#चेर्नोबील_दुर्घटना
#Chernobyl_Disaster
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात जैतापुर (माडबन) येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित 9,900 मेगावॉट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पास स्थानिक नागरीकांसह पर्यावरण प्रेमींचा इतका प्रखर विरोध का??? काय असेल यामागचे कारण???.....
या प्रश्नाचे उत्तर शोधताना अणुऊर्जा प्रकल्प हा एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यास किती धोकादायक असु शकतो याचा विचार केला गेला पाहीजे. अशाच एका दुर्दैवी अणुऊर्जा प्रकल्प दुर्घटनेचे जगातील सर्वात विनाशकारी उदाहरण म्हणजे चेर्नोबील दुर्घटना. दिनांक 26 एप्रिल 1986.....
तात्कालिन सोविएत युनियन (USSR Union of Soviet Socialist Republic) चा भाग असलेला युक्रेनच्या (Ukrainian SSR) प्रिप्यत शहराजवळ चेर्नोबील येथे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या विनाशकारी दुर्घटनेनंतर अणुऊर्जा प्रकल्पाचे विध्वंसक आणि गंभीर धोके प्रकर्षाने जगासमोर आले.....
26 एप्रिल 1986 रोजी चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पाच्या 4 क्रमांकाचा अणुभट्टी मध्ये विध्वंसकारी स्फोट झाला आणि क्षणात सारे होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेचे मुख्य कारण म्हणजे सोविएत युनियनच्या काळात बनवल्या गेलेल्या या अणुभट्टीच्या आराखड्यामधील त्रुटी आणि ऊर्जा निर्मिती.....
सुरक्षा चाचणी दरम्यान केलेले नियमांचे उल्लंघन. International Nuclear and Radiological Event Scale म्हणजेच INES ने या दुर्घटनेला सर्वाधिक तीव्रतेची सातव्या स्तराची गंभीर दुर्घटना म्हणुन जाहीर केले. दुर्घटनेनंतर लागलेली आग विझवताना आणि स्फोटामुळे पसरलेल्या आण्विक इंधनातून.....
पसरलेल्या आण्विक संसर्गामुळे 56 कामगारांचा म्रुत्यु झाला. हवेद्वारे हे आण्विक इंधन वाफ होऊन सर्वदूर पसरले, ज्याच्या संसर्गामुळे 4,000 लोकांचा कर्करोगाने म्रुत्यु झाला. चेर्नोबील चा हा अणुऊर्जा प्रकल्प ज्या प्रिप्यत शहराजवळ होता ते पुर्णपणे ओस पडले. अणुऊर्जा प्रकल्पाचे.....
अधिकारी, कर्मचारी तसेच जवळपास इतर 50,000 नागरीक प्रिप्यत शहरात राहत होते जे चित्रपटगृह, ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव आणि लहान मुलांच्या मनोरंजसाठी पार्क यासारख्या सोयींनी सुसज्ज होते. चेर्नोबील दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल 1986 रोजी प्रिप्यत शहराच्या.....
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आज ते एक Ghost City म्हणुन ओळखले जाते, जे तिथे पसरलेल्या आण्विक इंधनाच्या किरणोत्सर्गामुळे आजही राहण्यायोग्य नाही तसेच पुढील 1,000 वर्षे तरी ते राहण्यायोग्य नसेल.
अशा भयंकर दुर्घटना जगात फक्त दोनच ठिकाणी घडल्या आहेत (दुसरी फुकुशिमा, जपान).

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pritish Mane (Стойкий Мужик)

Pritish Mane (Стойкий Мужик) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Pritish_S_Mane

20 Nov
#ऑस्कर_शिंडलर
#Oskar_Schindler
आत्ताच्या चेक प्रजासत्ताकमध्ये जन्मलेला एक ख्रिश्चन जर्मन उद्योजक, हिटलरच्या नाझी पार्टी चा सदस्य ज्याने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात तब्बल 1,200 ज्यू लोकांचे प्राण वाचवले आणि जगासमोर मानवतेचा एक आदर्श निर्माण केला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात.....
हिटलर च्या नाझी पार्टी ने ज्यू लोकांचा क्रूरपणे संहार करण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांना भर रस्त्यात गोळ्या घालून आणि गॅस चेंबर्स मध्ये कोंडून विषारी गॅस द्वारे मोठ्या प्रमाणात त्यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आला. जर्मन नाझी सैन्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप मधुन.....
ज्यू लोकांचा समूळ नायनाट करणे हाच हिटलर चा उद्देश होता. ऑस्कर शिंडलर यांनी त्या काळी नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या पोलंड मधे Enamelware आणि Ammunition चे कारखाने चालू केले आणि जगातल्या सर्वोत्तम, कुशल समजणाऱ्या जाणाऱ्या ज्यू लोकांना तेथे काम दिले. सुरुवातीच्या.....
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!