#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट #औषधीवनस्पती (1)
पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
सातपुडा , तामिळनाडू मधिल काही भागात या झाडाची वेढी १.२ मीटर ते १.५ मीटर वाढलेली दिसून आली आहे . झाडाची साल १ ते २ सें मी . जाडीपर्यंत वाढते व पातळ ढिलप्याचे स्वरुपात गळूनही पडते . त्यामुळे बुंध्यावर आडव्या रेषा दिसतात . पाने द्विपीच्छक असतात . या संयुक्त पानाची मधली शीर जवळ
(3)
जवळ २५ ते २६ सेंमी लांब असते . पानाच्या देठाशेजारी अंडाकृती छोटी गुठळी आढळून येते . फुले स्तवक धारणेची असते . प्रत्येक पुष्प खोडास पुष्पबंदाक्ष पद्धतीने जोडलेले असते . या झाडाच्या वाढीचा वेग उत्तम आहे . उत्तर भारतात १२ वर्षे वयाच्या झाडाची वेढी १ ते १.३ मीटर झालेली आढळते
(4)
या झाडाचा वार्षिक वाढीचा वेग ४ ते १० सें . मी . इतका आहे . जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात पानगळ सुरू होते आणि एप्रिल - मे महिन्यात नवीन पालवी फुटू लागते . ज्या ठिकाणचे हवामान झाडांस पोषक आहे अशा ठिकाणची झाडे क्वचित पर्णरहीत दिसतात . झाडांची पानगळ होणे आणि नवीन पालवी फुटणे
(5)
यासाठी पाऊस आणि हवामानातील आद्रता याचा विशेष परिणाम होत नाही . परंतु हवेतील उष्णतामानामुळे पानगळ आणि नवीन पालवी फुटणे यावर परिणाम होतो . फुलांचा बहर झाल्यानंतर शेंगा येण्यास सुरुवात होते आणि नोव्हेंबर - डिसेंबरपर्यंत शेंगाची पूर्ण वाढ होते . तर फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत
(6)
शेंगा
पक्व होतात . उत्तर भारतमध्ये हवामानच्या फरकामुळे जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत शेंगा पक्व होतात . साधारपणे शेंगाची लांबी १० ते २० सेंमी . असते आणि त्यामध्ये १०-१२ बिया मिळू शकतात . पिकलेल्या शेंगांचा रंग गडद लालसर तपकिरी असतो . पक्क झालेल्या शेंगा उन्हामुळे फुटतात
(7)
बी चे कवच गुळगुळीत असून हिरवट तपकिरी रंगाचे असते आणि चामडयासारखे चिवट असते .
लागवडीस उपयुक्त वनस्पती -
हे झाड शीघ्र गतीने वाढणारे आहे . तसेच ते विविध प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढू शकणारे असल्यामुळे याची लागवड अनेक राज्यांमध्ये केलेली आहे . शिवाय वनशेतीच्या
(8)
कार्यक्रमांतर्गत अनेक शेतकर्यांनी देखिल लागवड केलेली आहे . क्षारयुक्त आणि आम्लयुक्त जमिनीवरील प्रायोगिक लागवडीस चांगले यश मिळालेला आहे . मुळांवरील गाठीतील जीवाणूंच्या संयुक्त सहवासामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे जमिनीचा कस वाढतो
(9)
बी संग्रहण आणि साठवण - जानेवारी ते मे या महिन्यापधेत जागेवरील परिस्थितीनुसार झाडावरील शेंगा पिकून बी तयार होते . पिकलेल्या शेंगा गडद रंगाच्या असतात . अशा पिकलेल्या शेंगापासूनच बी गोळा करावे पिकलेल्या शेंगा झाडावरुन खाली पडण्याची वाट न पाहता गोळा कराव्यातत्या सूर्यप्रकाशात
(10)
वाळवून घ्याव्यात म्हणजे शेंगा तडकून फुटतात . अशा शेंगातून निघणारे बी गोळा करावे . क्वचितप्रसंगी शेंगा धोपटून त्यातून निघणारे बी गोळा करावे . गोळा केलेल्या बियांमधून खराब बी बाजूला काढून ते चाळून घ्यावे . १ किलो सुकलेल्या शेंगापासून अंदाजे २५० ते ३७५ ग्रॅम बी मिळू शकते
(11)
इमारती माल , वासे , कागद आणि लगदा - झाडापासून मिळणारे लाकूड इमारती मालासाठी उपयुक्त आहे आणि याचा उपयोग सर्वसाधारणपणे घरबांधणीसाठी लागणारे खांब , तुळय्या , तक्ते , बैलगाड्या तयार करण्यासाठी , ट्रक बस यांच्या बांधणीसाठी इ . कामासाठी होतो . आकर्षकता हा भागजरी कमी असला तरी ह्या
(12)
लाकडापासून उत्तम प्रकारचे फर्निचर बनवता येते . याचे आणखी अनेक उपयोग आहेत , जसे विशिष्ट बांधणीच्या होड्या , खाणकाम , तेलघाणा आणि भात सडाईसाठी इत्यादी . मोठे फलक आणि टेबलाचे तक्ते उठावदार असतात . गुंतलेले तंतू कामी येतात.या लाकडाला सहसा वाळवी लागत नाही . या लाकडावर संरक्षित
(13)
प्रक्रिया करणे कठीण आहे . कारण गाभ्यावर केवळ अंशत : प्रक्रिया होते.प्रक्रिया व्यावसायिक दृष्टीने तशी सोपी आणि फायदेशिर आहे . लाकूड कठीण आणि काष्ठ तंतू गुंतलेले असल्यामुळे चिरकाम करणे अवघड जाते . लाकडाचा पृष्ठभाग काळजीपूर्वक काम केल्यास गुळगुळीत करता येतो आणि पॉलिशही चांगले
(14)
होते . खाणीमध्ये प्रक्रिया केलेले लाकूड आधारखांब म्हणून वापरले जाते अशाच प्रकारच्या इतर कामासाठीही ते इतरत्र वापरले जाते . काष्ठ तंतू साधारपणे ०.७० ते १.६५ मी.मी. लांब असतात ( सरासरी ०.९ ० मी.मी. ) तर व्यास ०.०१४ ते ०.०२८ मी.मी. ( ०.०२ मी.मी. सरासरी ) लाकडाचे रासायनिक पृथ
(15)
करण केल्यानंतर असे आढळून आले आहे की , लगद्याकरीता हे झाड योग्य आहे . सल्फेट पद्धतीने लगदा शुद्ध केल्यावर ५०.३ टक्के
लगदा मिळू शकतो . काठ / तंतू ते लांबीने कमी असल्याने ते बांबूपासून मिळणाप्या लांब धाग्याच्या लगद्यामध्ये भिसळून वापरले जातात . हे प्रमाण योग्य तेवते वापरून
(16)
त्यापासून चांगला कागद तयार होतो . असा तयार झालेला कागद लिखाणासाठी आणि छपाईसाठी उपयुक्त आहे.जनावरांसाठी चारा जनावरे , शेळ्या मेंढया या झाडाचा पाला आवडीने खातात , झाडाला कोवळ्या फांद्या चारा म्हणून हत्तींना खूप आवडतो रोपवनामधित कोवळ्या रोपांची पाने हरीण खाऊन टाकले आणि जवळजवळ
(17)
रोपांच्या काड्याच उरतात महाराष्ट्र , ओरिसा , पंजाब , त्रिपुरा या राज्यात झाडांची पाने तोडून जनावरांसाठी चारा माणून वापरती जातात . चाऱ्यामध्ये १८ : ९ टक्के प्रथिने ३.३ टक्के चरबी , ३ ९ .७ टक्के कार्बोहायड्रेट , १.५१ टक्के क्षार , १.२० ट । फॉस्फरस , ३१ ९ टक्के तंतूमय पदार्थ
(18)
आणि ६.२ . टक्के राख खनिजे असतात . इंधन वाळलेल्या रसकाष्ठाची ज्वलनक्षमता ४८७० के सी.एल. / प्रति किलो असते आणि गाम्याच्या लाकडाची ४८६५ के.सी.एल / प्रति किलोअसते . या झाडाच्या लाकडा पासून उत्तम प्रतीचा कोळसा तयार करता येतो ( ३ ९ .५ टक्के ) सर्वसामान्यपणे या लाकडाचा जळाऊ सरपण(19)
म्हणून उपयोग केला जातो . हे उत्तम प्रतीचे सरपण आहे . लाकडामध्ये ६.८४ टक्के आद्रता , ८ ९ .५६ टक्के कर्य आणि इतर सेंद्रीय पदार्थ असतात . राख ( खनिजे ) ३.६ टक्के असतात . १.०० टक्के शुद्ध कोळशाच्या ज्वलन क्षमतेशी याची तुलना केल्यास चलन क्षमता ८६.९ टक्के आहे .१ किलो लाकूड जाळून
(20)
१०७ अश सेल्सिअस उष्णतामानामध्ये १३ लिटर पाण्याची वाफ होऊ शकते . पर्यावरण संधारण नैसर्गिक हवामानाशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती असल्यामुळे ,निकृष्ठ शुष्क आणि अवनत जागेवर हे झाड येऊ शकले . म्हणून रोपवन निर्मितीच्या कार्यक्रमात या झाडाचा विचार केला जातो . दुष्काळसदृष्य परिस्थितीत(21)
टिकून राहण्याची क्षमता असल्यामुळे कमी पावसाचे प्रदेशात लागवडीसाठी या झाडाची निवड प्राध्यान्याने केला जाते . क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त जमिनीत लागवडीसाठी प्रोयोगिक तत्त्वावर पांढऱ्या शिरसाचा वापर केलेला आहे . झाडाची वाढ झपाट्याने होत असल्याने मृद संधारणात याचा उपयोग होतो.
(23)
शिवाय जमिनीत वनाचे प्रमाण वाढवत येते आणि त्यामुळे जमिनीचा मगदूर सुधारतो . हे झाड वाढल्यानंतर दिसावयास सुंदर असल्याने बागेमध्ये वरस्त्याच्या दुतर्फा लावले जाते . इतर उपयोग पांढऱ्या शिरसाचे लाकूड इतर निरुपयोगी लाकडाच्या तुकड्यासमवेत सर्वसाधारण बळकट असणाऱ्या पिनबोर्ड तयार
(24)
करण्यासाठी वापरले जाते . कीटकानाशक म्हणून याच्या पानांचा उपयोग होतो . शिवाय अल्सरवरिल उपायोजनेतही पानांचा उपयोग होतो . कर्करोग प्रतिबंधक उपाययोजनेत या झाडाच्या सर्व भागांची मुळापासून ते फळापर्यंत उपयुक्तता आहे . मुळामध्ये अल्फास्यायवेस्टेरॉल आणि संपोनिन ही द्रव्ये असतात
(25)
झाडापासून पुष्कळ डिंक मिळतो . झाडाच्या सालीत १२ ते १७ टक्के टॅनिन असते . सालीपासून अर्क काढून तो फेफज्यावर आणि रक्ताच्या अंतःस्त्रावावर औषध म्हणून वापरला जातो . मासेमारीकरता विष म्हणून वारता येते . बियांमध्ये प्रोसरे - ए हे विषारी द्रव्ये असल्याने उंदीर आणि घुशी यांनी जर
(26)
छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण प्रेम व त्यांचे वनस्पती व वन्यजीवांचे बाबतीत असलेल्या शास्त्रशुध्द आभ्यासावर माहिती घेउन सध्याच्या काळात वनांची काळजी घेउन जीवन सुधारण्यासाठी अभ्यास करणारे थोर अभ्यासक
डॉ. अलेक्झांडर गिब्सन : दी फरगॉटन फर्स्ट फॉरेस्ट कन्झर्वर ऑफ इंडिया !
(१)
जुन्नर- ओझर रस्त्यावर येडगाव धरणाच्या जलाशयाच्या काठावरचं निर्जन ठिकाण. वर निमुळतं टोकंच दिसेल असा कुणीतरी अज्ञाताने बांधलेला दगडी पँगोडा तुमचं लांबून लक्ष वेधून घेतो. दाट झाडीतून रस्ता काढत आणि गुंता झालेल्या वेली बाजूला सारत तुम्ही त्या दगडी स्तंभाजवळ पोहोचता.
" भारताचे
(२)
पहिले वनसंरक्षक म्हणून दिनांक २२ मार्च १८४७ रोजी यांची नेमणूक झाली. भारतातील वनशास्राचा मूलभूत पाया रोवून त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. वनस्पती शास्रज्ञ व वन शास्रज्ञ या नात्याने त्यांची कारकिर्द भारतीय वनशास्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यायोग्य आहे. "
हा मजकूर
(३)
#मुचकुंद #कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4
यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
ते एक प्रकारचे झुडुपच तयार होते.याची पाने लंबवर्तुळी थोडीशी मोठी असुन वरच्या बाजुने हिरवी व खालच्या बाजुने पांढरट भुरकट व लहान केस असतात.याचे फळ हे कप्प्यात असते व त्यात बी असुन त्यावर कापसा सारखे मउ चलन चिकटलेले असते त्यामुळे ते वार्यावर उडतात.हे आपल्या राज्यात
3/4
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा)
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी)
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी
हिंदी नाव - छोटा नोनिया
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1
पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
भारतात वाढते.
ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
फ.मुं. शिंदे
नगर,बीड,सोलापूर सिमाभागात चर्चेत असलेल्या बीबट्या व वाघाटी याच्यात काही सारखेपणा असेल का?
मुक्याजीवांनाही भावना (1)
असतातच ते हे खालील धाग्यातुन समजुन घेउ
Rusty spotted cat
वाघाटी
संघर्ष......
जगातील सगळ्यात सुंदर नात कोणतं असेल तर ते आई आणि तिच्या बाळाचं जगातील सूंदर चित्र कोणतं असेल तर एखादं बाळ आईच्या कुशीत विसावलेलं पण हे नातं किंवा हे चित्र ज्यावेळी दुरावत नात्यावेळी पाहणाऱ्याला
(2)
सुद्धा वाईट वाटतं कारण एक आई ज्यावेळी आपल्या पिल्लांच्या पासून दुरावते त्यावेळी ती इतकी कासावीस होते की तिला ना तहान लागते ना भूक फक्त तिला आपल्या पिल्लांची आस लागते आणि ती पिल्लं ज्यांचं जग म्हणजे फक्त आई असते त्यांची भिरभिरती नजर फक्त आईला शोधत असते आणि ज्यावेळी त्या आईला
(3)
(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)
एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस (1)
असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.
आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.'* त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.
प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
(3)
उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर... (1) टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर @Rmjs444
मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
पेरूच्या झाडाला फूल येतं , त्याला फळ येतं . त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात . हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते , पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळया उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना . अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो . उंबराच्या खोडाला जे
(3)