पावसामुळे शेतकरी उध्वस्त झालाय आणि अनेकांच्या टीकेनंतर कित्येक महिन्यांनी मुख्यमंत्री घराबाहेर पडले आहेत. घराबाहेर पडले म्हणजे जणू उपकारच केला आहे अशा अविर्भावात त्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा करणारा हा माणूस आता नुकसानाची पाहणी करायला सांगवी+
खुर्द ता. अक्कलकोट येथे आला.

अक्षरशः गाव पाण्यात गेलं आहे, कित्येकांचे नुकसान झाले आहे, शेती वाहून गेली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ पाहणीचा फार्स करायला आले आहेत. त्यातही हद्द ही केली की, बोरी नदीच्या पुलावर शेतकऱ्यांना भेटायला बोलावलं आहे, कारण काय असेल! गावात जायला+
भीती वाटते? रस्त्यात चिखल आहे? त्याहून मोठी गोष्ट अशी की, ज्या पुलावरून हे पाहणी करत आहेत तिथे पाहणी करण्यासाठी एक स्टेज उभारला आहे, हा काही महाबळेश्वर पाहणी दौरा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेलं पाणी पुसण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून बोलावलं होतं. त्या खुर्चीवर आहात म्हणून+
लोकांना अपेक्षा आहेत. पण केवळ बोलबच्चन करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना मदत करणं तर दूरच मात्र शेतकऱ्यांनाच पुलावर बोलवून जखमेवर मीठ चोळलं आहे.

ऊन, वाऱ्या, पावसात जगण्याची उमेद जागवणारा शेतकरी बाप तुम्हाला महत्वाचा वाटत नाही, तुम्हाला महत्वाची वाटते ती खुर्ची, तुमचे कपडे,+
तुमच्या गाड्या.
आज सांगवीच्या शेतकऱ्यांनी पुलावर भेटायला न जाता मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर दिले आहे, त्यांची जागा दाखवली आहे. ज्या गावात तुम्ही पाहणीला जाता त्या गावातल्या सरपंचाला मुख्यमंत्र्यांना भेटू दिले जात नाही, जवळ जाण्याचा पास मिळत नाही. जर गावच्या प्रथम नागरिकाला +
मुख्यमंत्र्यांना भेटू दिले जात नसेल तर व्यथा मांडणार कशा? कुणाकडे मांडणार. तुम्हाला शेतकऱ्यांना भेटायची भीती वाटते. चिखलाने कपडे खराब व्हायची लाज वाटते. तर तुम्ही सत्तेवर बसायच्या पात्रतेचे आहात का? तुम्ही शेतकऱ्यांचे तारणहार आहात का? आणि हे सगळं जर करायचं होतं तर इथपर्यंत+
येण्याची नाटकं नेमकी कशासाठी? हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी स्वतःच स्वतःला विचारायला हवेत.

पोटच्या पोराप्रमाणे जपलेलं पीक वाहून गेलं, गुरंवासरं मरून गेली, अजून पंचनाम्यांचे आदेशच तलाठ्यापर्यंत पोहचले नाहीत, अख्खं शेतच वाहून गेलं त्यांना आधार देणं सोडून पुलावरचे शहाणे+
मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वागले हे विसरण्यासारखे नाही. उलट एक गोष्ट कायम अधोरेखित असेल की, "राज्य जेव्हा संकटात होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात दार लावून बसले होते, आणि जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची चेष्टा केलीय".

- विकास विठोबा वाघमारे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

22 Sep
कृषी विधेयके रद्द करा -खा. शरद पवार
😂🤙

● जेव्हा सभागृहात विधेयकावर चर्चा होती तेव्हा साहेब गैरहजर होते.
● जेव्हा सभागृहात विधेयक मंजूर होत होते तेव्हा साहेब गैरहजर होते.
●जेव्हा विधेयक मंजूर होत होते तेव्हा राष्ट्रवादीच्या उरलेल्या राज्यसभा खासदारांनीही सभात्याग केला होता.+
● साहेबांना स्वतःला कारखाने, सहकारी संस्था वगैरे प्रचंड आवडतात पण शेतकरी व्यापक भूमिकेवर येतोय, डेव्हलपमेंटच्या संधी दिसताहेत, कॉर्पोरेट कंपन्या आता ग्रुपच्या माध्यमातून शेतकरीही करू शकतो, कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातील, शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान येईल असं हे उज्वल"+
भविष्य दिसायला लागले तर लगेच आता विरोध सुरू केलाय!

कार्यकर्त्यांनो, तुमच्या साहेबांना एकच प्रश्न विचारा, जर हे विधेयक इतके वाईट आहे तर सभागृहात चर्चेला का नव्हतात? मंजूर होताना मतदान (विरोधात/समर्थनात) करायला सभागृहात का नव्हतात? राष्ट्रवादीच्या बाकीच्या खासदारांना पण सभात्याग+
Read 6 tweets
20 Sep
आज राज्यसभेत 'कृषी सुधारणा विधेयके' मंजूर झाली आणि खऱ्या अर्थाने देशातल्या अवघ्या शेतकऱ्यांना आनंद झाला. खरंतर हा क्षण यायला 70 वर्षे उलटून गेली मात्र कोई माय का लाल हे करू शकला नाही पण "नरेंद्र दामोदरदास मोदी" या युगपुरुषाने हे करून दाखवलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तळहातावर+
फोड घेऊन, कधी अनवाणी पायाने, अंगावर चिंध्या पांघरून, मिरची भाकरी खाऊन अवघ्या जगाला पोसण्याचं काम हा शेतकरी मायबाप करतो. सगळं जग थांबलेलं होतं तेव्हाही माझा बाप शेतात राबत होता कारण तो शेतकरी आहे. पण त्याच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, त्याच्या पायातल्या बेड्या सोडवण्यासाठी आजचा+
दिवस यावा लागला. हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा दिवस आहे, आणि हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.

या नवीन विधेयकांमुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे आणि ‘एक देश एक बाजार’ या संकल्पनेला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांना बाजार+
Read 27 tweets
18 Sep
👇हा व्हिडीओ(48 सेकंदानंतर बघा) पाहिल्यापासून भयंकर अस्वस्थ आहे,निशब्द, हतबल आहे. डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही. राज्य अक्षरशः मरतय..😢
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवर बोलताना हुंदका देऊन रडणारा नितळ मनाचा माणूस कोण हे माहितीय का! हे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी+
प्रमुख ओमप्रकाशजी शेटे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देत उपचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी.
राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयंकर वाईट आहे, भयंकर वाईट!😢 लाखों लोकं उपचारासाठी+
धडपड करताहेत...घरदार विकताहेत..ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना कोणीच उभा करत नाही. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. सत्ताधारी घराच्या बाहेरही पडत नाहीत, लोकांना वाली कोणीच नाही... भावांनो, आत्तापर्यंत राज्यात कोरोनामूळे तब्बल 31 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.😢+
Read 5 tweets
17 Sep
राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला आहे, परिस्थिती अक्षरशः हाताच्या बाहेर गेलीय, महाविकास आघाडी सरकार नागरिकांना फसवत आहे, लुटत आहे. नागरिकांना बेड मिळत नाही, उपचार मिळत नाही, व्हेंटिलेटर नाहीत, अम्ब्युलन्स नाही, ऑक्सिजन नाही आणि ज्यांना या व्यवस्था मिळतात त्यांना लाखोंची बिलं+ Image
दिली जातात,ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना रुग्णालयात घेतलेच जात नाही, मग तो त्याच्या नशिबाने वाचला तर वाचला नाहीतर तरफडत मरण येतच आहे.ही विदारक परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या राज्यात असताना त्या विरोधात सरकारला जाब विचारत एका व्यक्तीने दंड थोपटले आहेत.+
ते म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख श्री. ओमप्रकाश शेटे सरांनी.
केवळ त्या विरोधात आवाजच उठवला नाही तर त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य क्षेत्रातले कोरोना उपचार संदर्भातील घोटाळे आणि फसवणुक पुराव्यासह मुंबईच्या हुतात्मा चौकात मांडून सिद्ध करतो, चर्चेला या असे+
Read 21 tweets
15 Sep
मराठा आरक्षण संदर्भात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीचे देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य सरकारने आमंत्रण दिलेलं नाही.
एकीकडे परवाच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात आल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार.
मुळात+ Image
देवेंद्रजींना सोबत घेतल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही कारण अभ्यास करणं हे तुम्हाला झेपणारी गोष्ट नाही.
भाजपा बद्दल केवळ द्वेष पसरवण्याचे काम काही मीडिया आणि सरकारमधल्या व्यक्ती करत आहेत. आज काही बातम्या अशा होत्या की "देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याने मराठा आरक्षण+
विषयाची बैठक रद्द होणार आहे." मात्र देवेंद्रजींना मुळात राज्य सरकारने बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाही, जर बैठकीचे निमंत्रण मिळाले तर आज देवेंद्रजी बिहार वरून परत येणार आहेत, त्याच क्षणी बैठकिला उपस्थित राहू शकतात. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजींना फोन+
Read 7 tweets
12 Sep
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन अवघ्या शिवसैनिकांना आभाळ ठेंगणे झाले, कशी जिरवली या अविर्भावात वावरत होते. पण एकामागून एक अशी काही वादळं आली की नेमकी जिरवली की जिरली अजूनही महाराष्ट्राला कळेना!
शिवसेना कशी चालत होती याच्या खूप खोलात जायला नको, पण मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य अशी +
काहीतरी चालत होती असं माझ्या माहितीत आहे. उद्धव ठाकरेही तसे आदेशच देत होते, कारण ती त्यांची परंपरा आहे, होती.पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बदलायला हवं होतं, कारण इथे केवळ आदेश चालत नाहीत, तर ज्यांना आदेश द्यायचे असतात त्यांच्या सोबत कींबहुना त्यांच्या पुढे तरी चालावं लागतं+
त्याला "नेतृत्व" म्हणतात. घरात बसून कोणीही नेतृत्व करू शकत नाही. राज्याची धुरा खांद्यावर आल्यावर ते नेतृत्व चांगले करू शकले असते पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अजूनही आपण कोण कोण आहोत आणि कोणता जिरेटोप आपल्या डोक्यावर आहे हे कळतच नाही. ज्यांनी बसवलं ते शरद पवार आणि सोनिया गांधी+
Read 29 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!