मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे मांडले:
आज मी तुळजापूर आणि या परिसराची धावती भेट घेतली. शेतकरी संकटात आहे, अनेकांची घरे-दारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी होत असताना थोड्या थोड्या वेळाने माहिती शासनाकडे येत असते. प्रशासनाला मी नेहमी हेच सांगतो, संकटे आल्यानंतर जीवितहानी होऊ देऊ नका, जीवितहानी कमीतकमी होईल याकडे लक्ष द्या.
मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. पंचनामे जवळपास झाले आहेत. नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा, ते आम्ही पाहतोय. विमा कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल आपल्याला माहिती मिळेल.
सर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. मदत करणारच आहोत. किती करायची, काय करायची, त्यावर मुंबईमध्ये काम सुरू आहे. पंचनामे सुद्धा लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, बहुतेक पंचनामे पूर्ण होत आले आहेत, सर्वांचा आढावा घेऊन किती मदत करता येईल, ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही.
सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही. केंद्राकडून GST ची मोठी रक्कम येणं बाकी आहे. आपल्या हक्काचे पैसे आपल्या खिशात असते, तर तेलंगणाप्रमाणे आपण सुद्धा मदत केली असती. केंद्राकडून येणारे पैसे आपल्या हक्काचे आहेत, ते यायलाच हवेत.
जे जे करता येणे शक्य आहे, ते आम्ही करणार. जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे काही करेन, ते व्यवस्थित करेन.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत.
सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना-ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते या मोहिमेत सहभागी होतील.
मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. त्यांचे दोन द्राव्य (Swab) घेण्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
आजच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने झेंडावंदन करताना, मानवंदना देताना हा मराठवाडा मुक्त झाल्यानंतर पहिला तिरंगा इथे फडकला असेल तो रोमांचकारी क्षण, त्या भावना आजदेखील ताज्या आहेत. या दिनाच्या शुभेच्छा देताना मी भावनेने, मनाने आणि हृदयाने आपल्यासोबत तिथे उपस्थितच आहे.
मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुद्ध लढून अन्याय मोडून, तोडून टाकणे आणि स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या भूमीची आणि मातीची खासियत आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;
Namaskar. At the outset, I would like to thank all citizens of Maharashtra for showing remarkable restraint in the last few months while celebrating religious and cultural events. My heartfelt thanks to all communities and groups.
Starting September 15, I will be running a campaign in the state. I appeal to everyone who loves this land, considers its own, regardless of the caste, creed, party, and any form of politics, to participate and show their support to this campaign.