"शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवू नका!"
"प्रत्येक सरकार विरोधक पाकिस्तानी नसतो!"
"शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून, संवाद साधायला हवा...!"

फार्म बिल वाचलेलं नाही. बातम्यांमधून समोर दिसणारं चित्र बघितलेलं नाही. ज रा दोन एक तास अभ्यास करून नेमकं काय घडतंय ते ही समजून घेतलेलं नाही.

१+
पण मोठमोठ्या गप्पा तेवढ्या हाणायच्यात.

"विरोध करणं हा हक्क आहे!"

"आंदोलनांमधूनच लोकशाही सशक्त होते!"

बाप रे बाप!

अरे पण आंदोलन कोणत्या प्रश्नासाठी, कोणत्या मुद्द्यावर आहे, त्यामागची वस्तुस्थिती काय, आंदोलन करणारे नि आंदोलनाचं समर्थन करणारे जे प्रश्न उभे करताहेत ते -

२+
व्हॅलिड तरी आहेत का - याचा काही विचार कराल की नाही?

इथे एक्स्पर्ट ओपिनियन फेकताना, तुम्हाला फार्म बिल २०२० नेमकं काय आहे हे तरी माहितीये का?

हे २ वेगवेगळे बिल आहेत.

एक आहे The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services bill, 2020.

३+
दुसरं आहे The Farmers’ Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill, 2020.

फार मोठे नाहीत - ८-८ पानांचे आहेत. फार क्लिष्टही नाहीत. सोप्या सुटसुटीत भाषेत आहेत. खाली फूटनोटमध्ये दोन्ही बिल्सच्या लिंक्स देतोय. वाचून घ्याल.

लोकशाही सशक्त करायला फक्त

४+
आंदोलनंच करायला हवीत असं काही नाही...कायदे वाचून, समजून घेऊन त्यानुसार कृती करणं - हा सुद्धा लोकशाही सशक्त करण्याचा मार्गच आहे, नाही का?

तर या दोन्ही बिलांमध्ये काय आहे?

पहिल्या बिलात खरेदी-विक्रीतील करार, किमतीची हमी वगैरे गोष्टींवर फोकस आहे. दुसऱ्या बिलात हे व्यवहार

५+
होण्यासाठी "मुक्त यंत्रणा" कशी असणार आहे याची पॉलिसी आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, इंटर-स्टेट इंट्रा-स्टेट ट्रेडिंग कशी असावी याचं फ्रेमवर्क आहे.

शेतकऱ्यांना त्यांचा माल खाजगी एंटिटीजना विकण्यासाठी कोणती प्रोसिजर फॉलो करायला हवी याची आऊटलाईन दिलीये. अगदी - किंमत कशी ठरवावी -

६+
इथपासून डिलिव्हरी कशी घ्यायची - मालाच्या डिलिव्हरीच्या आधी किती पैसे द्यायचे, नंतर किती दिवसांत पूर्ण द्यायचे वगैरे सगळं कायद्यात स्पष्टपणे लिहिलं आहे.

हे करार (शेतकरी आणि माल विकत घेणारे खाजगी डिस्ट्रिब्युटर्स वगैरे यांच्यात होणारे करार) इन्श्युरन्स लिंक्ड असू शकतात, या

७+
प्रक्रियेवर केंद्र / राज्य / केंद्र वा राज्याने ठरवलेल्या संस्थेची देखरेख असेल, किमतीमध्ये व्हेरिएशन असेल तर ते कसं केलं जाईल, खरेदीदारावर कसकशी बंधनं असतील वगैरे इत्यंभूत कलमं-उपकलमं आहेत.

इतकंच नाही - शेतकरी माल देऊ शकला नाही तर काय, खरेदीदाराने घोळ घातला तर काय - यावर

८+
डायरेक्टिव्ह्ज आणि हे असे वाद कसे, कुठे सोडवले जातील याचीदेखील आखणी करून दिली आहे.

हे वाचताना यात शेतकरी किती प्रोटेक्टेड आहे हे प्रत्येक ठिकाणी जाणवतं.

हे सगळं वाचताना सतत शरद जोशी सरांपासून विविध शेतकरी संघटना, कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या डोळ्यासमोर तरळून जातात.

९+
शेतकऱ्याला फुकट काहीच नको - त्याला त्याचा धंदा हवा तसा, हवा त्याच्याशी करण्याचं स्वातंत्र्य द्या - शेतीला मोकळा श्वास घेऊ द्या - या कित्येक दशकांच्या मागण्या पूर्ण होताना दिसतात.

जोडीला, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही - हे ही जाणवतं.
एमएसपीवर वादंग होतोय.

पण सरकारने -

१०+
किमान आधारभूत किंमतींपासून माघार घेतलेलीच नाही.

सरकारच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त किंमत मार्केटमध्ये मिळाली तर त्याचा फायदा घेण्याचं स्वातंत्र्य या बिलाने दिलं आहे. आधी हे स्वातंत्र्यच नव्हतं...त्यामुळे सरकार भरोसे काम होतं.

आता मार्केट कंडिशन्स, एक्स्पोर्ट सिनारिओ

११+
नुसार "अधिक" भाव मिळण्याचा पर्याय खुला झालाय.

मुळात कित्येक अर्थशात्रज्ञ म्हणतात की एमएसपी अल्पभूधारक शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळवून देत नाहीत. भरपूर जमीन, भरपूर पीक काढण्याची क्षमता आणि अर्थपूर्ण कॉन्टॅक्टस असणाऱ्या मूठभर शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होतो.

१२+
इतकी वर्षं एमएसपी असूनही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच होत्या. म्हणजेच या सिस्टीमध्ये कच्चे दुवे आहेतच!

एमएसपीच्या पलीकडे जाऊन नवे पर्याय देण्याची आवश्यकता आहे हे सिद्ध होतं. शेतकऱ्यांना खुल्या मार्केटमध्ये विक्रीची परवानगी म्हणजे हेच अनंत पर्याय खुले करणं आहे.

१३+
स्वतःच्या मालाचं मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन वगैरे करण्याची शक्ती नसणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना छोट्या छोट्या स्टार्टअप्स पासून मोठ्या कॉर्पोरेट्स पर्यंत अनेकांचा टेकू मिळाल्याने त्यांचा किती ताण कमी होईल कल्पना करून बघा.

१४+
कित्येकदा दिसतं की एखादं पीक वारेमाप आलं की भाव मातीमोल होतात. शाळेत लाल चिखल नावाचा धडा होता...भास्कर चंदनशिव यांचा.

त्यांचा कष्टकरी शेतकरी बाप भाव घसरलेल्या टमाट्यांच्या राशी चिखलात ओतून पायाने तुडवतो - ते शब्दचित्र आजही मेंदूवर चिकटलेलं आहे.

१५+
पीक येण्याआधीच - येणं नव्हे, पेरणीच्या वेळीच भाव ठरून, अॅड्वान्स घेऊन मोकळा झालेला शेतकरी किती रिलॅक्स जगेल?

ठरलेला दर्जा पुरवला की संपला विषय. मग पीक किती का येईना.
आता याचा अर्थ हे २ बिल आले म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत का? अर्थातच नाही.

१६+
आधीच्या सिस्टीमध्ये जसे दोष होते तसे यातही असतील. ते दूर करत रहावे लागतीलच. इट्स गोईंग टू बी अ कंटिन्यूअस प्रोसेस.

पण संभाव्य त्रुटी आहेत म्हणून बदल करायचेच नाहीत असं म्हणून चिखलात रुतलेलं चाक हलवायचंच नाही, असं म्हणून कसं चालेल?
सध्या होत असलेला विरोध याच प्रकारचा आहे.

१७+
या बिलावर घेतल्या जाणाऱ्या शंका इतक्या हास्यास्पद आहेत की त्या बघितल्यावर शंका घेण्याऱ्याच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उपस्थित रहातंच.

एमएसपी "संपवणार" हा प्रचार असाच. एमएसपी कायमच असणार आहेत हे वेळोवेळी सांगितलं आहे सरकारने. APMC सुद्धा आहेत तश्याच कार्यरत असणार आहेत.

१८+
आहे ते स्ट्रक्चर जसंच्या तसं असणार आहे. फक्त त्या स्ट्रक्चरला सकस स्पर्धा निर्माण केली जाईल जेणेकरून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक वातावरणाचा फायदा मिळवता येईल.

एमएसपीबद्दल लिखित वचनं का नाहीत, हा असाच एक हास्यास्पद प्रश्न.

अहो आजपर्यंत कधी लिखित होतं?

एमएसपीचे आकडे कायद्यात -

१९+
कधीच घातले गेलेले नव्हते. ते नेहेमी वर्तमान परिस्थिती बघून ठरवल्या जाणाऱ्या प्रोसिजर्सचा भाग होते. यापुढेही तसंच असणार आहे.

ट्विटरवरतर एकामागे एक जोक होताहेत...आणि मीडिया चक्क त्यांना हवा देतीये.

२०+
एकाने विचारलं

"कॉन्ट्रॅक्ट झाला, शेतकऱ्याने कंत्राटाच्या भरवश्यावर पीक घेतलं आणि मग "ह***र बिग बुली कॉर्पोरेट्स"नी पीक विकत घेण्यास नकार दिला तर? शेतकरी वाऱ्यावर सोडणार का? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?"

या अश्या ट्विट्सना माध्यमं उचलून धरताहेत...!

२१+
किमान बिल वाचून तर घ्यायचं यार...!

असे कॉंट्रॅक्टस कॅन्सल केले गेले तर खरेदीदाराकडून पैसेच नव्हे, जबर दंडही वसूल केला जाणार आहे.

सब लिखा है बिल में...पढ तो लो साब!

म्हणूनच सुरुवातीला म्हणालो तसं - या आंदोलकांवर "शंका" घेऊ नका म्हणण्याआधी या मुळात या आंदोलकांच्या शंका

२२+
नेमक्या काय आहेत हे बघा.

या आंदोलनांमध्ये आर्टिकल ३७० आणि ३५ए चे बॅनर्स कशाला?

भिंद्रानवालेच्या आठवणींत टिपं गळणारे लोक कसे?

ज्या बिलामुळे फक्त आणि फक्त सरंजाम आणि मिडलमन्सचे धंदे बंद होणारेय - त्यांवर चिडून उठणारे "सामान्य शेतकरी" कसे?

२३+
हे लोक शेतकरी नसून पॉलिटिकल स्कोअर सेटलिंग होत आहे हेच वरील संपूर्ण चित्र बघितल्यावर जाणवत नाही का?

अर्थात...हे सगळं डोंबिवलीतल्या एसी हॉलमध्ये बसून कुणीतरी "दाभाडकर" आडनावाचा माणूस लिहितोय म्हणून थेट रद्द करता येऊ शकतंच.

२४+
खलिस्तान हवं आहे असं म्हणणाऱ्या माणसाला टीव्हीवर बोलावून

"तुझी खरी बाजू कळायला हवी लोकांना...म्हणून मी बोलावलं...पण तू तर अतिरेक्यांचा समर्थक निघालास"

असं हताशपणे बोलणारी बरखा दत्त तेवढी शेतीवरची एक्स्पर्ट आणि खरी कळकळ असणारी.

२५+
बिल वाचून, हे बिल शेतकरी संघटनाच्या जुन्या मागण्या पूर्ण करणारं हे सिद्ध करून - शिवाय - यातही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याबद्दल चर्चा आवश्यक आहे - पण पुढची स्टेपच घेऊ नका ही मागणी अयोग्य आहे - असं म्हणणारा माणूस मात्र हलबाड आहे.

असेलही बापडा.

तुम्ही नाही आहात ना लबाड?

२६+
मग विनंती इतकीच की युटोपियन पोपटपंची करण्याआधी स्वतः वास्तव समजून घ्या प्लिज!

बिलच्या लिंक्स :

१. egazette.nic.in/WriteReadData/…
२. http://164.100.47.4/.../PassedLoksabha/113_2020_LS_Eng.pdf

ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

2 Dec
भारतीय बेरोजगारीचं चित्र दाखवणारे cmie चे नवे आकडे रिलीज झालेत. अधिकृत आकडे म्हणतात बेरोजगारीचा दर ६.५१ पर्यंत कमी झालाय. अर्थात शहरी आकडा ७.०७ आहे. ग्रामीण ६.२६ असल्यामुळे सरासरी ७ पेक्षा कमी आहे.

म्हणजेच अर्बन बेरोजगारी तितकी कमी झालेली नाही. रोज linkedin वर

१+ Image
"कोव्हिडमुळे नोकरी गेलीये...मदत हवीये" म्हणणाऱ्या पोस्ट्स येत आहेतच. पण आपलेच एप्रिल मे जुनचे भयानक आकडे पहाता हे आकडे दिलासादायक वाटतात.

डिसेंम्बरमध्ये आपण सध्या आहे तो रेटा कायम ठेवला तर द वर्स्ट इज बिहाईंड म्हणता येऊ शकेल अशी आशा वाटतीये.

२०२१ दणक्यात नाही, पण -

२+
सावरण्याच्या नोटवर सुरू झालं तरी जिंकलं.

या सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करतो.

सरकार (केंद्र वा राज्य) अश्यावेळी काहीही उपयोगी पडत नाही. पडूच शकत नाही. जे काही सकारात्मक आकडे दिसताहेत ते लोकांनी आपल्या बळावर आपल्या समस्या सोडवल्या म्हणून.

३+
Read 8 tweets
29 Nov
समस्त न-डाव्या मंडळींनी - किमान महाराष्ट्रापुरतं जरी म्हणायचं झालं तरी - सर्वप्रथम काही करायला हवं असेल तर - खऱ्या महाराष्ट्र-द्रोही लोकांची नसती कौतुकं बंद करणं.

कुणीतरी स्वतःला जाणता राजा म्हणवतो, कुणी दीन-दुबळ्या बहुजनांचा नेता, कुणी काय तर कुणी काय. हे तर झाले राजकारणी.

१+
सामाजिक कार्यकर्ते म्हणून उभं आयुष्य वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे बटीक झालेले "महान" लोक सुद्धा विनाकारणच आदरणीय, वंदनीय वगैरे म्हणवले जातात.

एवढेच जाणते होतात तर महाराष्ट्रात अजूनही शेतकरी आत्महत्या का करतो? अख्ख्या महाराष्ट्राचे नेते होतात तर कधी तीन आकडी आमदार ही

२+
निवडून आणणं का जमलं नाही? गरीब बहुजनांचे नेते आहात तर तुमच्या प्रॉपर्टीज अवाढव्य कश्या? घोटाळ्यामध्ये नावं येताच फक्त तेवढी बहुजनांची गर्दी कधी आठवते?

पु लो द सारख्या राजकीय साठमारीत, महाराष्ट्राला उभा आडवा फाडून खाणाऱ्या विकृत सरंजामी नेत्यांचा प्रचार उघडपणे करणारे विचारवंत

३+
Read 7 tweets
26 Nov
फडणवीसांच्या पत्नीचा "अपमान" झाल्याने कळवळून उठणारे लोक डाव्या इकोसिस्टिमशी लढूच शकत नाहीत. कारण त्यांना लढाई "का" लढायची आहे आणि मग "कुणाशी" लढायची आहे याचं काहीच भान नाहीये.

ज्या ट्रोल्सनी फडणवीस, त्यांची पत्नी, मातृ संस्था यांच्यावर घसरण्याची एकही संधी सोडली नाही -

१+
त्याच ट्रोल्सना पोसणाऱ्या नेत्याला कोव्हिड झाला तर खास विचारपूस करायला फोन करतात खुद्द फडणवीसच!

सौ फडणवीस सोडाच! मोदी शहांबद्दल उच्चभ्रू वर्तुळात कसल्या घाणेरड्या कंडया पिकवल्या जातात तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या दोघांच्या नावाने इतक्या विचित्र गोष्टी रुजवल्या जाताहेत

२+
की आठवल्या तरी कसं तरीच होतं. कोण करतं हे सगळं? असे पत्रकार जे महाराष्ट्रात फार मोठ्या ठिकाणी बसलेले आहेत.

यावर फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप काय करताहेत?! अर्थातच काहीच नाही.

तर, फडणवीसांच्या बायकोच्या शरीरावर शेरेबाजी करणाऱ्या लोकांना गोड गोड हसत खुद्द फडणवीस जपत असतात...

३+
Read 13 tweets
9 Nov
न-डाव्या मंडळींची इज्जत वेशीवर लटकवणारा अर्णब गोस्वामीचा धडा

===

आपण सोशल मीडियावर राजकीय भांडणं करत असताना एक फॉल्स सेन्स ऑफ अॅक्टीव्हीजम घेऊन वावरत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतोय. किंवा चांगलं विरुद्ध वाईटाच्या लढाईत

१+
चांगल्याची बाजू घेतोय, त्या बाजूला शक्ती मिळवून देतोय.

वास्तवात आपण फक्त रिअॅक्ट होत असतो. त्यातून दूरगामी आणि मूलभूत परिणाम साधणारं काही घडत असतंच असं नाही. हे सर्वसामान्य सोशल मीडिया "वॉरियर"वर विशेषच लागू पडतं.

अर्णब गोस्वामीला आज जामीन मिळाला नाही -

२+
यातून आपण सर्वांनी गेल्या ६ वर्षात काय कमावलं याचं उत्तर मिळतं.

आपण - म्हणजे भारतातल्या न-डाव्या मंडळींनी काय मिळवलंय?

शून्य.

मोदी दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसणे - बस हे एक मतपेटीतून घडवून आणलेलं निडवणुकीच्या काळातील मोठं यश. पण ते निडणुकीचं यश.

३+
Read 19 tweets
6 Oct
"महाराष्ट्रात सावळागोंधळ आहे. सगळ्या व्यवस्थांचा फज्जा उडालाय. अत्याचाराच्या घटना घडताहेत. सरकारला हे काहीच दिसत नाही का? मीडिया हे सगळं का दाखवत नाही? यावर लिबरल पुरोगामी काहीच का बोलत नाहीत?"

या अर्थाच्या बऱ्याच पोस्ट्स, ट्विट्स दिसताहेत.

सगळं खरंय. प्रश्न वेगळाच आहे.

१+
सत्ताधारी पक्ष, मीडिया, पुरोगामी कसे आहेत आपल्याला आधीपासून माहितीये. हज्जारदा दाखवून झालंय. या पूढेही दाखवत राहूच. पण उपयोग काय?

विरोधी पक्षच या सर्वांकडे दुर्लक्ष करून कोणत्यातरी अतर्क्य अस्पष्ट मृगजळाकडे बघत जिभल्या चाटत बसला असताना तुम्हीआम्ही ओरडून काय उपयोग होणार?

२+
"आरक्षण मागतोय तुझी बायको नाही" छाप प्रचार करणाऱ्यांना गळ्याशी घेणारा, आपल्या मातृ-संस्थेवर अन केंद्रीय नेतृत्वावर दिवसरात्र घसरणाऱ्या मंडळींशी सलगी करणाऱ्या, ज्या प्रश्नांसमोर जनता निव्वळ हताश झालीये त्यांना १०५ आमदारांची फौज असूनही स्पर्शही नं करणाऱ्या -

३+
Read 5 tweets
26 Sep
भेट खरोखर कशामुळे/कशासाठी झाली, मुलाखत देतील की नाही, एकत्र येतील का, सरकार बनवतील का : हे सगळे चुकीचे मुद्दे आहेत.

ते जेव्हा होईल तेव्हाचं.

या लोकांना बोलता-भेटताच कसे, डील करताच कसे - हे आजचे, खरे महत्वाचे प्रश्न महत्वाचे आहेत.

१+
राजकारणात सगळं क्षम्य असतं म्हणत म्हणत आपल्या केंद्रीय नेतृत्वाला शिव्या घालणाऱ्या, आपल्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ट्रोल्सना मार्गदर्शन करणाऱ्या, आपल्या संघटनेवर अश्लाघ्य घसरणाऱ्या -

२+
अश्या लेव्हलच्या लोकांशी महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वाने गुडीगुडी बोलणं, गोड हसत मुलाखती देणं, गळ्यात पडणं समर्थनीयच नव्हे, धूर्त राजकारण ठरवलं जात असेल तर कठीण आहे.

तुमचं पक्षीय राजकारण काही का असेना, आय डोन्ट केअर. पण हे राजकारण नकोय आम्हाला. या राजकारणाचा

३+
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!