Hardcore Indian | development thinker| voracious Reader | Good Listener | Self Declared Counselor | Karma Believer.
Dec 28, 2020 • 9 tweets • 4 min read
#स्थलांतर #आत्महत्या #विकास #मराठवाडा_खान्देश_विदर्भ #नक्षलवाद
शाळेत असताना आपल्याला 'कोलंबसाचे गर्वगीत' हि कुसुमाग्रजांची कविता कधीतरी अभ्यासाला होती. त्या कवितेतील खवळलेल्या महासागराला आव्हान देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी माझ्या अंतर्मनाला नेहमीच स्पर्श करतात;👇
अनंत आमुची ध्येयासक्ती,अनंत अन आशा, किनारा तुला पामराला! निसर्गावर मात करण्याची जिद्द मनात चेतवणाऱ्या या ओळी दुष्काळासमोर हाय खाणाऱ्या मराठवाड्यातील पोरांच्या डोळ्यातले अश्रू बघितले कि या कोलंबसाच्या गर्वगीताकडून ८०-९० सालच्या दुःखद गीतांकडे मोर्चा न्यावासा वाटतो.👇
Dec 26, 2020 • 14 tweets • 5 min read
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
चंद्रपूर,रायपूर,ईस्ट गोदावरी वैगेरे जिल्हे म्हणजे आदिवासीबहुल क्षेत्र. अगदी पुरातन काळापासून या भागात राजगोंड,माडिया,बडा माडिया यांसारख्या कैक आदिवासी जमातींची वस्ती आहे. साधारण १९७१ सालापासून या भागात नक्षलवाद फोफावला आणि या भागातील
आदिवासी जमाती तशा दुर्लक्षितच राहिल्या.परंतु या आदिवासी जमातींचा सातासमुद्रापार नावाजला गेलेला एक विशेष गुणधर्म म्हणजे या आदिवासी जमातींचे शिकार करण्याचे पद्धती तंत्र. हे आदिवासी सर्वप्रथम जंगलातल्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात शिकार करायची आहे ते क्षेत्र निश्चित करतात.
Dec 20, 2020 • 14 tweets • 4 min read
अगदी बालपणापासूनच अमेरिकेत राहणारी माझी एक मैत्रीण आहे. ती वंशाने जरी भारतीय असली तरी अमेरिकन म्हणावी इतपत ती आता अमेरिकेच्या संस्कृतीत मिसळल्या गेली आहे. मध्यंतरी कोरोनाचा अमेरिकेत मोठा कहर चालू असतानाहि आंदोलन करण्यासाठी अमेरिकन नागरिक मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.👇
कारण होते 'जॉर्ज फ्लॉइड' या ब्लॅक अमेरिकन कलाकाराची एका पोलीस अधिकाऱ्याकडून वंशद्वेषातून झालेली हत्या. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी ऐन कोरोनाकाळातही समस्त अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली होती. त्यात जसे अमेरिकन ब्लॅक होते अगदी तसेच अमेरिकन व्हाईटही👇
Dec 15, 2020 • 14 tweets • 4 min read
#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार #JohnHowardGriffin
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार या लेखमालेत काल आपण महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली.त्यातून असे लक्षात आले कि खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या जोखडातून मुक्तता असे नसून बऱ्याचदा स्वकीयांच्या👇
जोखडातून मुक्तता असाही त्याचा अर्थ होतो.आणि विशेष म्हणजे ह्या स्वातंत्र्याचा व्याप केवळ एका देशापुरता मर्यादित नसून तो विश्वव्यापी असा असतो. त्यामुळे मी आज अशाच एका खऱ्या स्वातंत्र्याच्या शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.त्याच नाव आहे 'जॉन हॉवर्ड ग्रिफिन'.👇
Dec 14, 2020 • 4 tweets • 1 min read
नुकतंच व्हॅलरी स्टील हीच पॅरिस फॅशन हे पुस्तक वाचण्यात आलं.मूळची अमेरिकन असलेली ही लेखिका पॅरिस आणि फ्रांसबद्दल लिहिताना तिच्या नागरिकत्वाबाबत आपला सपशेल गोंधळ उडावा इतक्या सराईतपणे फ्रान्सच्या अंतरंगात शिरते.पुस्तकाचं शीर्षक पाहता प्रथमदर्शनी आपला असा (गैर)समज होण्याची शक्यता👇
आहे की; या पुस्तकात सरधोपटपणे केवळ फॅशन या विषयावर काथ्याकूट केला असेल. पण या समजाला फाटा देत लेखिकेने सुमारे ५०० वर्षांच्या कपड्यांच्या फॅशन्समधून फ्रांसचा सांस्कृतिक इतिहास अलगदपणे उलगडत नेला आहे. खरं तर मला ही कल्पनाच खूप महत्वाची आणि समर्पकही वाटली. कारण बघा ना कपड्यांच्या👇
Dec 13, 2020 • 13 tweets • 3 min read
साधारण वीस एक वर्षांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सने अशी तक्रार केली होती की, हल्ली इंग्लंडमध्ये शेक्सपिअर फारसा वाचला जात नाही. प्रिन्स चार्ल्सचे हे विधान तसे धक्कादायकच म्हणायला हवं, कारण एकीकडे ब्रिटनचे भलेमोठे साम्राज्य आणि दुसरीकडे शेक्सपिअर यातून एकाची निवड करायची👇
झाल्यास; आम्ही एखादवेळेस साम्राज्यावर पाणी सोडू परंतु शेक्सपिअर कदापी सोडणार नाही अशा म्हणणाऱ्या ब्रिटिशांवर आज शब्दांचा साक्षात पंडित शेक्सपिअरला सोडण्याची वेळ येत असेल तर भारतातील शब्द पुजाऱ्यांची काय स्थिती असेल याबाबत मौन बाळगलेलच बर.पण ब्रिटिशांच्या या शेक्सपिअर प्रेमावरून👇
Dec 11, 2020 • 4 tweets • 1 min read
साधारण २०१५ च्या आसपास मी माझे ट्विटर अकाउंट उघडले होते. पण फेसबुक चा जोर जरा जास्त होता म्हणून ट्विटरकडे फारसे फिरकणे होत न्हवते. अगदी मागच्या वर्षापर्यंत ट्विटर मी गांभीर्याने घेत नव्हतो. परंतु मागील वर्ष अखेरीस ट्विटर वर बरेच मटणप्रेमी, साहेबाप्रेमी, काही चळवळे कार्यकर्ते,👇
खास ट्रोलर यांची मांदियाळीच दिसली. आणि त्यात विशेष म्हणजे हि सगळी मराठी मंडळी. त्यामुळे आपलेपणा जाणवला. त्यातल्या अनेक जणांशी वैयक्तिक संपर्कही झाला. काहीजण प्रत्यक्ष भेटलेही. पण खास ट्विट करायला अशी सवड होत नव्हती. मनातून इच्छा खूप असायची पण ट्विटर कसं वापरायचं याबद्दलच घोर👇
आज मी गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत थोडं विवेचन करणार आहे, इ.स. १९१५ साली गांधीजींचा भारतात प्रवेश झाला. आणि मग विविध आंदोलने, चळवळी, उपोषणे, निवडणुका या सगळ्या खटाटोपानंतर गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.👇
हे आपल्याला अगदी तोंडपाठ असते. पण त्याच्या खोलात जाण्याचा किंवा त्याच्यामागचा कार्यकारणभाव समजावून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. जे गांधी साध्या झुरळाला घाबरायचे, अंधाराला घाबरायचे त्या गांधींनी इंग्रजांपुढे काठी रोवून उभे राहण्याचे धैर्य कुठून आणले असेल?👇