दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता#मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻
असं ऐकताच त्या हिंदी विक्रेत्याचं हिंदी प्रेम उफाळून बाहेर आले. तो म्हणाला "हिंदी शिकून घ्या. हिंदी पूर्ण भारतात चालते. हिंदी सर्वात बेस्ट भाषा आहे." त्यांचा संवाद मी ऐकतच होती. जसं तो पुढे बोलला की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, आपल्या सर्वांना हिंदी आलीच पाहिजे. माझा पारा चढला. 👇🏻
मी त्याच क्षणी त्या हिंदी विक्रेत्याला थांबवले आणि त्याला थोडं दरडावून म्हणाले,"(पुराव्यानिशी) हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. चुकीचा गैरसमज पाळू नका आणि पसरवू नका. मुळात तुम्ही आता महाराष्ट्रात उभे आहात. तुमची हिंदी असेल तुमच्या राज्यात बेस्ट. इथे फक्त आणि फक्त मराठीच श्रेष्ठ आहे. 👇🏻
इथे राहायचं असेल तर मराठीत बोलायचं. इथे हिंदीची जबरदस्ती चालणार नाही. तुला जर मराठी बोलायचं नसेल तर निघून जा इथून स्वतःच्या राज्यात आणि तिथे जाऊन हिंदीचे गुणगान गा हवे तेवढे." माझं हे बोलणं ऐकून तो sorry बोलला आणि आतापासूनच मराठी शिकेन असं म्हणाला. 👇🏻 #महाराष्ट्रातफक्तमराठीच
जवळच खरेदी करत असलेल्या इतर मुली आणि बायका (त्यांनापण वेगळाच हुरूप आला) आतापर्यंत हिंदीत बोलणार्या विक्रेत्यांशी मराठीत बोलायला लागल्या. आपण आपल्या मराठीवर ठाम राहायचं. प्रत्येक मराठी विक्रेत्याने स्वताची मराठी विक्रेता म्हणुन एखादी पाटी बाळगण्यास हरकत नाही.👇🏻