#थ्रेड

प्रतापचंद्रजी सारंगी 🙏

आमदार, खासदार, नेते म्हणलं कि डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, महागड्या गाड्या, बंगला, कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्वांपासून कोसो दूर एक असा नेता आहे जो आज सुध्दा अनेक वेळा सायकल वर फिरताना दिसेल, गवताच्या काड्या आणी बांबूंच्या घरात राहतो.
👇
घरासमोरील सरकारी नळावर स्नान करून दिनक्रमाला सुरुवात, सायकल वरून निवडणूक प्रचार, आजही सायकल चा वापर,एक ही स्वतःची कार किंवा बंगला नाही.
ते म्हणजे

प्रतापचंद्रजी सारंगी.

त्यांचा जन्म 4 जानेवारी 1955 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला.

👇
निलगिरी येथून त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण करून लहानपणापासून असलेली इच्छा म्हणजे संन्यासी होण्यासाठी ते कलकत्ता येथील रामकृष्ण मठात गेले. पण आई एकटी असल्यामुळे त्यांना आईचा सांभाळ करण्याचा सल्ला देऊन परत पाठवले गेले. इथून त्यांनी समाजसेवेची सुरुवात केली.
👇
आणी ओघानेच राजकीय प्रवास सुरु झाला. गणशिक्षा मंदिर योजने अंतर्गत त्यांनी आदिवासी आणी दुर्गम भागात शेकडो शाळा उभारल्या, व स्वतः सुध्दा शिकवायला सुरुवात केली.
बजरंगदल चे अध्यक्ष पद ही भूषवले आणी एक अभिमानी हिंदुत्ववादी म्हणून त्यांची प्रतिमा आणखीच उजळली.

👇
2004 ani 2009 मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. आणी 2014 मध्ये भाजप मधून त्यांना बालासोर येथून खासदारकीची उमेदवारी मिळाली. पण धनाढ्य नेत्यासमोर त्यांचा पराभव झाला. पण जनतेत त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. 2019 मध्ये परत त्याचं उमेदवारांसमोर ते निवडून आले.
नजीकच्या काळात त्यांना "ओडिशा के मोदी" म्हणून संबोधले जाऊ लागले. परंतु आजही त्यांचे राहणीमान आणी समाजकार्याची प्रचंड इच्छाशक्ती तशीच आहे.
आज ही ते पूर्वीसारखेच सामान्य जीवन व्यतीत करतात. आणी यामुळेच मोदीजी ही बऱ्याच काळापासून प्रभावित आहेत.

👇
मोदी 2.0 मध्ये शपथविधी साठी सारंगीजींचे नाव पुकारल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. एवढा गरीब माणूस केंद्रीय मंत्री??😳
ते सध्या Animal Husbandry, Dairy, Fishery's, Micro, Small & Medium Enterprise's विभाग केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम सांभाळत आहेत.
👇
"जमीन से जुडा हुआ नेता" हे त्यांना तंतोतंत लागू होतं. ओडिशा मध्ये एक ही व्यक्ती असा नसेल जो यांना ओळखत नाही.
साधेपणा, उत्तम वक्तृत्व, प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास, अविरत समाजसेवा यामुळे विरोधक सुध्दा त्यांची खुल्या मनाने तारीफ करतात.
👇
देशाच्या कानाकोपऱ्यात भाजप मध्ये असे अनेक दुर्लभ हिरे आहेत.
मोदीजींनी त्यांना पारखून योग्य ती जबाबदारी देखील सोपवली आहे.

त्याचं हिऱ्यांपैकी एक म्हणजे
कर्मयोगी आणी समाजकार्यासाठी आयुष्य वाहून नेणारे आदरणीय
प्रतापचंद्रजी सारंगी.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नितीन | नि-3

नितीन | नि-3 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nitin_vn46

25 Jul
कारगिल विजय.
कृष्णकांत- the unsung hero of kargil.
कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर.(माझे काका )
कृष्णजन्माष्टमी दिवशी झालेला जन्म उदगीर -लातूर ) म्हणून आई ललिता यांनी कृष्णा हे नाव सुचविले.
अत्यंत लहान वयात एनडीए पुणे, येथून सैन्य भर्ती शिक्षण पूर्ण करून आर्मी जॉईन केल्यानंतर👇
पहिली जॉइनिंग मिळाली ती डेहराडून येथे.
1999 मध्ये कृष्णा ची नियुक्ती "घातक" या अत्यंत महत्वाच्या सैन्य पथकात झाली.ती ही बढती सह. लेफ्टनंट पदावर. जानेवारी मध्ये सुट्टी निमित्त गावी आलेला. देशावर युद्धाचं सावट, आई ललिता आणी वडील चंद्रकांत यांनी कृष्णा ला खूप समजावलं कि सुट्टी 👇
पूर्ण करून जा. पण देशसेवेवेळी भावना बाजूला सारून तो निघाला. कारगिल येथे कुपवाडा सेक्टर 8 मध्ये तो रुजू झाला. 3 एप्रिल चा तो दिवस. घातक पथकाच्या गस्ती दरम्यान 14 पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला चढवला. यात 6 जणांच्या या अतिशय घातक अश्या पथकाने त्या 14 जणांना यमसदनी धाडले.👇
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!