एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती...
सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.
४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
संकल्पना होती - "आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र"
एक असे केंद्र जे तरुणाईला अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम व्यक्ती होण्याची प्रेरणा देईल.
मुळशी तालुक्यात अनेक होतकरू तरुण तरुणी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणी किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरत होते.
त्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुरू करण्यात आले. आज चार वर्षानंतर त्यातील कित्येक गरीब घरातील मुले - मुली मोठ्या पदावर अधिकारी झाल्याने कष्टाचे सार्थक झाल्याचे समधान मनाला लाभते.
जे अधिकारी आज मोठ्या पदावर आहेत तेच सुट्टी काढून आवडीने नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला येतात. कित्येक जण तर असे आहेत की आधी घरी जाण्याआधी पहिलं पाऊल त्यांचं पहिलं पाऊल इकडेच वळत.
काही वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यामध्ये गुन्हेगारीचा एक वेगळाच पॅटर्न तयार झाला होता त्यातून "मुळशी पॅटर्न" नावाचा एक मराठी चित्रपटही निघाला होता.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही अभ्यासिकेस भेट देऊन फेसबुक लाईव्ह वरून मदतीचे आवाहन केले होते.
मात्र लढाई अजुन संपलेली नाही हे माहिती असल्याने यावर्षी नवरात्रीत नवीन १५०० स्के. फुट सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला आणि लगेचच कोजागिरी पौर्णिमेला भूमिपूजन करत कामास सुरुवात केली.
अभ्यासिका उभारण्यासाठी येणारा खर्च मोठा होता आणि कोविड महामारीमुळे दानशूर व्यक्ती पुढे येण्याची शक्यता ही कमीच होती.
तरीही आई तुळजा भवानीचा आर्शिवाद म्हणा किंवा अजुन काही अभ्यासिकेचे काम एक ही दिवस थांबले नाही.
अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ३५ मुलं आणि १५ मुलींनी स्वतः घमेली, खोरे हातात घेत, गवंड्यांच्या हाताखाली काम करून ही वास्तू अवघ्या महिनाभरात उभी केली.
उद्या २६/११ मुंबई हल्ल्याचा स्मृतिदिन...
आणि याच दिवशी अभ्यासिकेचे लोकार्पण करून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा आम्हा सर्वांचा छोटासा प्रयत्न...!!
जय हिंद 🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
इंग्रजांना भारतातून हाकलून दिल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही.
काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत पिंगली वैंकय्या यांनी बनवलेला झेंड्यावर आधारित #तिरंगा "राष्ट्रीय ध्वज" म्हणून स्वीकारला गेला.
२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.
१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.
संघाचे तृतीय वर्ष शिबीर सुरु होते..
दरम्यान २ स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं. खरंतर स्वयंसेवकांमध्ये "भांडण" हा प्रकार तसा संघाला नवीन..
सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल म्हणून दुर्लक्ष केल गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं.
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार?" म्हणून..
दोघांनाही त्यात प्रचंड रस होता आणि त्याच पदामध्ये, दुसऱ्या कोणत्याही पदामध्ये नाही. तडजोड कोणालाच मान्य नव्हती..
दोघांचा एकमेकांना प्रचंड विरोध होता. प्रसंगी, मारामारीसुद्धा झाली. दोघांची बाजू ऐकून सोक्षमोक्ष लावायचा ठरलं..
एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. दुसऱ्याचे म्हणणे होते,"एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही."
आद्य भारतीय समाजसुधारक व युगपुरुष "महात्मा बसवेश्वर" यांची आज जयंती..!!
त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी त्यांचा जन्म ११०५ साली वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा हा अल्प परिचय (थ्रेड)👇
बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता.
बसवेश्वर हे वेदशास्त्रात,धनुर्विद्येत पारंगत असल्याने राज्याचे प्रधान झाले.त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली.
रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या.
पुढे, बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत समाजाची स्थापना केली व त्याच्या प्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले.