मावळत्या 2020 या वर्षाने आपल्याला काय दिले ?
कोरोना ?
चक्रीवादळ ?
व्यवसाय नोकरीत नुकसान ?
मानसिक तनाव ? आत्महत्या ?
चीन-पाकिस्तान सोबत युद्धाची स्थिती ? नाही !
खरंतर 2020 ने आपल्याला संघर्ष करायला शिकवलं. देशात स्वच्छता किती आवश्यक आहे हे शिकवले. सुरक्षितता राखणे ,
एक दुसऱ्यांची मदत करणे, प्रकृती सांभाळणे , अन्नाची किंमत करणे, मानसिक संतुलन राखणे, घरचे जेवण करणे या सर्व गोष्टींची शिकवण आपल्याला दिली. तसेच विविध तर्कपूर्ण लेख आणि पोस्ट , मनाला हसवणाऱ्या अनेक हास्य आणि व्यंगात्मक पोस्ट वाचायला मिळाल्या.
या वर्षाने
आपल्याला सांगितलं की कमी खर्चात लग्न आणि कमी लोकात अंत्यसंस्कार होऊ शकतात. याच वर्षाने मेक-अपशिवाय मूळ चेहरे दाखवले. घरात राहण्यासाठी आवश्यक संयम दिला. प्रदूषण सुद्धा कमी केलं. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी मानसिक तयारी करून घेतली, हेच तर सर्व
शिकवले 2020 या वर्षाने. या काळात आपण महत्त्वाच्या लोकांना नक्कीच गमावले परंतु श्रीमंती गरिबीचा भेद मिटवला या वर्षाने.
आतापर्यंत आपण ज्यांना आपल्या पूज्यस्थानी बघत होतो त्या परमशक्ती देवाचा दर्शन घडवलंय या वर्षाने. जीवनाचं योग्य मोल जाणलंय आपण. आपण जाणलंय की योग्य अर्थाने
जीवन जगणे किती सोपं आहे .
आपली योग्य क्षमता ओळखण्याची आणि सकारात्मक विचारांना स्वीकारण्याची सुवर्ण संधी दिली फक्त याच वर्षांने.
म्हणून आपण सरत्या वर्षाला तोंड वेडवाकड करून निरोप न देता नवीन वर्षाचे स्वागत हसत खेळत करूयात. #म#मराठी#रिम#रिट्विट
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सावित्रीबाई फुले या अभय सदावर्ते यांच्या पुस्तकातील एक प्रसंग सावित्रीबाई फुले यांच स्त्री शिक्षणा विषयी समर्पण , त्याग आणि कर्तुत्व यांची साक्ष देतो .
"लुगड्याची गोष्ट"
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन
झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !"
ज्योतीराव उद्गारले,
"अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ?"
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या
शिक्षणाच काय होईल ?
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील ,-ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
"तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप