२६/११ म्हणलं की शरीर एकदम थरथरायला होतं. रात्री तुळजापूरहुन येताना अचानक वडिलांना फोन आला, मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला झाला. पहिल्यांदा ते सगळ्यांना बॉम्बब्लास्ट वाटला. संपूर्ण महाराष्ट्रात चेकिंग सुरू झाले. #MumbaiTerrorAttack
(1/6)
पुण्याला रात्री १२ ला पोचलो आणि संपूर्ण पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त. घरी जाऊन टीव्हीवर बघितले आणि सगळेच घाबरले. पूर्ण ३ दिवस हे नाटक चालले आणि शेवटी आपल्या सुरक्षाकर्त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.. #MumbaiTerrorAttack
(2/6)
तुकाराम ओंबाळे यांचे आभार आपण कोणत्याच शब्दात मानू शकत नाही. शक्यच नाही ते. जिवंत कसाब सारख्या अतिरेक्याला त्याच्या हातात एके 47 असताना पकडणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे !
तुकाराम ओंबाळे होते म्हणून आज भारतातील हिंदू ताठ मानेने जगतोय. #MumbaiTerrorAttack
(3/6)
नाहीतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी '२६/११ - RSS की साजिश' हे पुस्तक लिहून अत्यंत निष्णातपणे रा.स्व.संघाला अडकवायचा प्लॅन केला होता. आणि हिंदू दहशतवाद या शब्दाला त्यांनी योग्यरीत्या जनतेसमोर घेऊन जाण्याचा प्लॅन त्यांचा होता. #MumbaiTerrorAttack
(4/6)
हुतात्मा ओंबाळे यांनी आपल्या जीवावर उदार होऊन कसाब सारख्या दहशतवाद्याला पकडले आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री असो की पी चिदंबरम असो की सोनिया गांधी असो यांचा प्लॅन अक्षरशः नेस्तनाबूत केला. #MumbaiTerrorAttack
(5/6)
आजच्या दिवशी हुतात्मा तुकाराम ओंबाळे असोत की त्या हल्ल्यात हुतात्मा झालेले करकरे, कामठे किंवा साळसकर असे अनेक पोलीस अधिकारी, संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह आपले जवान आणि सामान्य नागरिक असोत, सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #MumbaiTerrorAttack
(6/6)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राफेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा पवार साहेबांचा डबलढोलकीपणा. एकदा म्हणतात पंतप्रधानांच्या हेतूबद्दल शंका नाही मग म्हणतात मोदींची पाठराखण नाही.. #दुतोंडी_साहेब#१२_मतीचे_राजकारण#शरद_पवार