उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर... (1) टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर @Rmjs444
मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
पेरूच्या झाडाला फूल येतं , त्याला फळ येतं . त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात . हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते , पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळया उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना . अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो . उंबराच्या खोडाला जे
(3)
सुरुवातीला जे हिरवे फूल लागते ते पूर्ण फूल असते . फूल इतर फुलांमध्ये बाहेर असणारे स्त्रीकेसर पुकेसर त्या फुलाच्या आतच असतात . मग असा प्रश्न पडतो की जर हे फळाच्या आत असतील तर त्याचा परागीभवन कसं होईल ? इथे निसर्गाची अद्भुतता अनुभवायला मिळते . हिरवे उंबर जरी पूर्ण बंद दिसतअसले
(4)
तरी ते तसे नसते . देठाच्या विरुद्ध भागावर एक लहान छिद्र असते आणि त पोकळी असते . खूप लहानशा छिद्रातून ' फिग वास्प ' जातीची माशी आत शिरते . त्या छिद्रातून आत शिरताना त्यांचे पंख आणि ऍण्टेना तुटून
यातही उंबराच्या फुलांमध्ये तीन प्रकारची फुलं असतात . नर जातीची ,मादी जातीची अखूड
(5)
फुले आणि मादी जातीची लांब फुले , फिग वास्प फक्त फक्त अखूड मादी फुलांमध्येच अंडी टाकू शकेल अशी तिची रचना असते . यामुळे अजून एक गोष्ट साध्य होते . ती म्हणजे नर फुले आण मोठी मादी फुले प्रजननाकरिता शिल्लक राहतात . अंडी घालून झाल्यावर ऍण्टेना आणि पंख नसलेल्या या मादीला बाहेर पडता
(6)
येत नाही . ती तिथेच मरून जाते . आता तिने घातलेल्या अंडय़ामधून नर आणि मादी वास्प जन्माला येतात . त्यांचे तिथेच मिलन होते . या नर वास्पला डोळे आणि पंख नसतातच . ते जन्माला आल्यावर उंबराला छिद्र पाडायला सुरुवात करतात , पण ते कधीच या फळातून बाहेर पडू शकत नाहीत .
(7)
' फिग वास्प'च्या नराचं अख्ख आयुष्य फक्त त्या उंबराच्या आतच जातं . या नरांनी तयार केलेल्या छिद्रातून मादया उडून बाहेर निघून जातात . नवीन उंबराच्या शोधात . तोपर्यंत इकडे उंबराच्या फुलाचे रूपांतरही फळात होत आलेले असते . त्याचा कडक हिरवेपणा जाऊन ते मऊ व लालसर होते
(8)
त्याचा वास आसमंतात पसरतो आणि ही फळं खायला प्राणी , पक्षी उंबरावर येतात . यांच्या थेट बियांपासून झाडं उगवत नाही . प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावरच त्या जोमाने रुजतात
(9/9)
लेखक----योगेश नगरदेवळेकर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)
एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस (1)
असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.
आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.'* त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.
प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
(3)
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल
---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन
जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1)
मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ (2)
मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो.परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा आसाव्या लागतात एक राणी माशी व दूसरी कामकरी माशी.कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3 (1)
परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.