आज मी गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत थोडं विवेचन करणार आहे, इ.स. १९१५ साली गांधीजींचा भारतात प्रवेश झाला. आणि मग विविध आंदोलने, चळवळी, उपोषणे, निवडणुका या सगळ्या खटाटोपानंतर गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.👇
हे आपल्याला अगदी तोंडपाठ असते. पण त्याच्या खोलात जाण्याचा किंवा त्याच्यामागचा कार्यकारणभाव समजावून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. जे गांधी साध्या झुरळाला घाबरायचे, अंधाराला घाबरायचे त्या गांधींनी इंग्रजांपुढे काठी रोवून उभे राहण्याचे धैर्य कुठून आणले असेल?👇
बरं भारतात येण्याआधी गांधीजींची जीवनशैली तपासू जाता आपल्याला गांधी कायद्याचे विद्यार्थी कमी आणि अध्यात्मिक धर्मगुरूच जास्त वाटतात. कारण सातत्याने विविध धर्मग्रंथांचा अभ्यास करणे, प्युरिटन संप्रदायाच्या सभेला न चुकता उपस्थित राहणे,अगदी पॅरिसला जाऊन तिथल्या भव्य चर्चेस मध्ये 👇
तासंतास रमणे,पोप ची भेट घेऊन अध्यात्मावर चर्चा करणे. हे सगळं पाहता हा माणूस राजकारणासारख्या रूढार्थाने मळलेल्या वाटेने जाईल असे कुणाला स्वप्नातही वाटणे शक्य नव्हते. पण तरीही गांधी राजकारणात आले आणि पुढे मार्गक्रमणही केले.हा चमत्कार म्हणावा असा बदल कसा काय झाला गांधींमध्ये?👇
खरंच बदल झाला का? तर ह्याच प्रश्नाचा किंवा गांधींच्या मानसिक अवस्थेचा माग घेतला असता काही तार्किक गोष्टींचा मला उलगडा झाला. हि तार्किक गोष्ट जर आपण समजून घेतली तर नक्कीच आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ उलगडण्यास मदत होईल आणि काही अंशी गांधींचीहि एका ठाशीव चौकटीतून 👇
मुक्तता होण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्याला आता गांधींच्या मनोविश्वात आणि विचारविश्वात प्रवेश करायला हवा. गांधी म्हणत असत कि मनुष्य आणि पशु हे एकाच सृष्टीची दोन लेकरं आहेत. ज्याप्रमाणे पशूला काम, क्रोध, भूक, तहान या प्रेरणा आहेत अगदी मनुष्यालाहि अशाच प्रेरणा सृष्टीने 👇
बहाल केल्या आहेत. परंतु सृष्टीने मनुष्याला या प्रेरणांबरोबरच सदसतविवेकबुद्धीची(conciousness ) अधिक देणगी बहाल केली आहे. तेव्हा मनुष्याने त्याला मिळालेल्या या देणगीचा यथार्थ वापर करून आपल्यातील पशुत्वार मात करून आपल्या अंतरंगात असणाऱ्या "चैतन्य- तत्वाचा" नेहमीच शोध घेतला पाहिजे👇
जेणेकरून त्याला स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेता येईल,स्वतःची नैतिक पातळी उंचावत येईल. असे गांधीजींचे आग्रही मत होते.परंतु याही पुढे जाऊन गांधीजी असे म्हणतात,कि शेवटी मनुष्यही याच सृष्टीचा भाग असल्याने त्याला स्वतःच्या अशा काही किमान जैविक गरजा असतात त्या भागवत आल्या पाहिजेत👇
अन्यथा त्याचा 'नैतिक विकास' निव्वळ अशक्य आहे.आणि ते खरेही आहे. या प्रसंगी राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'रंगीला' चित्रपटाची मला आठवण होतीये. या सिनेमातील मुख्य नायक असलेला अमीर खान आपल्याला विविध पातळ्यांवर मोठा संघर्ष करताना दिसतो,👇
हा मुख्य नायक असाच एके दिवशी रस्त्याने चालत असताना केळेवाल्याच्या गाडीवरचं एक केळ सहजपणे उचलून पुढे चालायला लागतो. तेव्हा तो केळेवाला त्याला बराच झापतो. त्यावर अमीर खान म्हणतो कि: "एक हि केला लिया ना, 'तेरी पुरी गाडी तो नही खा गया मै"! 👇
आता आमीरखानचे हे उत्तर ऐकून आपल्या लक्षात येईल कि आपलं काही चुकलं आहे किंवा आपण अयोग्य गोष्ट केली आहे हे त्याच्या गावीच नाहीये. आता या ठिकाणी गांधीजींचं म्हणणं किंवा त्यांचं अर्ग्युमेण्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागत, ते म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या किंवा 👇
रोजच्या जगण्याच्या लढाईत माणसाला नैतिक-अनैतिकतेची चैन कदापि परवडणारी नसते. म्हणूनच जर सामान्य लोकांमध्ये अध्यात्मिक विकासाची ओढ निर्माण करायची असेल तर प्राधान्यक्रमाने त्यांच्या प्राथमिक गरजा भागविणे आवश्यक आहे असे गांधीजींचे स्पष्ट मत होते.👇
आता गांधींच्या याच युक्तिवादात त्यांच्या राजकारण प्रवेशाचे इंगित दडले आहे. ते असे कि: तत्कालीन भारतात लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्गाला दारिद्र्यामुळे पशूहूनही नित्कृष्ट दर्जाचे जीवन जगावे लागत होते. आता या लोकांमधेय उच्च दर्जाचा नैतिक विकास घडवून आणायचा असेल👇
तर त्यांच्या प्राथमिक गरजा भागविणे आवश्यक होते.परंतु त्यात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे ब्रिटिशांची परकीय राजवट. कारण ब्रिटिशांनी अनेक वर्ष चालवलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळेच भारतात भीषण दारिद्य निर्माण झाले होते हे गांधीजींचे पूर्वसुरी असणारे दादाभाई नौरोजी,👇
महादेव गोविंद रानडे इत्यादी प्रभृतींनी पुराव्यानिशी सिद्ध केले होते. आणि हे सत्य गांधींना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे निष्कर्षाप्रत येताना गांधीजींनी आपल्या मनाशी पक्के केले होते कि परकीय राजवट घालवून स्वकीयांची राजवट(स्वराज्य) प्रस्थापित झाल्याशिवाय भारतातील दारिद्र्य👇
काही नाहीसे होणार नाही आणि परिणामस्वरूप भारतीयांची अध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीही आपल्याला साधता येणार नाही. त्यामुळेच गांधीजींनी राजकारणाची मळलेली वाट धरली. परंतु मनुष्याचा "अत्युच्च नैतिक विकास" हेच गांधीजींचे अंतिम उद्दिष्ट होते हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.👇
म्हणजेच फुले असतील, डॉ आंबेडकर असतील यांनी जी मानवमुक्तीची चळवळ चालवली होती तीच चळवळ गांधींनी थोड्या वेगळ्या मार्गाने पुढे नेली असे आपल्याला काही अंशी म्हणता येईल.
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार #JohnHowardGriffin
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार या लेखमालेत काल आपण महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली.त्यातून असे लक्षात आले कि खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या जोखडातून मुक्तता असे नसून बऱ्याचदा स्वकीयांच्या👇
जोखडातून मुक्तता असाही त्याचा अर्थ होतो.आणि विशेष म्हणजे ह्या स्वातंत्र्याचा व्याप केवळ एका देशापुरता मर्यादित नसून तो विश्वव्यापी असा असतो. त्यामुळे मी आज अशाच एका खऱ्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.त्याच नाव आहे 'जॉन हॉवर्ड ग्रिफिन'.👇
मला ग्रिफिनची ओळख त्याचं 'ब्लॅक लाईक मी' हे पुस्तक वाचल्यावर झाली. आपल्या दलित साहित्यात मैलाचा दगड ठरलेलं शरण कुमार लिंबाळे यांचं अक्करमाशी जस आपल्या सर्वांगाला झिणझिण्या आणत अगदी तशाच झिणझिण्या ग्रिफिनच ब्लॅक लाईक मी वाचल्यावर येतात. मुळात जॉन ग्रिफिन हा एक अमेरिकन👇
नुकतंच व्हॅलरी स्टील हीच पॅरिस फॅशन हे पुस्तक वाचण्यात आलं.मूळची अमेरिकन असलेली ही लेखिका पॅरिस आणि फ्रांसबद्दल लिहिताना तिच्या नागरिकत्वाबाबत आपला सपशेल गोंधळ उडावा इतक्या सराईतपणे फ्रान्सच्या अंतरंगात शिरते.पुस्तकाचं शीर्षक पाहता प्रथमदर्शनी आपला असा (गैर)समज होण्याची शक्यता👇
आहे की; या पुस्तकात सरधोपटपणे केवळ फॅशन या विषयावर काथ्याकूट केला असेल. पण या समजाला फाटा देत लेखिकेने सुमारे ५०० वर्षांच्या कपड्यांच्या फॅशन्समधून फ्रांसचा सांस्कृतिक इतिहास अलगदपणे उलगडत नेला आहे. खरं तर मला ही कल्पनाच खूप महत्वाची आणि समर्पकही वाटली. कारण बघा ना कपड्यांच्या👇
फॅशन्स जसजशा बदलत गेल्या, त्या बदलांना बारकाईने टिपून पुन्हा त्याच्याच सहाय्याने एखाद्या राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासाचा सबंध पट जगासमोर मांडणं. Alison Lurie हीच The Language Of Clothes हे तसं याच धाटणीच असलं तरी त्यातून ऐतिहासिक दृष्टिकोनापेक्षा मानसिक दृष्टिकोन जास्त झिरपतो.👇
साधारण वीस एक वर्षांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सने अशी तक्रार केली होती की, हल्ली इंग्लंडमध्ये शेक्सपिअर फारसा वाचला जात नाही. प्रिन्स चार्ल्सचे हे विधान तसे धक्कादायकच म्हणायला हवं, कारण एकीकडे ब्रिटनचे भलेमोठे साम्राज्य आणि दुसरीकडे शेक्सपिअर यातून एकाची निवड करायची👇
झाल्यास; आम्ही एखादवेळेस साम्राज्यावर पाणी सोडू परंतु शेक्सपिअर कदापी सोडणार नाही अशा म्हणणाऱ्या ब्रिटिशांवर आज शब्दांचा साक्षात पंडित शेक्सपिअरला सोडण्याची वेळ येत असेल तर भारतातील शब्द पुजाऱ्यांची काय स्थिती असेल याबाबत मौन बाळगलेलच बर.पण ब्रिटिशांच्या या शेक्सपिअर प्रेमावरून👇
आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की शब्दांच सामर्थ्य ते किती. जर तुम्ही 'गली बॉय' हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातल्या अपना टाइम आयेगा या गाण्यातली एक ओळ आहे बघा 'ये शब्दोका ज्वाला मेरी बेढिया पिघलायेगा' म्हणजे अशी वज्रहून कठीण जोखड वितळविण्याची क्षमताही शब्दांमध्ये असते👇
साधारण २०१५ च्या आसपास मी माझे ट्विटर अकाउंट उघडले होते. पण फेसबुक चा जोर जरा जास्त होता म्हणून ट्विटरकडे फारसे फिरकणे होत न्हवते. अगदी मागच्या वर्षापर्यंत ट्विटर मी गांभीर्याने घेत नव्हतो. परंतु मागील वर्ष अखेरीस ट्विटर वर बरेच मटणप्रेमी, साहेबाप्रेमी, काही चळवळे कार्यकर्ते,👇
खास ट्रोलर यांची मांदियाळीच दिसली. आणि त्यात विशेष म्हणजे हि सगळी मराठी मंडळी. त्यामुळे आपलेपणा जाणवला. त्यातल्या अनेक जणांशी वैयक्तिक संपर्कही झाला. काहीजण प्रत्यक्ष भेटलेही. पण खास ट्विट करायला अशी सवड होत नव्हती. मनातून इच्छा खूप असायची पण ट्विटर कसं वापरायचं याबद्दलच घोर👇
अज्ञान आणि वेळेची मारामार या धबडग्यात कधी व्यक्त होण्याची संधी मिळालीच नाही. पण माझा मित्र @Digvijay_004 याने मला बरेच प्रोत्साहन दिले. ट्विटर चे बारकावे समजावून सांगितले. दिग्विजयच्या प्रोत्साहनामुळेच मी आज लिहू शकलो,व्यक्त होऊ शकलो. आणि विशेष म्हणजे ना भूतो ना भविष्यती!👇