कोणताही नवा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय बातमी आली की लगेच चालू होते,
कोकणात यावा
मराठवाड्यात यावा
पश्चिम महाराष्ट्रात यावा
विदर्भात यावा
उत्तर महाराष्ट्रात यावा
त्यापेक्षा आधी तो महाराष्ट्रातच यावा आणि इथल्याच भूमिपुत्र मराठी माणसाला त्यात सहभागी करून घ्यावे, असे क्वचितच ऐकण्यात
येतं. आपली लोकं हिंदीत बोलायला लागली , हिंदीत जोक मारायला लागली, हिंदीत पोस्ट करायला लागली, हिंदीत घोषणा देऊ लागली, आता तर हिंदीत विचार करून बरळायचे पण चालू झाले,
खरेच स्वतःची भाषा अभिमान एवढा लेचापीचा आहे की इतरांचा प्रभाव तुम्हाला तुमची ओळख पुसून टाकायला लावू शकतो? जेव्हा
स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न चिन्ह उभं राहतं ना तेव्हा कुत्रं पण विचारणार नाही. किरीतरी जण तळमळीने आपल्या लोकांच्या संवर्धनासाठी झटत आहे पण आपण थंड, शून्य प्रतिसाद देतो कारण आपले जगणंच भरकटले आहे. पाया ढासळत चालला आहे पण पाय ओढायचे काय कमी होईना. कधीतरी एकदा विचार करून बघा
दुसऱ्याच लोकांनीच तुमचं आयुष्य व्यापून टाकलं आहे आणि रेंगाळायला सोडलंय. टोकाचा द्वेष घेऊन इतर भाषिक वावरताना दिसतात. आपण आपलं अस्तित्व दाखवू शकत नाही ही शोकांतिका झाली आहे.