मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.
तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -
१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.
तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.
२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?
प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,
३+
समस्येचं समाधान आहे का? की त्याने उलट समस्या वाढणार आहे?!
मैथिली जर बॉलिवूडमध्ये शिरली असती - तर - बॉलिवूडमधील हिंदू धर्म, भारतीय संस्कृती समर्थकांची संख्या १ ने वाढली असती की नाही?
४+
मैथिलीच्या गाण्यांना आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला असता - तर प्रोड्युसर्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट्स...यांच्यावर 'त्या प्रकारची' गाणी निर्माण करण्याचा, त्या मतांच्या गायकांना संधी देण्याचा नकळत दबाव निर्माण झाला असता की नाही?
५+
यामुळे आधीच बॉलिवूडमध्ये असणाऱ्यां मैथिलीसारख्या हिंदू/भारतीय संस्कृती प्रेमी मंडळींना शक्ती मिळाली असती की नाही?
बॉलिवूडमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मंडळींना "आपल्याला देखील संधी मिळू शकते" हा विश्वास मिळाला असता की नाही?
६+
यातून बॉलिवूडमध्ये न-डाव्या शक्तीचं प्राबल्य वाढलं असतं की नाही?!!!
उलट मैथिलीने संधी नाकारून - एक जागा रिकामी ठेवली - जी भरणारी नवी गायिका कोण असेल हे आपल्याला माहिती नाहीये. तिथे आणखी एक विरोधक आली...तर काय करणार आहोत आपण?
७+
आपला एन्ड गेम नेमका काय आहे?
बॉलिवूड मधील अनिष्ट शक्तींना मोकळं रान करून देण्याचा की बॉलिवूड शुद्ध करण्याचा?
समस्या सोडवायची आहे की नाही? की शतकानुशतकं व्हिक्टिम कार्ड खेळत, गळे काढत रडत कुढत बसायचं आहे?
८+
माध्यमं त्यांची, शिक्षण क्षेत्र त्यांचं, मानवाधिकार वगैरे अॅक्टिव्हीजमचे प्रांत त्यांचे, कलाक्षेत्र त्यांचं...असं म्हणत म्हणत एक एक रणांगण सोडून पळून आलोय आपण! आणि फक्त "हे वाईट...ते वाईट" ओरडत बसतोय...
९+
मैथिलीला जे काही करायचं असेल ते तिने करावं. तो तिचा निर्णय आहे.
परंतु न-डावी इकोसिस्टिम कोणत्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्सवर उभी राहू शकते - याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे आता.
स्त्रियांना नोकरीचा अधिकार असावा काय? - नको! त्याने पुरुष बेरोजगार होतील!
देशात औद्योगिकरण करावं काय? - नको! त्याने गरिबी वाढेल!
भारतात मॅकडॉनल्ड्स यावं काय? - नको! त्याने वडापाववाले देशोधडीला लागतील!
FDI? - नको! त्याने देशी उद्योग परकीयांच्या मुठीत जातील!
१+
ईकॉमर्स? - छोट्या दुकानदारांचे शत्रू!
कम्प्युटर? - मानवी मेंदूचा शत्रू!
ओला-उबर - रिक्षा/टॅक्सीचे शत्रू!
श्रीमंत - गरिबांचे शत्रू...
शिक्षित - अशिक्षितांचे शत्रू...
शहरी - गावकऱ्यांचे शत्रू...
२+
"प्रतिगामीत्व"वर कुणा एकाच विशिष्ठ वैचारिक समूहाची मक्तेदारी नाही...हे सिद्ध करणारी वरील उदाहरणं. तरी यांत जात-धर्म-भाषा-प्रांत या फॉल्टलाईन्स गृहीत धरलेल्याच नाहीत.
मुद्दा हाच की "आम्ही" विरुद्ध "ते" अशी मांडणी करण्याची हौस सर्वांनाच असते. आणि -
किमान २० वर्षांचा राजकीय डॉमिनन्स, संघाचा राष्ट्रीय स्तरावरील आधार, ७ वर्षांची केंद्रीय सत्ता, कित्येक राज्यांमध्ये दीर्घ सत्ता - तरी देशभरात १०० शेतकरी संघटना असू नयेत ज्यांनी शेतकरी बिलांना उघड आणि प्रखर समर्थन देत मोर्चे काढलेत?
१+
"फक्त पंजाबचे शेतकरी विरोध करताहेत" - हे जर खरं असलं - तर इतर राज्यांमधले शेतकरी कुठे आहेत? कायद्यांच्या समर्थनात कोण कुठे मोर्चे काढताहेत?
हे आंदोलन एका रात्रीत भडकलेलं नाही. किमान ३ महिन्यांपासून तापतंय. काय केलं भाजपने? (सरकारने नव्हे - भाजपने!)
२+
दरवेळी "ते देशद्रोही आहेत!" "ते खोटारडे आहेत" असं रडत रहायचं का? त्यांचा प्रचार खोटा कसा आहे हे मुद्देसूद मांडून त्यातील हवा काढता येऊ नये का? दरवेळी "पण त्यांनी झोपल्याचं सोंग घेतलंय!" म्हणत रहायचं का?
एक माणूस एकाच जीवनात काय काय करू शकतो हे स्व-कर्तृत्वाने दाखवून देणारा महामानव.
दुःखाचं, दारिद्र्याचं भांडवल करत वेळ नं घालवता, त्याच्या छाताडावर पाय रोवून उभं रहाणं म्हणजे काय हे कृतीतून दाखवून देणारा महामानव.
१+
एकीकडे वर्तमान परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर प्रहार करत, दुसरीकडे, परिस्थिती बदलण्यासाठी "आपण" काय करायला हवं याचा रोडमॅप तयार करणारा महामानव.
नुसता रोडमॅप तयार करून, तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळवून, "आता तुमचं तुम्ही बघा" नं म्हणता -
२+
स्वतः एकेक माणूस हातात हात धरून पुढे घेऊन जाणारा महामानव.
एका मोठ्या समूहाच्या उत्थानासाठी झोकून देऊन काम करत असतानासुद्धा...इतरांकडे पाठ नं फिरवणारा...संपूर्ण समाजासाठी चांगलं-वाईट काय असेल, देशाची भविष्यातील दिशा कशी असावी, जगात घडलेल्या गोष्टींचा आपण काय धडा घेऊ शकतो -
मिळालेली सत्ता "राबवणं" आणि मिळालेली सत्ता "राखणं" या दोन्ही बाबतीत भाजप नेहेमीच कमकुवत राहिला आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत. सध्या केंद्रीय स्तरावर सुरु असलेला दिग्विजय भाजपच्या "कोअर स्वभाव"च्या अगदीच विपरीत आहे. पण -
१+
मोदी-शहा जोडगोळीने रेटून बसलेल्या सिस्टीममुळे ते शक्य होतंय. अर्थात, गिव्हन इनफ टाईम, ही सिस्टीम रुजेल आणि तोच कोअर स्वभाव होईल - अशी आशा अनेकांना आहे.
तसं घडेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच.
सध्या हे वास्तव मान्य करणं आणि त्यानुसार -
२+
महाराष्ट्र भाजपचा "परफॉर्मन्स" बघणं आवश्यक ठरतं.
मोदी-शहा जोडगोळीमुळे सतत विजयाची सवय लागलेल्या भाजप समर्थकांना, भाजपच्या मूळ स्वभावानुसार महाराष्ट्रात जे काही घडून आलं ते अजिबात पचनी पडलेलं नाही. ठराविक वर्तुळात अजूनही फडणवीसांना "माननीय मुख्यमंत्री" म्हटलं जातं...तर इतर -
Now, who are those that exploit and abuse? Middlemen and rich farmers. Middlemen by controlling the prices of the produce and rich farmers by exploiting MSPs. It's no secret how middlemen benefit from the uneven market and only a handful rich farmers from the mandi-msp infra. +
That's where the middlemen-rich farmers rebuttal stems from.
Is it wrong/bad to be a agent/middleman or a rich farmer? Of course not. But it IS wrong to benefit from unjust practices and exploitation of the poor. +