सावित्रीबाई फुले या अभय सदावर्ते यांच्या पुस्तकातील एक प्रसंग सावित्रीबाई फुले यांच स्त्री शिक्षणा विषयी समर्पण , त्याग आणि कर्तुत्व यांची साक्ष देतो .
"लुगड्याची गोष्ट"
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन
झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !"
ज्योतीराव उद्गारले,
"अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ?"
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या
शिक्षणाच काय होईल ?
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील ,-ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
"तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप
आपोआप जाईल." सावित्रीबाई.
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही , मग सावित्री असे का बरं बोलली?
तिच्याकडे एक लुगडं
असताना ती दुसरं लुगडं का मागते ? आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत , बायकोच्या लुगड्या करिता नव्हे . पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार.
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून
गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता. सावित्रीबाई पक्के जाणून
होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय ?? " लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच.
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई
शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.
त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून
माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात , त्यामुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.
सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
अशा या महान क्रांतीज्योती यांना माझा साष्टांग दंडवत 🙏 #म#मराठी#रिम#रिट्विट
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मावळत्या 2020 या वर्षाने आपल्याला काय दिले ?
कोरोना ?
चक्रीवादळ ?
व्यवसाय नोकरीत नुकसान ?
मानसिक तनाव ? आत्महत्या ?
चीन-पाकिस्तान सोबत युद्धाची स्थिती ? नाही !
खरंतर 2020 ने आपल्याला संघर्ष करायला शिकवलं. देशात स्वच्छता किती आवश्यक आहे हे शिकवले. सुरक्षितता राखणे ,
एक दुसऱ्यांची मदत करणे, प्रकृती सांभाळणे , अन्नाची किंमत करणे, मानसिक संतुलन राखणे, घरचे जेवण करणे या सर्व गोष्टींची शिकवण आपल्याला दिली. तसेच विविध तर्कपूर्ण लेख आणि पोस्ट , मनाला हसवणाऱ्या अनेक हास्य आणि व्यंगात्मक पोस्ट वाचायला मिळाल्या.
या वर्षाने
आपल्याला सांगितलं की कमी खर्चात लग्न आणि कमी लोकात अंत्यसंस्कार होऊ शकतात. याच वर्षाने मेक-अपशिवाय मूळ चेहरे दाखवले. घरात राहण्यासाठी आवश्यक संयम दिला. प्रदूषण सुद्धा कमी केलं. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी मानसिक तयारी करून घेतली, हेच तर सर्व