मिळालेली सत्ता "राबवणं" आणि मिळालेली सत्ता "राखणं" या दोन्ही बाबतीत भाजप नेहेमीच कमकुवत राहिला आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत. सध्या केंद्रीय स्तरावर सुरु असलेला दिग्विजय भाजपच्या "कोअर स्वभाव"च्या अगदीच विपरीत आहे. पण -
१+
मोदी-शहा जोडगोळीने रेटून बसलेल्या सिस्टीममुळे ते शक्य होतंय. अर्थात, गिव्हन इनफ टाईम, ही सिस्टीम रुजेल आणि तोच कोअर स्वभाव होईल - अशी आशा अनेकांना आहे.
तसं घडेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच.
सध्या हे वास्तव मान्य करणं आणि त्यानुसार -
२+
महाराष्ट्र भाजपचा "परफॉर्मन्स" बघणं आवश्यक ठरतं.
मोदी-शहा जोडगोळीमुळे सतत विजयाची सवय लागलेल्या भाजप समर्थकांना, भाजपच्या मूळ स्वभावानुसार महाराष्ट्रात जे काही घडून आलं ते अजिबात पचनी पडलेलं नाही. ठराविक वर्तुळात अजूनही फडणवीसांना "माननीय मुख्यमंत्री" म्हटलं जातं...तर इतर -
३+
अनेक वर्तुळांत "फडणवीस हटाव!" च्या आरोळ्या ठोकल्या जातात. दोन्हीही इफेक्ट्स एकाच कॉजमुळे झालेत...ही एक गंमतच.
पण - राज्यातील सरकारमधून भाजप बाहेर पडणं असो वा विधान परिषद निवडणुकीची वाताहत असो...बहुतेक भाजप समर्थक सैरभैर होऊन "आम्हाला फडणवीस नको!" ची मागणी करत आहेत -
४+
त्यावर विचार होणं आवश्यक आहे.
फडणवीस का नको?
ते अपेक्षित रिझल्ट्स देऊ शकत नाहीयेत म्हणून.
हे रिझल्ट्स कोणते?
निवडणुकीतील जय-पराजय.
पण, आपल्याला नेतृत्व फक्त जय-पराजयासाठी हवं असतं का? नेतृत्वाने निवडणुकीत विजय मिळवून देणं आवश्यक आहेच. पण त्यापुढे काहीच अपेक्षा नाहीत का?
५+
तुम्ही भाजप समर्थक आहात - ठीकाय. पण त्यापुढे तुमचं काहीच अस्तित्व नाही का? त्यापुढे तुमच्या काहीच अपेक्षा नाहीत का?
तुम्ही भाजप समर्थक नंतर - आधी भारतीय नागरिक, महाराष्ट्राचे रहिवासी आहात...हे विसरून चालणार आहे का?
आपलं नेतृत्व नेमकं कोणतं ध्येय घेऊन वाटचाल करतं -
६+
विरोधात असताना तर ठीकच, पण सत्तेत असताना काय कामं करतं, कामांची दिशा काय असते, त्या कामांमागे पुढच्या १०-२०-५० वर्षांचं व्हिजन असतं का - हे सगळे क्रायटेरिया महत्वाचे नाहीत का?
फडणवीसांच्या राजकारणाची पद्धत नं आवडणाऱ्या अनेकांपैकी मी एक आहे. त्याचं प्रमुख कारण हेच की -
७+
या प्रकारच्या राजकारणामुळे न-डाव्या वैचारिक प्रांताची प्रचंड वाताहत झालेली आहे. आणि हे आजचं नाही, नेहेमीचंच आहे. "आम्ही तुमचा आदर करतो" छाप जोखडं अंगावर घेऊन जाणारे न-डावे राजकारणी भ्रष्ट नेते, लबाड पत्रकार, दुटप्पी विचारवंतांना महाराष्ट्राच्या उरावर बसवत आले आहेत.
८+
फडणवीस याच प्रकारच्या राजकारणाचे प्रोडक्ट वाटतात.
पण हा फडणवीसांच्या कर्तृत्वाचा २०% भाग झाला. बाकीचं ८०% चित्र काय आहे?
७ वर्षांपूर्वी तुम्हाला तुमचा बिनझनेस सुरु करायचा असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पर्मिशन्स आणि सर्टिफिकेशन्सच्या याद्या बघून -
९+
तुमचा नव-उद्योजकतेचा उत्साह मातीमोल होत असे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी म्हणजे टॅक्स पेअर्सचा पैसा गरीब, असहाय शेतकऱ्यांचा चेहरा दाखवून स्वतःच्या खिश्यात वळवण्याची सगळ्या सरंजाम्यांची स्कीम वाटत असे.
आपल्या सिस्टीमने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नावाचा अख्खा -
१०+
सब्जेक्टच ऑप्शनला टाकलाय की काय, असा प्रश्न पडत असे. एखाद्याच्या नियतीवर दारिद्र्याची रेषा पर्मनंट टॅटू करून टाकावी तसे दुष्काळ-पाण्याची चणचण हे प्रश्न मराठवाडा विदर्भाच्या नकाश्यावर कायमस्वरूपी चिकटवल्यासारखे दिसत असत.
फडणवीसांच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत काय घडलं?
११+
घरबसल्या बिझनेस रजिस्ट्रेशन्स सुरु झाले. एजंटला एक छदाम नं देता.
कर्जमाफी थेट डीबीटी तत्वावर केल्यामुळे फेक अकाऊंट्स पटापट उघड झाले आणि थोडेथोडके नाही, १२,५०० कोटी रुपये वाचले टॅक्स पेअर्सचे. शिवाय शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर थेट पैसे जमा. तिथेही एजंटगिरीला चाप बसला.
१२+
इन्फ्राडेव्हलपमेंटबद्दल बोलावं तेवढं कमीच. मुंबईतील मेट्रोची कामं डोळ्यादेखत झपाट्याने होताना बघून "हे असं ही होऊ शकतं?" चे विचार मनात आले नाहीत असे फार कमी लोक असतील. (त्याच मेट्रोचं आता काय होतंय बघा.)
आज तुम्ही फडणवीसांच्या जलयुक्तशिवारवर कितीही ऑब्जेक्शन्स घेत रहा. पण -
१३+
पण फडणवीसांच्या शेवटच्या २ वर्षांत पडलेला पाऊस - वाढलेलं कृषिक्षेत्र - पटींनी वाढलेली लागवड - त्यासमोर पाण्याच्या समस्येची तीव्रता हे गणित मांडून बघा. जलयुक्तशिवार कसं झळाळून निघतं हे कळेल.
हे सगळं भाजप समर्थकांना सांगावं लागतंय. याची आठवण करून द्यावी लागतीये.
१४+
कारण तुमचा सुकाणू हललाय बॉस.
राजकारण कशासाठी करायचं? निवडणूक कशासाठी लढायची? निवडून कशासाठी यायचं? - या प्रश्नांची उत्तरं वरील कामांमध्ये आहेत.
लोकांना बंगल्यावर नेऊन तुडवणाऱ्या माणसाच्या तब्येतीची चौकशी करणं असो वा मोदी-शहांपासून गोळवकर-सावरकरांबद्दल अश्लाघ्य
१५+
कंड्या पिकवणाऱ्या पत्रकारांना जपणं असो...फडणवीसांच्या "विरोधक जपा" राजकारणावर टोकाची टीका केली आहे मी. पण महाराष्ट्राला खरोखर प्रोग्रेसिव्ह लाईन्सवर घेऊन जाऊ शकणारा फडणवीसांएवढा प्रभावी नेता दुसरा कुठलाच - भाजपच नव्हे, इतर कोणत्याच पक्षांत - नाही, हे ही मला कळतं.
१६+
भाजप समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना हे कळू नये याचं आश्चर्य वाटतं.
महाराष्ट्र भाजपच्या बोटचेप्या राजकारणाचा राग येतोच अनेकदा. म्हणूनच त्यावर बोलतोसुद्धा. तुमचं राजकारण तुमच्याजवळ, पण आमच्यावर त्याचे साईड इफेक्टस होतात तेव्हा बोलावंच लागतं.
१७+
म्हणूनच राज्यात हलकल्लोळ माजत असताना महाराष्ट्र भाजप सूत-जुळव स्वप्नांमुळे रस्त्यावर उतरत नाही याचा राग येतो. हा राग "तुम्ही कमी पडताय" या स्वरूपाचा असतो. कारण व्हेदर आय लाईक इट ऑर नॉट, दुसरीकडून अपेक्षा ठेवता येत नाही आम्हाला.
१८+
फडणवीसांवर असलेला राग याच स्वरूपाचा आहे. पण इथेसुद्धा - यू हॅव गॉट नो बेटर ऑप्शन फॉर महाराष्ट्र - हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
भाजपचा विजय हे तुमचं स्वप्न असायला हरकत नाही.
पण -
१९+
महाराष्ट्राच्या भल्याची किंमत मोजून ते स्वप्न पूर्ण करण्याची तुमची मानसिकता असेल...तर मोठीच गडबड आहे तुमच्या प्रायॉरिटीत.
किमान २० वर्षांचा राजकीय डॉमिनन्स, संघाचा राष्ट्रीय स्तरावरील आधार, ७ वर्षांची केंद्रीय सत्ता, कित्येक राज्यांमध्ये दीर्घ सत्ता - तरी देशभरात १०० शेतकरी संघटना असू नयेत ज्यांनी शेतकरी बिलांना उघड आणि प्रखर समर्थन देत मोर्चे काढलेत?
१+
"फक्त पंजाबचे शेतकरी विरोध करताहेत" - हे जर खरं असलं - तर इतर राज्यांमधले शेतकरी कुठे आहेत? कायद्यांच्या समर्थनात कोण कुठे मोर्चे काढताहेत?
हे आंदोलन एका रात्रीत भडकलेलं नाही. किमान ३ महिन्यांपासून तापतंय. काय केलं भाजपने? (सरकारने नव्हे - भाजपने!)
२+
दरवेळी "ते देशद्रोही आहेत!" "ते खोटारडे आहेत" असं रडत रहायचं का? त्यांचा प्रचार खोटा कसा आहे हे मुद्देसूद मांडून त्यातील हवा काढता येऊ नये का? दरवेळी "पण त्यांनी झोपल्याचं सोंग घेतलंय!" म्हणत रहायचं का?
एक माणूस एकाच जीवनात काय काय करू शकतो हे स्व-कर्तृत्वाने दाखवून देणारा महामानव.
दुःखाचं, दारिद्र्याचं भांडवल करत वेळ नं घालवता, त्याच्या छाताडावर पाय रोवून उभं रहाणं म्हणजे काय हे कृतीतून दाखवून देणारा महामानव.
१+
एकीकडे वर्तमान परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर प्रहार करत, दुसरीकडे, परिस्थिती बदलण्यासाठी "आपण" काय करायला हवं याचा रोडमॅप तयार करणारा महामानव.
नुसता रोडमॅप तयार करून, तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळवून, "आता तुमचं तुम्ही बघा" नं म्हणता -
२+
स्वतः एकेक माणूस हातात हात धरून पुढे घेऊन जाणारा महामानव.
एका मोठ्या समूहाच्या उत्थानासाठी झोकून देऊन काम करत असतानासुद्धा...इतरांकडे पाठ नं फिरवणारा...संपूर्ण समाजासाठी चांगलं-वाईट काय असेल, देशाची भविष्यातील दिशा कशी असावी, जगात घडलेल्या गोष्टींचा आपण काय धडा घेऊ शकतो -
Now, who are those that exploit and abuse? Middlemen and rich farmers. Middlemen by controlling the prices of the produce and rich farmers by exploiting MSPs. It's no secret how middlemen benefit from the uneven market and only a handful rich farmers from the mandi-msp infra. +
That's where the middlemen-rich farmers rebuttal stems from.
Is it wrong/bad to be a agent/middleman or a rich farmer? Of course not. But it IS wrong to benefit from unjust practices and exploitation of the poor. +
भारतीय बेरोजगारीचं चित्र दाखवणारे cmie चे नवे आकडे रिलीज झालेत. अधिकृत आकडे म्हणतात बेरोजगारीचा दर ६.५१ पर्यंत कमी झालाय. अर्थात शहरी आकडा ७.०७ आहे. ग्रामीण ६.२६ असल्यामुळे सरासरी ७ पेक्षा कमी आहे.
म्हणजेच अर्बन बेरोजगारी तितकी कमी झालेली नाही. रोज linkedin वर
१+
"कोव्हिडमुळे नोकरी गेलीये...मदत हवीये" म्हणणाऱ्या पोस्ट्स येत आहेतच. पण आपलेच एप्रिल मे जुनचे भयानक आकडे पहाता हे आकडे दिलासादायक वाटतात.
डिसेंम्बरमध्ये आपण सध्या आहे तो रेटा कायम ठेवला तर द वर्स्ट इज बिहाईंड म्हणता येऊ शकेल अशी आशा वाटतीये.
२०२१ दणक्यात नाही, पण -
२+
सावरण्याच्या नोटवर सुरू झालं तरी जिंकलं.
या सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करतो.
सरकार (केंद्र वा राज्य) अश्यावेळी काहीही उपयोगी पडत नाही. पडूच शकत नाही. जे काही सकारात्मक आकडे दिसताहेत ते लोकांनी आपल्या बळावर आपल्या समस्या सोडवल्या म्हणून.
"शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवू नका!"
"प्रत्येक सरकार विरोधक पाकिस्तानी नसतो!"
"शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून, संवाद साधायला हवा...!"
फार्म बिल वाचलेलं नाही. बातम्यांमधून समोर दिसणारं चित्र बघितलेलं नाही. ज रा दोन एक तास अभ्यास करून नेमकं काय घडतंय ते ही समजून घेतलेलं नाही.
१+
पण मोठमोठ्या गप्पा तेवढ्या हाणायच्यात.
"विरोध करणं हा हक्क आहे!"
"आंदोलनांमधूनच लोकशाही सशक्त होते!"
बाप रे बाप!
अरे पण आंदोलन कोणत्या प्रश्नासाठी, कोणत्या मुद्द्यावर आहे, त्यामागची वस्तुस्थिती काय, आंदोलन करणारे नि आंदोलनाचं समर्थन करणारे जे प्रश्न उभे करताहेत ते -
२+
व्हॅलिड तरी आहेत का - याचा काही विचार कराल की नाही?
इथे एक्स्पर्ट ओपिनियन फेकताना, तुम्हाला फार्म बिल २०२० नेमकं काय आहे हे तरी माहितीये का?
हे २ वेगवेगळे बिल आहेत.
एक आहे The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services bill, 2020.
समस्त न-डाव्या मंडळींनी - किमान महाराष्ट्रापुरतं जरी म्हणायचं झालं तरी - सर्वप्रथम काही करायला हवं असेल तर - खऱ्या महाराष्ट्र-द्रोही लोकांची नसती कौतुकं बंद करणं.
कुणीतरी स्वतःला जाणता राजा म्हणवतो, कुणी दीन-दुबळ्या बहुजनांचा नेता, कुणी काय तर कुणी काय. हे तर झाले राजकारणी.
१+
सामाजिक कार्यकर्ते म्हणून उभं आयुष्य वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे बटीक झालेले "महान" लोक सुद्धा विनाकारणच आदरणीय, वंदनीय वगैरे म्हणवले जातात.
एवढेच जाणते होतात तर महाराष्ट्रात अजूनही शेतकरी आत्महत्या का करतो? अख्ख्या महाराष्ट्राचे नेते होतात तर कधी तीन आकडी आमदार ही
२+
निवडून आणणं का जमलं नाही? गरीब बहुजनांचे नेते आहात तर तुमच्या प्रॉपर्टीज अवाढव्य कश्या? घोटाळ्यामध्ये नावं येताच फक्त तेवढी बहुजनांची गर्दी कधी आठवते?
पु लो द सारख्या राजकीय साठमारीत, महाराष्ट्राला उभा आडवा फाडून खाणाऱ्या विकृत सरंजामी नेत्यांचा प्रचार उघडपणे करणारे विचारवंत