आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
फ.मुं. शिंदे
नगर,बीड,सोलापूर सिमाभागात चर्चेत असलेल्या बीबट्या व वाघाटी याच्यात काही सारखेपणा असेल का?
मुक्याजीवांनाही भावना (1)
असतातच ते हे खालील धाग्यातुन समजुन घेउ
Rusty spotted cat
वाघाटी
संघर्ष......
जगातील सगळ्यात सुंदर नात कोणतं असेल तर ते आई आणि तिच्या बाळाचं जगातील सूंदर चित्र कोणतं असेल तर एखादं बाळ आईच्या कुशीत विसावलेलं पण हे नातं किंवा हे चित्र ज्यावेळी दुरावत नात्यावेळी पाहणाऱ्याला
(2)
सुद्धा वाईट वाटतं कारण एक आई ज्यावेळी आपल्या पिल्लांच्या पासून दुरावते त्यावेळी ती इतकी कासावीस होते की तिला ना तहान लागते ना भूक फक्त तिला आपल्या पिल्लांची आस लागते आणि ती पिल्लं ज्यांचं जग म्हणजे फक्त आई असते त्यांची भिरभिरती नजर फक्त आईला शोधत असते आणि ज्यावेळी त्या आईला
(3)
तिची पिल्लं आणि त्या पिल्लांना त्यांची आई भेटते तो अनुभव म्हणजे एक स्वर्गाची अनुभूती असते असच काहीसा अनुभव आम्हाला आला आणि हे पण समजले की मानवाच्या चुकी मुळे अशी कितीतरी पिल्लं पोरकी होत असतील आणि अशा किती तरी आई कासावीस होत असतील आम्हाला आलेला अनुभव म्हणजे असा की
(4)
कोल्हापूर शहराजवळ कसबा बावडा येथे एका शेतात ऊस तोडणी चालू होती त्यावेळी त्या ऊसतोड मजुरांना बिबट्या सारखी दिसणारी दोन पिल्लं त्या उसाच्या फडात दिसली ही बातमी वाऱ्या सारखी पसरली की ऊसात बिबट्याची पिल्लं सापडली आहेत लोकांनाही उत्सुकता पडली आणि त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली
(5)
जो तोपिल्लांना पाहायला हातात घेऊन फोटो काढायला पुढे येऊ लागला त्यांना याचे ही भान नव्हते की त्या पिल्लांचे हाल होत आहेत त्यांना फक्त फोटो काढायची हौस होती त्या पिल्लांची काळजी नव्हती शेवटी हीबातमी आम्हाला समजली आणि आम्ही तिकडे धाव घेतली व पाहिले तर ती बिबट्याची पिल्ले नसून
(6)
ती वाघाटीची होती
वाघाटी (Rusty spotted cat ) म्हणजे रानमांजरामधील एक अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय लाजाळू जात आणि आशा वाघाटीची फक्त सतरा ते आठरा दिवसाची पिल्ले आहेत आणि त्यातील एका पिल्लाचे डोळेही पूर्ण उघडले नाहीत खूप वाईट वाटले ती पिल्लं एक सारखी आईला हाका मारत होती त्यांची
(7)
नजर त्या गर्दीत फक्त आणि फक्त आईला शोधत होती पण या गर्दीला त्याची फिकीर कुठे होती आम्ही ती पिल्ले लोकांच्या कडून घेतली व वनविभागाच्या सहकार्याने सुरू झाला आई पासून दुरावलेल्या पिल्लांना आईला परत करण्याचा संघर्ष ..
वाघाटीचा वावर फक्त रात्रीचा असलेने त्याच रात्री तिची पिल्ले
(8)
तिला परत देण्याचे ठरले त्यानुसार वनविभागाने ट्रॅप कॅमेरे पुरविले आणि जिथे ती पिल्ले दिसून आली त्याठिकाणी ते कॅमेरे बसविण्याचे ठरले व संध्याकाळी 6.30 काम चालू केले हे काम 7.30 ला संपवून पिल्ले त्या जागेवर ठेवली आणि मागे फिरलो फक्त चारच पावले टाकली तर ती आली पिल्लांची आई आली
(9)
समोर असणाऱ्या उसातून बाहेर आली आपल्या पिल्लांना आवाज देऊ लागली व्याकुळ झाली होती बिचारी तिला फक्ततिची हवी होती ती शोधत होती आम्ही लगेच तेथून बाजूला झालो,लांब जाऊन थांबलो आणि वाट पाहू लागलो ती पिल्ले घेऊन जाण्याची पण तीला ती पिल्ले दिसत नव्हती रात्र सरत होती आई सोबत आमची
(10)
ही घालमेल वाढत होती कारण आम्ही ती पिल्लं ठेवताना त्या पिल्लांच्या त्या छोट्या डोळ्यातही आभाळा एवढी आईची व्याकुळता दिसली होती रात्र भर पिल्ले ओरडत राहिली पण त्यांच्या जवळ ती आई आलीच नाही शेवटी पहाटेच्या त्या बोचऱ्या थंडीत 5.50 ला त्या वाघाटीने एक पूर्ण डोळे उघडलेले पिल्लू
(11)
घेऊन गेली दुसरं तसच राहील ज्याचे डोळे उघडलेले नव्हते ते राहील होत त्याला परत दुसऱ्या रात्री ठेवण्याचा निर्णय झाला आणि त्या पिल्लाचे दुसऱ्यादिवशी डोळे पूर्ण उघडले त्याला सकाळी उबदार जागी ठेवून दूध पाजले रात्री परत त्याच्या आईला त्याला परत करण्याचा खेळ चालू झाला पण दुसऱ्या
(12)
दिवशीही वाघाटी आलीच नाही आणि आमची काळजी वाढली तिसऱ्या दिवशी परत त्या पिल्लाला ठेवण्याचा निर्णय झाला त्यानुसार आम्ही एक वेगळे नियोजन करून त्या वाघाटीचा शोध चालू केला ती परत रात्री 8 वाजता तिथेच दिसली लगेच आम्ही घाई करून हे दुसर पिल्लू तिथे ठेवून दिले आणि ते पिल्लू आईला
(13)
हाक मारू लागलं आई पण त्याला प्रतिसाद देऊ लागली शेवटी ती आली परत आली आणि त्या दुसऱ्या पिल्लाला 8.30 घेऊन गेली आणि आम्ही एकच जल्लोष चालू केला आम्ही मोजकेच लोक होतो पण जितके होतो त्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ते दृश्यच तस होत आईला तिची पिल्ली आणि त्या पिल्लांना त्यांची
(14)
आई तब्बल तीन दिवसांनी भेटली ती व्याकुळता संपली होती मग का येणार नाही डोळ्यातून पाणी कारण शेवटही इतका सुखद आणि गोड झाला आणि WLPRS ला अजून एक यश मिळालं
(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)
एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस (1)
असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.
आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.'* त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.
प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
(3)
उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर... (1) टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर @Rmjs444
मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
पेरूच्या झाडाला फूल येतं , त्याला फळ येतं . त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात . हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते , पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळया उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना . अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो . उंबराच्या खोडाला जे
(3)
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल
---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन
जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1)
मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ (2)
मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो.परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा आसाव्या लागतात एक राणी माशी व दूसरी कामकरी माशी.कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3 (1)
परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.