फडणवीसांच्या पत्नीचा "अपमान" झाल्याने कळवळून उठणारे लोक डाव्या इकोसिस्टिमशी लढूच शकत नाहीत. कारण त्यांना लढाई "का" लढायची आहे आणि मग "कुणाशी" लढायची आहे याचं काहीच भान नाहीये.
ज्या ट्रोल्सनी फडणवीस, त्यांची पत्नी, मातृ संस्था यांच्यावर घसरण्याची एकही संधी सोडली नाही -
१+
त्याच ट्रोल्सना पोसणाऱ्या नेत्याला कोव्हिड झाला तर खास विचारपूस करायला फोन करतात खुद्द फडणवीसच!
सौ फडणवीस सोडाच! मोदी शहांबद्दल उच्चभ्रू वर्तुळात कसल्या घाणेरड्या कंडया पिकवल्या जातात तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या दोघांच्या नावाने इतक्या विचित्र गोष्टी रुजवल्या जाताहेत
२+
की आठवल्या तरी कसं तरीच होतं. कोण करतं हे सगळं? असे पत्रकार जे महाराष्ट्रात फार मोठ्या ठिकाणी बसलेले आहेत.
यावर फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप काय करताहेत?! अर्थातच काहीच नाही.
तर, फडणवीसांच्या बायकोच्या शरीरावर शेरेबाजी करणाऱ्या लोकांना गोड गोड हसत खुद्द फडणवीस जपत असतात...
३+
मोदी शहा संघावर घसरणाऱ्या लोकांना हरप्रकारे मदत करतात. अगदी सत्तेत असतानाही, नसतानाही.
तुम्हाला कसली इतकी फिकीर पडलीये मग बाबांनो?!
माझा मुद्दा फडणवीस चांगले की वाईट हा नाही. त्या पुढचा आहे. फडणवीस, भाजप काहीतरी व्यूह ठरवून काम करत असतील असं गृहीत धरू. ते भले,
४+
त्यांचं राजकारण भलं.
आपलं काय?
आपण सोशलमीडियावर का भांडतो? काय हेतू असते?
कोणत्या ना कोणत्या प्रकारे चांगल्या विरुद्ध वाईटच्या लढाईत सहभाग घ्यायचा असतो म्हणून.
अमृता फडणवीसांचा अपमान होताना बघून पेटून उठताना तुम्हाला वाटतं की तुम्ही या लढाईत सहभागी होताय.
५+
वास्तवात तुम्ही खऱ्या लढाईच्या बाहेर फेकले जाता.
खरं युद्ध कोणतं? दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो क्षणिक प्रकरणांवर नसा ताणून लढण्याचं? की डावी यंत्रणा पराभूत करण्यासाठी आपण आपली सिस्टीम उभारण्याचं?
अर्णब गोस्वामी अटक प्रकरणातून आपण काहीच शिकलो नाही का?
प्लिज रिमेम्बर -
६+
अर्णब चांगला की वाईट - हा मुद्दा महत्वाचा नाही. अर्णब सारखा माणूस सहज उचलला जातो आणि ती कृती लोकशाही प्रक्रिया म्हणून सहज रेटली जाते : विरुद्ध : मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने भिकार भंगार लायकीचे टवाळक्या करणारे तथाकथित पत्रकार खंडणी उकळण्याचं रॅकेट चालवतात, तर त्यांना फक्त
७+
चौकशीसाठी बोलावल्यावर लोकशाहीच्या गळ्यात नख लावल्यागत थयथयाट होतो.
हा आहे तुमच्या युद्धाचा कॅनव्हास.
कोण आहेत हे हxxxर लोक? यांनी चौकशीस सामोरं जाऊ नये असं कोणतं दिव्य कर्म केलंय? चिरकूट एजंटगिरी सोडल्यास कर्तृत्व काय यांचं? पण यांनी महिनाभर महाराष्ट्र वेठीस धरला.
८+
कारण यांनी वर्षानुवर्षे तसं सशक्त नेटवर्क उभं केलं आहे.
आपलं युद्ध "हे" आहे.
फडणवीस, मोदी, भाजप सगळं ठीक. पण राष्ट्रप्रथम हा यज्ञ असेल तर हे सगळे साधन आहेत, साध्य नव्हे. न-डावी सिस्टीम उभी रहाणे हे आपलं साध्य हवं. त्यात प्रस्थापित लोकांनी सहभाग घेतला तर उत्तम. नाही घेतला -
९+
तरी वूई डोन्ट केअर...काम सुरू हवं.
तुम्ही दिवसरात्र रोजच्या रोज नव्या ट्रेंडिंग टॉपिकवर २०-२० शब्दांची रंगीबेरंगी शाब्दिक रांगोळी रंगवत रहाताय.
याने कसली न-डावी सिस्टीम उभी राहील?
मी व्यक्तिशः अश्या लोकांना ओळखतो जे करिअरच्या नाजूक टप्प्यावर आहेत.
१०+
जर पुढच्या १० वर्षांत यांनी कंबरतोड मेहनत घेऊन आर्थिक आणि सामाजिक सुबत्ता कमावली तर त्यातून न-डावी रसद सहज सुरू होऊ शकते.
पण ते व्हिजन आहे का?
फेसबुकवर अहमद पटेल कसे वाईट होते नि शिवसेना कशी बदलली आहे यावर २ तास घालवल्याने होणार का हे साध्य?!
११+
मागे जे लिहिलं तेच आज पुन्हा लिहितो.
अमुक एक राजकीय पक्ष, नेता आवडतो यात चूक काहीच नाही. त्यासाठी लिहिणं-भांडणं देखील ठीकच. पण "फक्त तेवढंच" करत राहिल्याने काहीही साध्य होणार नाही. ते करत राहिलो १० वर्षांपूर्वी ज्या तक्रारी होत्या त्याच तक्रारी अजूनही १० वर्षांंनंतर -
आपण सोशल मीडियावर राजकीय भांडणं करत असताना एक फॉल्स सेन्स ऑफ अॅक्टीव्हीजम घेऊन वावरत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतोय. किंवा चांगलं विरुद्ध वाईटाच्या लढाईत
१+
चांगल्याची बाजू घेतोय, त्या बाजूला शक्ती मिळवून देतोय.
वास्तवात आपण फक्त रिअॅक्ट होत असतो. त्यातून दूरगामी आणि मूलभूत परिणाम साधणारं काही घडत असतंच असं नाही. हे सर्वसामान्य सोशल मीडिया "वॉरियर"वर विशेषच लागू पडतं.
अर्णब गोस्वामीला आज जामीन मिळाला नाही -
२+
यातून आपण सर्वांनी गेल्या ६ वर्षात काय कमावलं याचं उत्तर मिळतं.
आपण - म्हणजे भारतातल्या न-डाव्या मंडळींनी काय मिळवलंय?
शून्य.
मोदी दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसणे - बस हे एक मतपेटीतून घडवून आणलेलं निडवणुकीच्या काळातील मोठं यश. पण ते निडणुकीचं यश.
"महाराष्ट्रात सावळागोंधळ आहे. सगळ्या व्यवस्थांचा फज्जा उडालाय. अत्याचाराच्या घटना घडताहेत. सरकारला हे काहीच दिसत नाही का? मीडिया हे सगळं का दाखवत नाही? यावर लिबरल पुरोगामी काहीच का बोलत नाहीत?"
या अर्थाच्या बऱ्याच पोस्ट्स, ट्विट्स दिसताहेत.
सगळं खरंय. प्रश्न वेगळाच आहे.
१+
सत्ताधारी पक्ष, मीडिया, पुरोगामी कसे आहेत आपल्याला आधीपासून माहितीये. हज्जारदा दाखवून झालंय. या पूढेही दाखवत राहूच. पण उपयोग काय?
विरोधी पक्षच या सर्वांकडे दुर्लक्ष करून कोणत्यातरी अतर्क्य अस्पष्ट मृगजळाकडे बघत जिभल्या चाटत बसला असताना तुम्हीआम्ही ओरडून काय उपयोग होणार?
२+
"आरक्षण मागतोय तुझी बायको नाही" छाप प्रचार करणाऱ्यांना गळ्याशी घेणारा, आपल्या मातृ-संस्थेवर अन केंद्रीय नेतृत्वावर दिवसरात्र घसरणाऱ्या मंडळींशी सलगी करणाऱ्या, ज्या प्रश्नांसमोर जनता निव्वळ हताश झालीये त्यांना १०५ आमदारांची फौज असूनही स्पर्शही नं करणाऱ्या -
भेट खरोखर कशामुळे/कशासाठी झाली, मुलाखत देतील की नाही, एकत्र येतील का, सरकार बनवतील का : हे सगळे चुकीचे मुद्दे आहेत.
ते जेव्हा होईल तेव्हाचं.
या लोकांना बोलता-भेटताच कसे, डील करताच कसे - हे आजचे, खरे महत्वाचे प्रश्न महत्वाचे आहेत.
१+
राजकारणात सगळं क्षम्य असतं म्हणत म्हणत आपल्या केंद्रीय नेतृत्वाला शिव्या घालणाऱ्या, आपल्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ट्रोल्सना मार्गदर्शन करणाऱ्या, आपल्या संघटनेवर अश्लाघ्य घसरणाऱ्या -
२+
अश्या लेव्हलच्या लोकांशी महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वाने गुडीगुडी बोलणं, गोड हसत मुलाखती देणं, गळ्यात पडणं समर्थनीयच नव्हे, धूर्त राजकारण ठरवलं जात असेल तर कठीण आहे.
तुमचं पक्षीय राजकारण काही का असेना, आय डोन्ट केअर. पण हे राजकारण नकोय आम्हाला. या राजकारणाचा
मॅनेजमेंटच्या जगात "अॅबिलिटी टू से नो!" - समोरच्याला नकार देता येणं - याला खूप महत्व असतं. हे "नाही", "नको", "नॉट इंटरेस्टेड" सगळ्याच बाबतीत वापरता यायला हवं.
बिझनेसमध्ये अनेक संधी समोर येतात - त्यातल्या कोणत्या निवडायच्या, कोणत्या सोडायच्या -
१+
हे कळायला हवं. अनेक प्रॉस्पेक्ट्स फार चटकन फळास येतील असे असतात. आपल्या बिझनेस मॉडलमध्ये थोडेसे बदल केले तर मोठ्या संधी समोर उभ्या राहू शकतात.
करायचे का हे बदल? करावेत का?
याचं ठोस उत्तर अर्थातच देता येत नाही. पण अश्या संधी जन्मभर समोर येत रहातील. दर ६ महिन्यांनी फोकस
२+
बदलत रहाणार का?
म्हणूनच "नॉट इंटरेस्टेड" म्हणत सरकणं आवश्यक असतं.
एखादा क्लायन्ट मोठं बिझनेस बकेट घेऊन येतो. पण त्याचा पूर्वानुभव अ ति श य वाईट असतो. रक्त जाळणारा प्रकार असतो. आपणच नाही, टीमला पण वैताग आणणारा, प्रॉडक्टिव्हिटी कमी करणारा प्रकार. अश्यावेळी विनयाने नकार देणं -
राजाकडे बघूनच जनता सैन्यात सामील होते. पण युद्ध दरवेळी स्वतः राजा येऊन कसा लढेल? त्यासाठी सेनापती, सुभेदार-सरदार असतात. ऐन रणांगणात सैन्य जिंकणार की हरणार हे राजा किती जबरदस्त आहे यावरून कमी - सेनापती आणि टीमने किती चांगली झुंज द्यायची ठरवलं आहे, सैन्य तश्या तयारीत
१+
बसवलं आहे का - यावरून ठरतं.
शत्रू तुम्हाला नेस्तनाबूत करतोय, जनतेचे हाल हाल करतोय वगैरे सगळं बरोबर. लिहा इतिहास. बखरी मागे बखरी होऊन जाऊ देत. पण त्याने होणार काय? वाईट लोक वाईटच वागणार. त्यांनी तोच त्यांचा धर्म ठरवलेला आहे. त्यांचं मतपरिवर्तन होणार नाहीच.
२+
जनतेने क्रूरांना शहाणपण शिकवणं, वाईट वर्तनाची तक्रार करणं वगैरे आपलं आपल्याला समजावण्यासारखं असतं.
खरा उपयोग, झालाच तर, सेनापतीच्या स्ट्रॅटेजिक आणि ठाम कृतिपूर्ण निर्धाराचा.
सेनापती आणि त्याचे सल्लागारच जर कायमस्वरूपी "शत्रूशी जुळवून घेऊ" छाप पांढरी निशाणं मिरवत असतील
श्रीमंत होण्याआधीच श्रीमंत दिसण्याचा नाद कसा नडतो हे येणाऱ्या काळात अनेकांना जाणवेल.
कोव्हीड - लॉक डाऊन - थिजलेली अर्थव्यवस्था आपल्या सर्वांना बॅक टू बेसिक्स घेऊन जाणार आहे.
भारतात नेहेमीपासून रुजलेलं "काटकसरी जीवन" गेल्या २-३ दशकातील कन्ज्युमरिज्मच्या वादळात
१+
गुडूप झाल्याची किंमत अनेकांना चुकवावी लागणार आहे.
कॉलेजातून बाहेर पडलेली, नुकतीच ८-१० हजार कमवायला लागलेली पोरं दर एक दिवसाआड कुठल्यातरी कॅफे - रेस्टोरंट - ढाब्यात मजा करतानाचे सेल्फी टाकायला लागतात. जॉब लागल्यालागल्या इएमआयवर कार, किमान वन बीएचके, त्यातही काटेकोर फर्निचर
२+
हे सगळं जणू कम्प्लसरीच झालंय. दर ६ महिन्याला मोबाईल बदलणारे अनेक लोक आयटीत ऐटीत जगतात.
लग्न "दणक्यात" होणं म्हणजे काय याच्या व्याख्या काहीच्या काही अफाट झाल्या आहेत. प्रोफेशनल प्री-वेडिंग शूट्स पासून काय काय सुरु झालं आहे. लग्नानंतर फिरायला जायचं असेल तर परदेशातच जायला हवं