#मुचकुंद #कनकचंपा
Pterospermum acerifolium
हे एक मध्यम उंचीचे मुळ भारतीय झाड आहे. ह्या वनस्पतीस कर्णिकार असेही म्हनतात.याच्या फांद्या खालच्या दिशेने लटकत्या असतात.याची पाने साधी असुन एकाआड एक पाने असतात.यास पांढऱ्या रंगाची फूले येतात व ती रात्रीच्या वेळी येतात व सुगंधीत असतात1/4
यापासून चांगल्या प्रकारचे लाकुड मिळते तसेच यापासून,खेळणी,घरातील फर्निचर,बनवतात,हे नरम असल्याने कागद बनवन्यासाठी,प्लायवुड,आगकाडी बनवन्यात वापरतात.ग्रामीण भागात याच्या पानांनवरती जेवनासाठी वापर करतात.हे एक चांगल्या प्रकारचे फुटवे देणारे झाड आहे. याच्या फांद्या जमीनीपासुनच फूटुन2/4
ते एक प्रकारचे झुडुपच तयार होते.याची पाने लंबवर्तुळी थोडीशी मोठी असुन वरच्या बाजुने हिरवी व खालच्या बाजुने पांढरट भुरकट व लहान केस असतात.याचे फळ हे कप्प्यात असते व त्यात बी असुन त्यावर कापसा सारखे मउ चलन चिकटलेले असते त्यामुळे ते वार्यावर उडतात.हे आपल्या राज्यात
3/4
नैसर्गिकरित्या कोकणात आढळते,जलद वाढणारे व सदाहरित असल्याने व सुगंधी फूले असल्याने सौंदर्यासाठी बागेत,रस्त्याच्या कडेने नदिच्या काटांनवरती लागवड होत आहे.जखमेतून रक्त वाहान्यावर पानकुठुन लावत असल्याचे ग्रामीण भागात दिसते 4/4 #औषधीवनस्पती @Phanase_Patil @fx_format @PoyrePatil
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पांढराशिरस
Albizzia procera
(leguminoseae mimosaceae)
हे एक उंच वाढणाऱ्या झाडांमधील वनस्पती आहे. साधारणपणे पंधरा वीस मीटर उंचीपर्यंत वाढते.
वृक्षाची ओळख हे झाड पर्णझाडी या सदरात मोडते . झाड उंच आणि सरळ वाढते . झाडाचा बुधा काहीसा चक्रकार असतो . झाडाची साल फिकट #औषधीवनस्पती (1)
पिवळ्या रंगाची किंवा हिरवट पांढरी ते फिकट तपकिरी रंगाची असते . काही ठिकाणी हे झाड जवळ जवळ ३६ मी . इतके उंच वाढलेले आढळले आहे . त्यात झाडाचा बुंधा सरळ १२ मीटर पर्यंत वाढलेला होता आणि लपेटी २ ते ३ मीटर होती . परंतु सर्वसाधारपणे हे झाड १८ ते २४ मीटर उंच वाढते . मध्य प्रदेश
(2)
सातपुडा , तामिळनाडू मधिल काही भागात या झाडाची वेढी १.२ मीटर ते १.५ मीटर वाढलेली दिसून आली आहे . झाडाची साल १ ते २ सें मी . जाडीपर्यंत वाढते व पातळ ढिलप्याचे स्वरुपात गळूनही पडते . त्यामुळे बुंध्यावर आडव्या रेषा दिसतात . पाने द्विपीच्छक असतात . या संयुक्त पानाची मधली शीर जवळ
(3)
#लहानघोळ
शास्त्रीय नाव -Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा)
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी)
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी
हिंदी नाव - छोटा नोनिया
इंग्रजी नाव - चिकन वीड
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्य1
पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण (2)
भारतात वाढते.
ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
फ.मुं. शिंदे
नगर,बीड,सोलापूर सिमाभागात चर्चेत असलेल्या बीबट्या व वाघाटी याच्यात काही सारखेपणा असेल का?
मुक्याजीवांनाही भावना (1)
असतातच ते हे खालील धाग्यातुन समजुन घेउ
Rusty spotted cat
वाघाटी
संघर्ष......
जगातील सगळ्यात सुंदर नात कोणतं असेल तर ते आई आणि तिच्या बाळाचं जगातील सूंदर चित्र कोणतं असेल तर एखादं बाळ आईच्या कुशीत विसावलेलं पण हे नातं किंवा हे चित्र ज्यावेळी दुरावत नात्यावेळी पाहणाऱ्याला
(2)
सुद्धा वाईट वाटतं कारण एक आई ज्यावेळी आपल्या पिल्लांच्या पासून दुरावते त्यावेळी ती इतकी कासावीस होते की तिला ना तहान लागते ना भूक फक्त तिला आपल्या पिल्लांची आस लागते आणि ती पिल्लं ज्यांचं जग म्हणजे फक्त आई असते त्यांची भिरभिरती नजर फक्त आईला शोधत असते आणि ज्यावेळी त्या आईला
(3)
(विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...)
एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर
माहिती स्त्रोत:- वाटसपवरील संदेशातील आलेली माहिती व फोटो आवडला म्हनुन आपल्या माहितीस (1)
असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे. फोटो पाहिला की असं वाटायचं - असेल एखाद्या चित्रपटातला' म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.
आज भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली. फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -दुनिया का
(2)
असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.'* त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.
प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण. याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
(3)
उंबराला फूल येत का?
या प्रश्नाचे उत्तर शोधतांना व ते उत्तर रिप्लाय मध्ये देताना परिपूर्ण माहिती एकत्र देता येण शक्य नसल्याने मी मला मिळालेला सामाना या पेपरमध्ये एका लेखकाचा लेख आपल्या माहितीसाठी सादर... (1) टिप:- रिप्लाय मध्ये शब्द मर्यादा मुळे लेख सादर @Rmjs444
मुळात उंबराला फूल येतं का ? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं . मग फूल असत तर दिसत का नाही . यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे . निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल . त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे
(2)
पेरूच्या झाडाला फूल येतं , त्याला फळ येतं . त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात . हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते , पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळया उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना . अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो . उंबराच्या खोडाला जे
(3)