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.."भरपूर रडून घ्या..मला वेळ आहे.आजच रडायचं आणि नंतर डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."
त्या नंतर तिने जे काही सांगितलं..त्यानंतर कायापालट.
"तिनं काय सांगितलं..??" म्हणाली.."की आपण हा जो जन्म घेतलाय तो अपेक्षापूर्तींकरिता नाही.आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही तर आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात.त्या पूर्ण होत नाहीत.उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
"माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींकरिता नाहीच आहे हा आहे परतफेडीसाठी आहे.."
तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात.तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला.ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड झाली..तो अकाउंट संपला..!
Read 9 tweets
26 Sep
#आजचा थ्रेड 26-09-20
सुख म्हणजे नक्की काय असत ?
एखादी लहानशी घटना आठवून चेहऱ्यावर एका क्षणात हसू येते त्यालाच सुख म्हणतात . “आमटी छान झाली आहे ग ” असे आपल्या ह्यांनी म्हणणे, “आमच्या सुनेची भाजणी छानच होते”, हे सासुबाईंचे वाक्य कानी पडते ,तेव्हा मनास जो आनंद होतो ते सुख असते.1/1
आपल्याला अगदी हवी तशीच साडी खरेदी होते ते सुख असते .
घराच्या भिंतीना साजेसे पडदे मिळणे हेही सुखच असते. मनासारखा स्वयंपाक होणे, आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींमध्ये मनसोक्त रमणे, गप्पा मारणे हेहि आनंदच देवून जाते. मुलांना भरभरून मार्क्स मिळालेले प्रगतीपुस्तक 1/2
आणि त्यावर सही करताना पालक म्हणून आपली ताठ झालेली कॉलर हे सुखाचे क्षण जपुन ठेवणे हे सुख कश्यातच मोजता येणार नाही.
लहानसहान गोष्टी अगदी कडधान्याला आलेले मोड , उशीर झालेला असतानाही मिळालेली रोजची लोकल ट्रेन आणि ध्यानीमनी नसतानाही मिळालेली खिडकीजवळची जागा. 1/3
Read 7 tweets
23 Sep
#आजचा थ्रेड 23-09-20
प्रिय देवघरास
प्रथम तुला विनम्रपुर्वक नमस्कार. तुझं स्थान हृदयात आहे. अगदी लहानपणापासुन आपलं नातं आहे अगदी आजन्म . सगळ्या भल्याबुऱ्या प्रसंगांचा तू एकमेव साक्षीदार. तुझ्यापासून काहीच लपत नाही. चुकलं तर कानउघडणी तुच केली आहेस 1/1
आणि चांगल्या गोष्टींसाठी पाठीवर शाबासकीची थापसुद्धा तूच दिली आहेस.
तू घराचं आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनाचं मांगल्य पावित्र्य जपतोस. तुझी सुसंगत असेल तर पावलं कधी वाईट मार्गाने वळणार नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू अगदी मायेने खंबीरपणे पाठीशी उभा आहेस निरंतर.1/2
तुझ्यासमोर बसून शुभंकरोती शिकलो . नंतर रामरक्षा ...आणि बरेच काही.तेव्हापासून तू खुप जवळचा आहेस रे .तुझ्याशी सगळी गुपितं मनमोकळेपणाने सांगू शकलेय ...तू मला तेवढ्याच विश्वासाने धीर दिलास .. आभार नाही मानणार पण अशीच कायम तुझी साथ हवी ... तू मला कधीच एकटं पडू दिलं नाहीस ..1/3
Read 8 tweets
18 Sep
#आजचाथ्रेड 18-09-20

व्यक्ती असतात. एखादी गोष्ट असते, घटना असते. मग दृष्टीकोन असतात. जवळचा शब्द परसेप्शन्स.
एखाद्याला चूक किंवा बरोबर म्हणतो आपण, पण तो त्याच्या परसेप्शन्स नुसार बरोबरच असतो नेहमी... मग घटना, गोष्ट तीच. एकासाठी ती बरोबर असते तर दुसऱ्यासाठी चूक.1/1
हे असे खेळ फार रंजक होतात बरं का! आपल्याला एखादा फक्त चूक दिसू शकतो... तर एखाद्या इवल्याशा घटनेवर कुणी प्रचंड खूश असतो. परसेप्शन्स. कधी कधी अचानक एखादं गाणं लागतं नि मन सुन्न होतं, पापण्यांच्या कडा ओलावतात. 1/2
कधी कुणाच्या नुसत्या गुणगुणण्यानेही प्रसन्न वाटू लागतं.
एखाद्या प्रसंगात माणूस का चुकतो हे पहायचं असेल तर त्या प्रसंगाबद्दलचा त्याचा दृष्टीकोन पहायला हवा आणि दूरूस्ती करावीशी वाटलीच तर रिअलायझेशनची प्रक्रिया सुरू करायला हवी.1/3
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!