अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.

आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड....
आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.

मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
मंदिरासाठी अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध आहेत आणि २१०० रुपयांच्या वरील सर्व रक्कम चेकद्वारे स्वीकारली जाणार आहे.

त्यामुळे राजकीय पक्षनिधी मध्ये जशी गडबड होते तशी यात अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
१० रुपयांचे कूपन यासाठीच आहे की अगदी गरीबातील गरीब व्यक्ती ही प्रभू श्रीरामांसाठी १० रुपये आनंदाने देऊन अभिमानाने म्हणू शकतो की "हे राम मंदिर माझं आहे".

यातून निर्माण होणारा जो श्रध्देचा भाव आहे तो एखाद्या उद्योगपतीने एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारल्यावर शक्य आहे का?
आता प्रश्न राहिला की यामागे राजकीय अजेंडा आहे या आरोपाचा...

प्रभू श्रीरामांच्या मंदिरावर कुठल्या पक्षाचे अधिकृत चिन्ह लागणार आहे का नाव लागणार आहे??

हे मंदिर तर समस्त हिंदूंचे आहे त्यामुळे स्वतःला हिंदु समजणाऱ्या प्रत्येक राजकीय विचारसरणीच्या व्यक्तीचे हे मंदिर असणार आहे.
आता जर स्वतःला "हिंदुत्ववादी" म्हणणाऱ्या पक्षाला जर अशी दुर्बुद्धी सुचत असेल तर आधी त्यांनी स्वतःच हिंदुत्व तपासून घ्याव...

आणि खरंच श्रेय जायची भीती असेल तर हिरव्या चादरी टाकून कित्येक मंदिर बाटवली गेलीत त्यांची पुनर्स्थापना करून स्वतः श्रेय घ्यावं...

🚩|| जय श्रीराम ||🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अहम् ब्रह्मास्मि™🚩

अहम् ब्रह्मास्मि™🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @That_Pune_Guy2

25 Nov
गोष्ट आहे एका तालुक्याची...
एका अशा तालुक्याची जो एकेकाळी गुन्हेगारी बाबत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर होता.

तालुक्याचं नाव - #मुळशी

एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती...
सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.

४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
संकल्पना होती - "आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र"
एक असे केंद्र जे तरुणाईला अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम व्यक्ती होण्याची प्रेरणा देईल.

मुळशी तालुक्यात अनेक होतकरू तरुण तरुणी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणी किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरत होते.
Read 10 tweets
11 Aug
#tweet4bharat 🇮🇳
राष्ट्रीय एकात्मता आणि आपण -

आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
इंग्रजांना भारतातून हाकलून दिल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही.

काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.
Read 9 tweets
22 Jul
आज २२ जुलै - राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत पिंगली वैंकय्या यांनी बनवलेला झेंड्यावर आधारित #तिरंगा "राष्ट्रीय ध्वज" म्हणून स्वीकारला गेला.

#तिरंगा फडकावण्यासंबंधी काही नियम खालीलप्रमाणे-
२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.
१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.
Read 12 tweets
17 Jul
संघाचे तृतीय वर्ष शिबीर सुरु होते..
दरम्यान २ स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं. खरंतर स्वयंसेवकांमध्ये "भांडण" हा प्रकार तसा संघाला नवीन..

सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल म्हणून दुर्लक्ष केल गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं.
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार?" म्हणून..

दोघांनाही त्यात प्रचंड रस होता आणि त्याच पदामध्ये, दुसऱ्या कोणत्याही पदामध्ये नाही. तडजोड कोणालाच मान्य नव्हती..
दोघांचा एकमेकांना प्रचंड विरोध होता. प्रसंगी, मारामारीसुद्धा झाली. दोघांची बाजू ऐकून सोक्षमोक्ष लावायचा ठरलं..

एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. दुसऱ्याचे म्हणणे होते,"एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही."
Read 9 tweets
26 Apr
आद्य भारतीय समाजसुधारक व युगपुरुष "महात्मा बसवेश्वर" यांची आज जयंती..!!

त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी त्यांचा जन्म ११०५ साली वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा हा अल्प परिचय (थ्रेड)👇
बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता.

बसवेश्वर हे वेदशास्त्रात,धनुर्विद्येत पारंगत असल्याने राज्याचे प्रधान झाले.त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली.
रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या.

पुढे, बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत समाजाची स्थापना केली व त्याच्या प्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले.
Read 14 tweets
25 Apr
चीनमधला कोणताही बडा नेता अगदी जिनपिंग भारतात आला तरी तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो.

काहीच जणांनी ज्याचं नाव ऐकलं असेल अशा कोटणीस कुटुंबाची..

इथे भारतात आजही डॉक्टरांवर हल्ले होत असताना ७० वर्षांनी ही एका डॉक्टरला मृत्यूपश्चात चीनमध्ये किती सन्मान दिला जातो याच हे उदाहरण..!!👇
दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते.

त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते.

डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव...
जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती.

त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं एक भारतीय पथक चीनला गेलं होत. त्या टीममध्ये डॉ. कोटनीस हे एक होते.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!