एखाद्या राजकारण्याने विवाहबाह्य संबंध ठेवण्यावरून वादंग उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या समाजाचे दिसणारे विविध पदर विचारात पाडतात.
"त्या"ने ठेवलेले संबंध तरण्याबांड मर्दाचे, कर्तृत्वाचे निदर्शक असतात.
"त्या"चे प्रियजन हिरीरीने समर्थनात उतरतात.
१+
आज त्याद्दल उघडपणे बोलणारी स्त्री वाईट हेतूने करतीये हे समर्थनाचं लॉजिक असतं.
हेच एखाद्या "ती" ने केलं असेल तर?
हेच एखाद्या स्त्रीबद्दल बाहेर आलं तर?
काय होईल?
विवाहबाह्य संबंध सरसकट चांगले की वाईट - हा मुद्दा नाहीये इथे. ते का होतात वगैरे मानस-समाजशास्त्रीय विवेचनही नाही.
२+
पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं बदफैलीपण - हा फरक किती खोल रुजलेल्या प्रो-मेल विचारांमधून आलाय - हा मुद्दा आहे.
एखादा कूल डूड फिल्मस्टार भरपूर लफडी करतो...ते कौतुक असतं. पण अभिनेत्रीने मॅरीड पुरुषाशी संबंध ठेवले तर ती "घर तोडणारी" असते.
राजकारणी, फिल्मस्टार्स सोडाच.
३+
सामान्य माणसांची अनंत किचकट प्रकरणं दिसतात आजूबाजूला. त्यांत स्त्रीला आणि पुरुषाला अगदी वेगळ्या प्रकारे जोखलं जातं हे वास्तव नाकारता येईल का आपल्याला?
आपण मुळात विवाहबाह्य संबंध या फार जटिल विषयावर बोलतोय. सोडा. साध्या छोट्या गोष्टींमधून हा भेद ठळकपणे दिसतोच.
४+
स्मोकिंग करणं, मद्यपान वाईटच. सर्वांसाठीच. पण कॉलेज कट्ट्यावर ४-५ पोरांसोबत एखाद् दुसरी मुलगी सिगरेट ओढत असेल तर "पोरांचं काय, चालूच असतं, पण "ती?"!!!" हीच रिअॅक्शन असेल सर्वांची. दारू ढोसून घरात पडणारे बॅचलर्स हे "मुलांचं" वीकेंडचं कर्मकांड असतं अनेकदा. मुलींचं "असू शकतं" -
५+
- याची कल्पनाही करवत नाही.
या वाईट, त्याज्य गोष्टी झाल्या.
चहाच्या टपरीवर एखादी स्त्री एकटी येऊन चहा घेत असेल तर किमान मुंबई पुण्यात तरी भुवया उंचावणार नाहीत - पण ते "वेगळं" वा "खास" नक्कीच वाटेल सर्वांना. फेसबुकवर मैत्री झाली, माणूस विश्वासार्ह वाटला म्हणून -
६+
भेटण्याची इच्छा व्यक्त करणारी स्त्री "कशी" वाटेल आम्हाला? इकडे द्वयार्थी विनोद असणारे ग्रुप्स, पेजेस आहेत. त्यावर दिलखुलासपणे व्यक्त होणाऱ्या मुली कश्या वाटतात आम्हाला?
इथपर्यंत सडलेले आहेत आमचे विचार.
राजकारण्याने "परस्पर सहमतीने ठेवलेले संबंध" हा राजकीय प्रांतांत फक्त -
७+
चवीने चाखण्याचा विषय आहे.
अमुक नेता तमुक स्त्रीला कसा "घेतोय" ही मर्दानगीची लिटमस टेस्ट आहे. जगाला नैतिकता शिकवणारे पत्रकार्स अँड पुरोगामीज रम आणि व्हिस्की रिचवत, मोठ्या धुंदीत या गोष्टी एन्जॉय करतात.
पण -
८+
हेच एखाद्या राजकारण्याच्या बायकोने केलं तर?
हेच एखाद्या स्त्री राजकारण्याच्या बाबतीत बाहेर पडलं तर?
समाज सोडा. गावात कट्ट्यावर बसलेल्या लोकांना सोडा. सोशलमिडीयावरील ट्रोल्स सोडा.
त्याच रम आणि व्हिस्की रिचवणाऱ्या लोकांची काय भूमिका असेल?
९+
त्यांच्याच कंपूत अशी नाना लफडी असतात. ऐकू येतात आम्हालापण. काय प्रतिक्रिया असतात यावर त्यांच्या?
त्यांच्यापासून झिरपत आलेले "संस्कार" संपूर्ण समाजावर घडतात.
या संस्कारांपासून मुक्ती हवीये आपल्याकडे.
१०+
त्या टपरीवर चहाचा आस्वाद मुक्तपणे घेऊ शकण्यापासून फेसबुकवर हवं ते लिहू-शेअर करू शकण्यापर्यंत स्त्री-मुक्तीची आवश्यकता आहे आपल्याकडे.
एक व्हिडीओ व्हायरल होतोय सध्या.
बँड सुरु आहे. पब्लिक बेभान होऊन नाचतंय. एक म्हातारा आहे नाचणाऱ्यांत. अचानक तो धूम ठोकतोय. कारण -
११+
एक कृश म्हातारी (बहुदा त्याची बायकोच) हातात मोठी काठी घेऊन त्याला बदडायला धावतीये.
फेमिनिजमचा अतिरेक नकोच.
पण ह्या गचाळ पुरुषसत्ताक वृत्तीला त्या आजीबाईच्या दंडुक्याने सोलून काढायला हवंय आपण सर्वांनी.
मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.
तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -
१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.
तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.
२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?
प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,
स्त्रियांना नोकरीचा अधिकार असावा काय? - नको! त्याने पुरुष बेरोजगार होतील!
देशात औद्योगिकरण करावं काय? - नको! त्याने गरिबी वाढेल!
भारतात मॅकडॉनल्ड्स यावं काय? - नको! त्याने वडापाववाले देशोधडीला लागतील!
FDI? - नको! त्याने देशी उद्योग परकीयांच्या मुठीत जातील!
१+
ईकॉमर्स? - छोट्या दुकानदारांचे शत्रू!
कम्प्युटर? - मानवी मेंदूचा शत्रू!
ओला-उबर - रिक्षा/टॅक्सीचे शत्रू!
श्रीमंत - गरिबांचे शत्रू...
शिक्षित - अशिक्षितांचे शत्रू...
शहरी - गावकऱ्यांचे शत्रू...
२+
"प्रतिगामीत्व"वर कुणा एकाच विशिष्ठ वैचारिक समूहाची मक्तेदारी नाही...हे सिद्ध करणारी वरील उदाहरणं. तरी यांत जात-धर्म-भाषा-प्रांत या फॉल्टलाईन्स गृहीत धरलेल्याच नाहीत.
मुद्दा हाच की "आम्ही" विरुद्ध "ते" अशी मांडणी करण्याची हौस सर्वांनाच असते. आणि -
किमान २० वर्षांचा राजकीय डॉमिनन्स, संघाचा राष्ट्रीय स्तरावरील आधार, ७ वर्षांची केंद्रीय सत्ता, कित्येक राज्यांमध्ये दीर्घ सत्ता - तरी देशभरात १०० शेतकरी संघटना असू नयेत ज्यांनी शेतकरी बिलांना उघड आणि प्रखर समर्थन देत मोर्चे काढलेत?
१+
"फक्त पंजाबचे शेतकरी विरोध करताहेत" - हे जर खरं असलं - तर इतर राज्यांमधले शेतकरी कुठे आहेत? कायद्यांच्या समर्थनात कोण कुठे मोर्चे काढताहेत?
हे आंदोलन एका रात्रीत भडकलेलं नाही. किमान ३ महिन्यांपासून तापतंय. काय केलं भाजपने? (सरकारने नव्हे - भाजपने!)
२+
दरवेळी "ते देशद्रोही आहेत!" "ते खोटारडे आहेत" असं रडत रहायचं का? त्यांचा प्रचार खोटा कसा आहे हे मुद्देसूद मांडून त्यातील हवा काढता येऊ नये का? दरवेळी "पण त्यांनी झोपल्याचं सोंग घेतलंय!" म्हणत रहायचं का?
एक माणूस एकाच जीवनात काय काय करू शकतो हे स्व-कर्तृत्वाने दाखवून देणारा महामानव.
दुःखाचं, दारिद्र्याचं भांडवल करत वेळ नं घालवता, त्याच्या छाताडावर पाय रोवून उभं रहाणं म्हणजे काय हे कृतीतून दाखवून देणारा महामानव.
१+
एकीकडे वर्तमान परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर प्रहार करत, दुसरीकडे, परिस्थिती बदलण्यासाठी "आपण" काय करायला हवं याचा रोडमॅप तयार करणारा महामानव.
नुसता रोडमॅप तयार करून, तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळवून, "आता तुमचं तुम्ही बघा" नं म्हणता -
२+
स्वतः एकेक माणूस हातात हात धरून पुढे घेऊन जाणारा महामानव.
एका मोठ्या समूहाच्या उत्थानासाठी झोकून देऊन काम करत असतानासुद्धा...इतरांकडे पाठ नं फिरवणारा...संपूर्ण समाजासाठी चांगलं-वाईट काय असेल, देशाची भविष्यातील दिशा कशी असावी, जगात घडलेल्या गोष्टींचा आपण काय धडा घेऊ शकतो -
मिळालेली सत्ता "राबवणं" आणि मिळालेली सत्ता "राखणं" या दोन्ही बाबतीत भाजप नेहेमीच कमकुवत राहिला आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत. सध्या केंद्रीय स्तरावर सुरु असलेला दिग्विजय भाजपच्या "कोअर स्वभाव"च्या अगदीच विपरीत आहे. पण -
१+
मोदी-शहा जोडगोळीने रेटून बसलेल्या सिस्टीममुळे ते शक्य होतंय. अर्थात, गिव्हन इनफ टाईम, ही सिस्टीम रुजेल आणि तोच कोअर स्वभाव होईल - अशी आशा अनेकांना आहे.
तसं घडेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच.
सध्या हे वास्तव मान्य करणं आणि त्यानुसार -
२+
महाराष्ट्र भाजपचा "परफॉर्मन्स" बघणं आवश्यक ठरतं.
मोदी-शहा जोडगोळीमुळे सतत विजयाची सवय लागलेल्या भाजप समर्थकांना, भाजपच्या मूळ स्वभावानुसार महाराष्ट्रात जे काही घडून आलं ते अजिबात पचनी पडलेलं नाही. ठराविक वर्तुळात अजूनही फडणवीसांना "माननीय मुख्यमंत्री" म्हटलं जातं...तर इतर -