" शारदीय नवरात्र"
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्धप्रतिपदा ते चैत्र शुद्धनवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. @kul_anagha@Amruta39117837
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात,
काही तयार झालेली असतात आणि शेतकरी निवांत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे @Vishakh50862352
म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.तिथे एक वेदी तयार करतात. @TheDarkLorrd
नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.
आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.क्वचित होमहवन व बलिदानही करतात.नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि
शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.
उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते,
आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे,
म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते.
या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते.
घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो.
घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे
मारक चैतन्य कार्यरत
होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते,
अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे
“ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते." नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.
सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.
ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो
म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.
चला तर उद्या पासून शक्ती दायिनी देवीचा जागर करू या
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रानो गेले काही दिवस मी रोज समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक पोस्ट करत आहे
मनाच्या श्लोकात श्री रामाचे नाव असते.
श्री राम कुठे नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी राम राहे भरुनी
इतकंच नाही तर आपल्या सर्वांच्या नावातच राम भरून राहिला आहे असे सांगितले तर @kul_anagha
कसा हे मी नाही दुसरे महान राम भक्त संत तुलसीदास सांगून गेलेत कसा ते पाहू या "आपले नाम राम" ह्या धाग्यात
माझ्या वाचनात आल्यावर मी खूप टेम्प्ट झालो आपल्यापुढे ठेवायला म्हणून आज बॅक टू बॅक धागा लिहित आहे
खात्री आहे आपल्याला नक्की आवडेल @Vishakh50862352
तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की,
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?
तुलसीदास म्हणाले :- "हो"
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ?
तुलसीदास :- "हो नक्की" @RajeGhatge_M@TheDarkLorrd
शुभ संध्या मित्रांनो,एक कबीर कथा
कबीराचा मुलगा कमाल एकदा काशीतून फिरत असता एका घराचे दार उघडे दिसले.त्याने आत डोकावून पाहीले तर तिथे एक बाई दळण दळत होती
कमाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता.दाणे जातात कुठे ???
त्याला रडू आले
त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले
त्याने विचार केला,आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत
कमाल घरी आला, वडीलांजवळ जाऊन रडू लागला
कबीर महाराज विचारताहेत..
"कमाल अरे काय झाले रे ?
कमाल सर्व पाहिलेलं सांगतो,आणि म्हणतो.
"जात्यामध्ये सर्व दाणे मेले"
कबीर कमालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले
जात्याची वरची पाळी बाजुला करुन दाखविली
खुंट्याजवळ२,४दाणे तसेच चिकटलेले होते
ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते.
कमाल च्या भाषेत ते वाचले
मित्रानो आज आठवड्याचा पहिला दिवस,
या आठवड्याचा शनिवार शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ
आजपासून विजयादशमी पर्यंत शक्य तो थ्रेड देवी भवानीच्या संदर्भात पोस्ट करायचा मानस आहे
त्या निमित्ये देवी सेवा आणि देवीचे नाम घेणे होईल @RajeGhatge_M@Vishakh50862352
२ दिवसांपूर्वी मी तुळजाभवानी मातेच्या घोर निद्रेच्या संदर्भात एक विडिओ पोस्ट केला होता
पण माता तुळजाभवानी ची हि एवढीच निद्रा नसते
आजचा धागा त्या महामायेच्या निद्रे विषयी आहे
चला पाहू या हा
"मंचक निद्रा" धागा
श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते
या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे.
१) चांदीचा मंचक
२) लाकडी मंचक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.
उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते @shivajirao29
मित्रानो शनिवार रविवार आले कि सर्व जण आपल्या परीने २ निवांत दिवस कसे मजेत घालायचे याचे प्लॅनिंग करतात.
पण दुर्गप्रेमी आज कुठल्या किल्लयाचा ट्रेक करायचा हे खूप आधीच ठरवून
शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवार सकाळीच
आपल्या मोहिमेला सुरवात करतात @Amruta39117837
चला आज आपण हि ट्रेक करून फिरून येऊया
अशा एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याशी
माझ्या कॉलेज जीवनाच्या आठवणी निगडित आहेत
किल्ला म्हंटले कि त्याला भूगोल आणि इतिहास हा हवाच
नाही तर तो किल्ला कसला @RajeGhatge_M
महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्लयांना
मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत,
पण आपण आज चाललो आहोत त्या किल्ल्याला काही हजारो वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे.
या किल्ल्याचा संदर्भ श्री रामाचा पूर्वज असलेल्या
राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे
"राहुल तेवतीया आणि २०२०"
दोन दिवसापूर्वी एक भन्नाट समीकरण वाचनात आले
ते आपल्यापुढे ठेवत आहे २७ सप्टेंबरला शारजा येथे झालेल्या IPL २०-२० खेळात रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत राहुल तेवतीया हा खेळाडू साऱ्या क्रिकेट रसिकांच्या चेष्टेचा आणि रंगाचा धनी बनला होता @gajanan137
मला हि आठवतंय कि डॉ आनंद रंगनाथन या नामवंत सन्मान्य व्यक्तीला हि ह्या राहुल बद्दल ट्विट करावंसं वाटलं होत कि हा नक्की करतोय काय १७ वि ओव्हर संपली २० बॉल खेळून सुद्धा त्याला एक हि चौकार व षटकार मारता आला नव्हता समालोचक म्हणत होते हा रिटायर्ड आऊट का होत नाही @Amruta39117837
१७व्या ओव्हर नंतर त्याच्या टीम ची जिंकण्याची शक्यता होती
२% फक्त
अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर त्याच्याकडून शून्य आशा आणि मित्रानो चमत्कार घडला
डोंबिवलीतील विलास सुतावणे यांची "विविसू डेहरा" ही संस्था गेली अनेक वर्षे पर्यटकांना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या गाठी भेटी घडवून आणते. याबरोबरच सैनिकांच्या शौर्यावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करणे, निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची व्याख्याने आयोजित करणे,
दिवाळीमध्ये देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांना फराळ, सदिच्छा भेट म्हणून पोहोचवणे हे उपक्रम सातत्याने राबवत आहे.या वर्षी पण दिवाळी फराळ पोहोचता करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.यासाठी देशप्रेमी नागरिकांकडून सहभाग अपेक्षित आहे. कमीत कमी रक्कम रुपये पाचशे अपेक्षित आहे. @smitprabhu
आपणास विनंती आहे की आपण या उपक्रमास हातभार लावावा.
Following are the bank details for transferring the donation for दीवाळी फराळ - सैनिकांसाठी.
ICICI Bank
Branch - Dombivli East
Name - VIVISU DEHRA
A/c no. - 095005500038
Current Account
IFSC code - ICIC0000950