#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार #JohnHowardGriffin
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार या लेखमालेत काल आपण महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली.त्यातून असे लक्षात आले कि खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या जोखडातून मुक्तता असे नसून बऱ्याचदा स्वकीयांच्या👇
जोखडातून मुक्तता असाही त्याचा अर्थ होतो.आणि विशेष म्हणजे ह्या स्वातंत्र्याचा व्याप केवळ एका देशापुरता मर्यादित नसून तो विश्वव्यापी असा असतो. त्यामुळे मी आज अशाच एका खऱ्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.त्याच नाव आहे 'जॉन हॉवर्ड ग्रिफिन'.👇
मला ग्रिफिनची ओळख त्याचं 'ब्लॅक लाईक मी' हे पुस्तक वाचल्यावर झाली. आपल्या दलित साहित्यात मैलाचा दगड ठरलेलं शरण कुमार लिंबाळे यांचं अक्करमाशी जस आपल्या सर्वांगाला झिणझिण्या आणत अगदी तशाच झिणझिण्या ग्रिफिनच ब्लॅक लाईक मी वाचल्यावर येतात. मुळात जॉन ग्रिफिन हा एक अमेरिकन👇
गौरवर्णीय पत्रकार आणि लेखक होता. परंतु त्याला देशातील निग्रोंविषयी,ते जगत असलेल्या हलाखीच्या जीवनाविषयी खूपच कळवळा होता.तो सातत्यानं जशी संधी मिळेल तस आपल्या लिखाणातून निग्रोंच्या वाटेला आलेलं हलाखीचं,नरकासमान जिणं प्रखरपणे मांडत होताच. पण तरीही त्याची अस्वस्थता काही केल्या👇
कमी होत नव्हती. आणि कशी होणार सांगा ना? कारण आपले तुकोबाराय म्हणतात बघा "जावे त्यांच्या वंशा,तेव्हा कळे||" अगदी त्याचप्रमाणे आपल्या लिखाणात ती सत्यता,तो आघात,ती तळमळ येत नाही म्हणूनच ग्रिफिनची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच होती.मग एके दिवशी न राहून त्याने एक अनाकलनीय असा निर्णय👇
घेतला.तो निर्णय होता कि; निग्रोंच दुःख,त्यांचं जीवन कसं दाहक आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आणि मग त्या अनुभवांवर आधारित असं पुस्तक लिहायचं.हि गाठ मनाशी पक्की बांधून ग्रिफिन पुढे सरसावला आणि त्याने आपलं अख्ख गोरं शरीर वैद्यकीय उपचारांनी,रासायनिक द्रव्यांनी काळं करून घेतलं.👇
एवढंच नाही तर त्याने आपले केसही निग्रोंप्रमाणे दाट कुरळे करून घेतले.आणि एका रात्रीत एक अमेरिकन श्वेतवर्णीय असणारा जॉन ग्रिफिन हा एक अमेरिकन निग्रो म्हणून गौरवर्णीय अमेरिकन समाजात प्रवेश करता झाला.एका गोऱ्या माणसाने काळ्यांच्या व्यथा आणि वेदना अनुभवायचा हा मार्ग फारच थरारक आणि👇
हेलावून टाकणारा होता. अस्पृशांची, दलितांची अस्सल दुःखे जाणून घेण्यासाठी एखादा सवर्ण समाजातील लेखक जाणून-बुजून दलित समाजात प्रवेश करता झाला अशी उदाहरण आपल्याकडे सापडतील?मराठी साहित्यात अनेक जणांनी अस्पृशांची दुःखे, वेदना केवळ कल्पनेच्या आधारावर मांडण्याचा प्रयत्न केला आहेच👇
त्यात दुमत नसावं.परंतु स्वतःअस्पृश्य होऊन जातीभेद कसा असतो,अस्पृश्यता कशी असते,गावकीची कामं कशी असतात,महार-मांगांची तुच्छता कशी असते हे प्रत्यक्षात कुणी सवर्ण लेखकाने अनुभवलं असेल हे आपल्याकडे निव्वळ दुरापास्तच.पण जॉन ग्रिफिन निर्भयपणे श्वेतवर्णीयांच्या जगात निग्रो म्हणून गेला👇
.त्याचा अतोनात छळ झाला,वेदना झाल्या,त्याचा तिरस्कार झाला परंतु तो त्याने अगदी निमूटपणे सहन केला. या रोज येत असलेल्या अनुभवानंतर त्याला हळूहळू उलगडा होत गेला कि; निग्रोंमध्ये भयगंड का निर्माण होतो? न्यूनगंड का निर्माण होतो? त्यांची हिंसाचाराकडे प्रवृत्ती का बळावते?गुलामगिरी काय👇
असते?निराशा काय असते? हे ग्रिफिन यानं अंतर्बाह्य अनुभवलं.वर्षानुवर्षे वंशवादाचा बळी ठरलेल्या निग्रोंची मरणासन्न अवस्था त्याने स्वतः भोगली. म्हणूनच त्याच्या आत्मचरित्रात ग्रिफिन फार खेदाने म्हणतो कि "काही माणसंच, काही माणसांचे आयुष्य बरबाद करून टाकतात". एका लहान निग्रो मुलीला👇
विचारण्यात आलं होत कि; ज्यूंचा नरसंहार करणाऱ्या, निरापराधांची बेसुमार कत्तल करणाऱ्या हिटलरला शिक्षा द्यायची झाल्यास तू कोणती शिक्षा त्याला देशील? त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता ती लहान मुलगी अगदी निरागसपणे उत्तरली कि;"त्याला फक्त एका दिवसासाठी निग्रो करा".👇
मित्रांनो त्या मुलीच्या या उत्तरावरून आपल्या लक्षात आलं असेल कि किती भयानक जिणं अमेरिकेतील निग्रोंच्या वाट्याला आलं होत. याच भयानक,विदारक अवस्थेतून जॉन ग्रिफिन स्वतः गेला. आणि हे अनुभव घेऊन तो केवळ थंड बसून राहिला नाही तर त्याने आपली लेखणी निग्रोंच्या मुक्ततेसाठी झिजवली,👇
गौरवर्णीय अमेरिकन समाजव्यवस्थेवर हीच लेखणी तलवारीसारखी चालवली. तो अखेरपर्यंत निग्रोंच्या मुक्ततेसाठी लढत राहिला. म्हणूनच तो मला स्वातंत्र्याचा खरा शिल्पकार वाटतो. बाकी आपले केशवसुत म्हणतातच कि; "विश्वाचा विस्तार केवढा? तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा! #सिद्धार्थ
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
नुकतंच व्हॅलरी स्टील हीच पॅरिस फॅशन हे पुस्तक वाचण्यात आलं.मूळची अमेरिकन असलेली ही लेखिका पॅरिस आणि फ्रांसबद्दल लिहिताना तिच्या नागरिकत्वाबाबत आपला सपशेल गोंधळ उडावा इतक्या सराईतपणे फ्रान्सच्या अंतरंगात शिरते.पुस्तकाचं शीर्षक पाहता प्रथमदर्शनी आपला असा (गैर)समज होण्याची शक्यता👇
आहे की; या पुस्तकात सरधोपटपणे केवळ फॅशन या विषयावर काथ्याकूट केला असेल. पण या समजाला फाटा देत लेखिकेने सुमारे ५०० वर्षांच्या कपड्यांच्या फॅशन्समधून फ्रांसचा सांस्कृतिक इतिहास अलगदपणे उलगडत नेला आहे. खरं तर मला ही कल्पनाच खूप महत्वाची आणि समर्पकही वाटली. कारण बघा ना कपड्यांच्या👇
फॅशन्स जसजशा बदलत गेल्या, त्या बदलांना बारकाईने टिपून पुन्हा त्याच्याच सहाय्याने एखाद्या राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासाचा सबंध पट जगासमोर मांडणं. Alison Lurie हीच The Language Of Clothes हे तसं याच धाटणीच असलं तरी त्यातून ऐतिहासिक दृष्टिकोनापेक्षा मानसिक दृष्टिकोन जास्त झिरपतो.👇
साधारण वीस एक वर्षांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सने अशी तक्रार केली होती की, हल्ली इंग्लंडमध्ये शेक्सपिअर फारसा वाचला जात नाही. प्रिन्स चार्ल्सचे हे विधान तसे धक्कादायकच म्हणायला हवं, कारण एकीकडे ब्रिटनचे भलेमोठे साम्राज्य आणि दुसरीकडे शेक्सपिअर यातून एकाची निवड करायची👇
झाल्यास; आम्ही एखादवेळेस साम्राज्यावर पाणी सोडू परंतु शेक्सपिअर कदापी सोडणार नाही अशा म्हणणाऱ्या ब्रिटिशांवर आज शब्दांचा साक्षात पंडित शेक्सपिअरला सोडण्याची वेळ येत असेल तर भारतातील शब्द पुजाऱ्यांची काय स्थिती असेल याबाबत मौन बाळगलेलच बर.पण ब्रिटिशांच्या या शेक्सपिअर प्रेमावरून👇
आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की शब्दांच सामर्थ्य ते किती. जर तुम्ही 'गली बॉय' हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातल्या अपना टाइम आयेगा या गाण्यातली एक ओळ आहे बघा 'ये शब्दोका ज्वाला मेरी बेढिया पिघलायेगा' म्हणजे अशी वज्रहून कठीण जोखड वितळविण्याची क्षमताही शब्दांमध्ये असते👇
साधारण २०१५ च्या आसपास मी माझे ट्विटर अकाउंट उघडले होते. पण फेसबुक चा जोर जरा जास्त होता म्हणून ट्विटरकडे फारसे फिरकणे होत न्हवते. अगदी मागच्या वर्षापर्यंत ट्विटर मी गांभीर्याने घेत नव्हतो. परंतु मागील वर्ष अखेरीस ट्विटर वर बरेच मटणप्रेमी, साहेबाप्रेमी, काही चळवळे कार्यकर्ते,👇
खास ट्रोलर यांची मांदियाळीच दिसली. आणि त्यात विशेष म्हणजे हि सगळी मराठी मंडळी. त्यामुळे आपलेपणा जाणवला. त्यातल्या अनेक जणांशी वैयक्तिक संपर्कही झाला. काहीजण प्रत्यक्ष भेटलेही. पण खास ट्विट करायला अशी सवड होत नव्हती. मनातून इच्छा खूप असायची पण ट्विटर कसं वापरायचं याबद्दलच घोर👇
अज्ञान आणि वेळेची मारामार या धबडग्यात कधी व्यक्त होण्याची संधी मिळालीच नाही. पण माझा मित्र @Digvijay_004 याने मला बरेच प्रोत्साहन दिले. ट्विटर चे बारकावे समजावून सांगितले. दिग्विजयच्या प्रोत्साहनामुळेच मी आज लिहू शकलो,व्यक्त होऊ शकलो. आणि विशेष म्हणजे ना भूतो ना भविष्यती!👇
आज मी गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत थोडं विवेचन करणार आहे, इ.स. १९१५ साली गांधीजींचा भारतात प्रवेश झाला. आणि मग विविध आंदोलने, चळवळी, उपोषणे, निवडणुका या सगळ्या खटाटोपानंतर गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.👇
हे आपल्याला अगदी तोंडपाठ असते. पण त्याच्या खोलात जाण्याचा किंवा त्याच्यामागचा कार्यकारणभाव समजावून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. जे गांधी साध्या झुरळाला घाबरायचे, अंधाराला घाबरायचे त्या गांधींनी इंग्रजांपुढे काठी रोवून उभे राहण्याचे धैर्य कुठून आणले असेल?👇
बरं भारतात येण्याआधी गांधीजींची जीवनशैली तपासू जाता आपल्याला गांधी कायद्याचे विद्यार्थी कमी आणि अध्यात्मिक धर्मगुरूच जास्त वाटतात. कारण सातत्याने विविध धर्मग्रंथांचा अभ्यास करणे, प्युरिटन संप्रदायाच्या सभेला न चुकता उपस्थित राहणे,अगदी पॅरिसला जाऊन तिथल्या भव्य चर्चेस मध्ये 👇