प्रॉब्लम हा आहे की व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये.

===

Broadcast Audience Research Council च्या माजी CEO, पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचा एडिटरइनचीफ अर्णब गोस्वामी यांच्या तथाकथित चॅट्सवरून हलकल्लोळ माजलाय. चॅट्स किती खऱ्या आहेत इथपासून सुरुवात आहे.

१+

#ArnabChatGate
दासगुप्तांना त्रास दिला गेलाय या तक्रारीदेखील वाचायला मिळाल्या आहेत. पण तूर्तास या चॅट्स मुंबई पोलिसांनी उघड केल्या आहेत म्हणजे खऱ्या आहेत असं मानून चालू.

राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटात या चॅट्समध्ये नेमकं गंभीर काय आहे हे नीट बघितलं तर मला ४ आरोप प्रामुख्याने दिसलेत.

२+
पहिला - पुलवामा अतिरेकी हल्ला झाल्याचा आनंद होणे

दुसरा - बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल आधीच माहिती असणे

तिसरा - टीआरपी कमी-जास्त करण्याबाबत BARC च्या माजी CEO आणि COO मधील संभाषण

चवथा - "AS" ला TRAI वर प्रेशर टाकण्याबद्दल कळवणे

३+
पहिला आरोप अर्णबच्या "This attack we have won like crazy" या वाक्यावरून होतोय.

त्या आधीचे ३-४ वाक्य वाचले तर लक्षात येईल अर्णब या हल्यासंबंधित त्याच्या चॅनलने केलेल्या रिपोर्टींग आणि त्या रिपोर्टींगला मिळालेल्या व्ह्यूअरशिपबद्दल बोलतोय.

म्हणजेच -

४+
या हल्ल्याच्या रिपोर्टींगच्या बाबतीत "वूई हॅव वन बिग" असं तो म्हणतोय.

टीआरपी आणि एंगेजमेंट अत्यंत महत्वाचे असलेल्या व्यवसायात अर्णब आहे. त्यामुळे त्याने अश्या रिपोर्टींगला मिळालेला प्रतिसाद "विन" म्हणणं त्याच्यासाठी स्वाभाविक आहे. अर्थात हे असंवेदनशील नक्कीच आहे.

५+
एका जबाबदार नागरिकाने "या" गोष्टीचा आनंद व्यक्त करूच नये. पण ते तितकंच. असंवेदनशील असल्याचा आरोप अर्णबवर होऊच शकतो. पण यात देशद्रोही वगैरे काहीच नाहीये.

(जेटलींच्या आजारपणाबद्दलदेखीलअसंच असंवेदनशील संभाषण आहे त्याचं. पण यावर आक्षेप घेणारे तरी कोण आहेत?! -

६+
"अमुक माणसाच्या मृत्यूवर उद्याचा अग्रलेख लिहून झालाय...तो अजून गेला की नाही?" याची चौकशी करत हॉस्पिटलमध्ये येरझाऱ्या घालणाऱ्या महामहिम संपादकांच्या कथा माहितीयेत आम्हाला!)

#ArnabExposedPulwama

७+
दुसरा आरोप तर अक्षरशः हास्यास्पद आहे.

अख्ख्या भारताला माहिती होतं की यावेळी मोठं काहीतरी घडणार आहे. अहो पाकिस्तानला देखील माहिती होतं. हे मोठं काय असेल याबद्दल विविध थियरीज होत्या. माझी दिल्लीच्या सत्तावर्तुळाशी शून्य ओळख आहे, तरीही त्याकाळात -

८+
विविध "खात्रीशीर" थियरीज मला सांगितल्या जात होत्या. अर्णब तर सत्तावर्तुळाच्या अगदी जवळचा. (सगळेच चीफ एडिटर्स असतात. अर्णबचं काही कौतुक नाही!) त्यानेसुद्धा बरंच काही ऐकलं असणार. त्यावरून असंच काहीतरी भाकीत वर्तवलं त्याने. "समथिंग बिग विल हॅपन" असं "काहीतरी मोठं घडणार" -

९+
हे लिहिणं म्हणजे स्टेट सिक्रेट शेअर करणं असतं काय?

स्टेट सिक्रेट कश्याशी खातात कल्पना आहे का? काय होणार, कसं होणार, कधी...कुठे...कोण...अशी माहिती उघड केली असती तर त्या आरोपात काही तथ्य आहे.

तसं नसेल आणि काहीही थियरीज शेअर करणं म्हणजे स्टेट सिक्रेट उघड करणं असेल तर मग -

१०+
आपले विविध व्हाट्सअप ग्रुप अगदी मोसादला टक्कर देणारे ठरतील...!

एवढ्याश्या गोष्टीवरून अर्णब देशद्रोही, अर्णबने स्टेट सिक्रेट्स विकले वगैरे आरोप होणं अर्णबच्याच राजकीय विरोधकांची बुद्धिमत्ता दर्शवणारं आहे.

११+
विविध राजकारणी, प्रतिस्पर्धी मीडियामन इत्यादींबद्दल शेरेबाजी वगैरे अगदीच किरकोळ गोष्टी आहेत. समर्थनीय नाहीत. पण किरकोळ आहेत. पुन्हा - आपण आपल्या ऑफिस कलिग्ज, स्पर्धक, राजकारणी, पत्रकार यांबद्दल कसं बोलतो हे तपासून बघा एकदा. त्यांपेक्षा वेगळं काय आहे या चॅट्समध्ये?

१२+
तिसरा...अर्थातच टीआरपी स्कॅमचा - ज्याचा अर्णब आज आरोप आहेच.
अर्णबने आपली शक्ती (आर्थिक, राजकीय लागेबांधे...सगळंच) वापरून रिपब्लिकचा ब्रँड मोठा करण्याचे प्रयत्न केले हे आरोप किती व्हॅलिड आहेत हे येत्या काळात कळेलच. मागे पोलिसांनी "आत्महत्येस प्रवृत्त केलं" या आरोपाखाली -

१३+
अर्णबला घरात घुसून अटक केली. त्यावेळी देशभरात विविध पातळीवरून अर्णबला समर्थन मिळालं. ते समर्थन पोलिसांनी केलेल्या वर्तनामुळे मिळालं होतं. ते आरोप असोत वा हे टीआरपी स्कॅमचे आरोप असोत...सिद्ध झाले तर अर्णबला योग्य ती शिक्षा व्हायला हवीच, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.

१४+
चवथा आरोप सर्वात गंभीर आहे.

"AS" ला TRAI वर प्रेशर टाकण्याबद्दल कळवण्याची चर्चा आहे. AS म्हणजे अर्थातच अमित शहा - असा सार्वत्रिक समज आहे. आणि तो योग्यच असण्याचीच शक्यता आहे.

त्यामुळे या मुद्द्याची सखोल चौकशी व्हायलाच हवी.

१५+
माध्यमस्पर्धेत स्वतःचं स्थान पुढे नेणं असो वा त्यांच्यासाठी राजकीय सोय उपलब्ध करून देणं असो - BARC, TRAI या सरकारी संस्थांचा वापर "असा" होणं अजिबात योग्य नाही. अर्थात - आजपर्यंत हे होत नव्हतं असं मानणारे बाळबोधच. नकोश्या लोकांना साधे सॅंक्शन्स मिळणं अशक्य करण्यापासून काय -

१६+
काय केलं जात होतं हे सर्वश्रुत आहे.

आणि ते सगळं बदलायला हवं - म्हणून भारताने सत्तापरिवर्तन घडवून आणलं आहे.

जुने जाऊन नवे आले बस्स इतकाच फरक उरणार असेल तर त्याला अर्थ नाही.

"TRAI ची कृती "AS" च्या पोलिटिकल इंटरेस्टच्या विरुद्ध आहे हे सांगणारे ३ पॉईंट्स पाठवा" -

१७+
असं धारिष्टयाने विचारणारा अर्णब आजच्या भ्रष्ट पत्रकारितेचा टिप ऑफ द आईसबर्ग आहे. त्याला धरून वर काढायला हवा आणि खालचा लपलेला भागही उघड व्हायलाच हवा.

एका राष्ट्रीय मीडिया चॅनलचा मालक म्हणून अर्णबसारख्या रिसोर्सफुल माणसाचे दिल्ली पावर कॉरिडॉरमध्ये भरपूर कॉन्टॅक्ट्स असणारच.

१८+
तो अनेकांसाठी एक वेगळ्या अर्थाने "माध्यम" चं काम करतच असणार.

हाच आपल्या (आपल्याच नव्हे, जगभरातल्या) माध्यम विश्वाचा सर्वात वाईट भाग आहे. जगावर उपकार करतोय अश्या अविर्भावात जगणारे पत्रकार वास्तवात विविध पार्टीजची आपापसात देवाण-घेवाण करणारे एजंट असल्यासारखे काम करत असतात.

१९+
एरवी कॅपिटलिस्ट सिस्टिम्सच्या नावाने खडे फोडणारे सगळे लिबरल जर्नोज वेगवेगळ्या बिझनेसमनसाठी लॉबींग करत असतात.

पंतप्रधानांच्या फॉरेन व्हिजिट्स याच लॉबींगची सुवर्णसंधी असते. पंतप्रधानांनी पत्रकारांना फॉरेन व्हिजिट्सना घेऊन जाण्याचा युपीए काळातील प्रघात नरेंद मोदींनी -

२०+
मोडीत काढल्यानंतर, याच व्यवहारांमध्ये व्यत्यय यायला लागला - त्यावर काही प्रस्थापित पत्रकारांनी "आम्ही आमचे पैसे देऊ पण तुमच्याबरोबर येऊ द्या" अशी गळ घातली होती. ती याच कारणासाठी.

अर्णबदेखील हे करत असणारच.

म्हणूनच अर्णब कुणी धुतल्या तांदळाचा साधू पुरुष नाहीये -

२१+
हे किमान सद्सद्विवेकबुद्धी असलेल्या प्रत्येक भारतीयाला माहिती आहेच. दुटप्पी पु गँगला मात्र हा प्रामाणिकपणा दाखवता येत नाही.

पंतप्रधानांबरोबर फॉरेनला जाण्याचा हट्ट धरणाऱ्या पत्रकार मंडळींच्या साधनशुचितेबद्दल त्यांना शंका घेववत नाही.

२२+
देशातल्या प्रत्येक नागरिकाला माहित असलेलं "बदला घेतला जाईल" हे भाकीत अर्णब करतो म्हणून तो देशद्रोही असतो.

पण २६-११ हल्ल्याचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवत अतिरेक्यांचे आईज अँड ईअर्स राहिलेले पत्रकार मात्र शुद्ध सभ्य सात्विक असतात.

हा दुटप्पीपणाच अर्णबला वाचवून जाणार आहे.

२३+
हाच दुटप्पीपणा आपल्याला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊ देणार नाहीये.

अर्णब खरंच लॉबींग करतो का ते उघड व्हावं आणि करत असेल तर त्याला जबर शिक्षा व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण हे सगळं होईल का - याबद्दल मी साशंक आहे.

२४+
पत्रकार - खासकरून एडिटोरियल रोलमधील "उच्च"वर्णीय - दलाल झाले आहेतच.

अर्णब त्यांमधील एक असण्याची शक्यता नाकारता येत नाहीच. पण ज्यांनी हे प्रकरण लावून धरायला हवं तेच या काळ्या व्यवहारात रुतलेले आहेत.

त्यामुळे नेहेमीप्रमाणेच -

२५+
मुळापर्यंत किती लोक जातील - याचं उत्तर एक भलामोठा शून्य हेच आहे.

ट्विटरवर गोंगाट तेवढा होईल.

पण या प्रकारच्या मुळाशी कुणीच जाणार नाही.

२६+
कारण एकाचं बाहेर आलं की सर्वांचं येणार.त्यामुळे कुणीच खरं बोलणार नाही.

कारण व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये -

आणि - हाच खरा प्रॉब्लम आहे.

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

15 Jan
एखाद्या राजकारण्याने विवाहबाह्य संबंध ठेवण्यावरून वादंग उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातून आपल्या समाजाचे दिसणारे विविध पदर विचारात पाडतात.

"त्या"ने ठेवलेले संबंध तरण्याबांड मर्दाचे, कर्तृत्वाचे निदर्शक असतात.
"त्या"चे प्रियजन हिरीरीने समर्थनात उतरतात.

१+
आज त्याद्दल उघडपणे बोलणारी स्त्री वाईट हेतूने करतीये हे समर्थनाचं लॉजिक असतं.

हेच एखाद्या "ती" ने केलं असेल तर?
हेच एखाद्या स्त्रीबद्दल बाहेर आलं तर?

काय होईल?

विवाहबाह्य संबंध सरसकट चांगले की वाईट - हा मुद्दा नाहीये इथे. ते का होतात वगैरे मानस-समाजशास्त्रीय विवेचनही नाही.

२+
पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं बदफैलीपण - हा फरक किती खोल रुजलेल्या प्रो-मेल विचारांमधून आलाय - हा मुद्दा आहे.
एखादा कूल डूड फिल्मस्टार भरपूर लफडी करतो...ते कौतुक असतं. पण अभिनेत्रीने मॅरीड पुरुषाशी संबंध ठेवले तर ती "घर तोडणारी" असते.

राजकारणी, फिल्मस्टार्स सोडाच.

३+
Read 12 tweets
12 Dec 20
बॉलिवूडमधली संधी नाकारून मैथिली ठाकूर चुकली का?

===

मैथिली ठाकूर या गोड गळ्याच्या गुणी गायिकेने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी नाकारली म्हणून तिचं बरंच कौतुक होतंय. नाकारण्याचं कारण? बॉलिवूड हिंदू धर्मविरोधी आहे.

तिने उचललं पाऊल तिच्या करिअरसाठी योग्य की अयोग्य -

१+
बॉलिवूड खरंच हिंदू धर्मविरोधी आहे की नाही - या मुद्द्यांवर वाद घालण्यात अर्थ नाही. तिने तिला योग्य वाटलं ते केलं.

तिचं पाऊल योग्य, समर्थनीय, कौतुकास्पद वाटणाऱ्या मित्रमंडळींनी मात्र विचार करावा असं वाटतं.

२+
बॉलिवूडमध्ये हिंदू धर्मावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका, हनन होत असतं हा जर आक्षेप असेल - तर त्यावर आपलं प्रत्युत्तर काय असायला हवं?

प्रेक्षक म्हणून तुम्ही-आम्ही बहिष्कार घालणं ठीकच. पण हिंदू धर्मप्रेमी, भारतीय संस्कृती प्रेमींनी बॉलिवूडवर बहिष्कार घालणं आपल्या मूळ आक्षेपाचं,

३+
Read 10 tweets
10 Dec 20
हा व्हिडीओ आयटी सेल ने तयार केलाय असं म्हणणार का आता?

प्लिज प्लिज प्लिज - ब्रेकिंग इंडिया फोर्सेसची कार्यपद्धती आता तरी समजून घ्या!

१+
स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून मागासवर्गीयांना "रॅडिकल" करतात..

स्वतःला गरिबांचे कैवारी म्हणवून दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना भडकवून अराजक-वादी करतात..

स्वतःला समानतावादी म्हणवून जातीजातींमध्ये नसलेल्या फटी पाडून त्यात बोटं घालून अजून सामाजिक दुही निर्माण करतात..

२+
आता स्वतःला शेतकरी म्हणवून अस्तित्वात नसलेल्या, काल्पनिक अन्यायाच्या विरुद्ध उभं करून आपला अजेंडा रेटताहेत...

तो शेतकरी बिचारा या कुटील डावांपासून अनभिज्ञ असेल...पण तुम्ही तर फटाफट गुगल चटाचट युट्यूब वर फिरणारे आहात ना? कधी उघडणार तुमचे डोळे?!

३+
Read 5 tweets
8 Dec 20
स्त्रियांना नोकरीचा अधिकार असावा काय? - नको! त्याने पुरुष बेरोजगार होतील!

देशात औद्योगिकरण करावं काय? - नको! त्याने गरिबी वाढेल!

भारतात मॅकडॉनल्ड्स यावं काय? - नको! त्याने वडापाववाले देशोधडीला लागतील!

FDI? - नको! त्याने देशी उद्योग परकीयांच्या मुठीत जातील!

१+
ईकॉमर्स? - छोट्या दुकानदारांचे शत्रू!

कम्प्युटर? - मानवी मेंदूचा शत्रू!

ओला-उबर - रिक्षा/टॅक्सीचे शत्रू!

श्रीमंत - गरिबांचे शत्रू...

शिक्षित - अशिक्षितांचे शत्रू...

शहरी - गावकऱ्यांचे शत्रू...

२+
"प्रतिगामीत्व"वर कुणा एकाच विशिष्ठ वैचारिक समूहाची मक्तेदारी नाही...हे सिद्ध करणारी वरील उदाहरणं. तरी यांत जात-धर्म-भाषा-प्रांत या फॉल्टलाईन्स गृहीत धरलेल्याच नाहीत.

मुद्दा हाच की "आम्ही" विरुद्ध "ते" अशी मांडणी करण्याची हौस सर्वांनाच असते. आणि -

३+
Read 6 tweets
6 Dec 20
किमान २० वर्षांचा राजकीय डॉमिनन्स, संघाचा राष्ट्रीय स्तरावरील आधार, ७ वर्षांची केंद्रीय सत्ता, कित्येक राज्यांमध्ये दीर्घ सत्ता - तरी देशभरात १०० शेतकरी संघटना असू नयेत ज्यांनी शेतकरी बिलांना उघड आणि प्रखर समर्थन देत मोर्चे काढलेत?

१+
"फक्त पंजाबचे शेतकरी विरोध करताहेत" - हे जर खरं असलं - तर इतर राज्यांमधले शेतकरी कुठे आहेत? कायद्यांच्या समर्थनात कोण कुठे मोर्चे काढताहेत?

हे आंदोलन एका रात्रीत भडकलेलं नाही. किमान ३ महिन्यांपासून तापतंय. काय केलं भाजपने? (सरकारने नव्हे - भाजपने!)

२+
दरवेळी "ते देशद्रोही आहेत!" "ते खोटारडे आहेत" असं रडत रहायचं का? त्यांचा प्रचार खोटा कसा आहे हे मुद्देसूद मांडून त्यातील हवा काढता येऊ नये का? दरवेळी "पण त्यांनी झोपल्याचं सोंग घेतलंय!" म्हणत रहायचं का?

त्यांनी सोंग घेतलं असेल. ठीकाय.

जे जागे आहेत -

३+
Read 11 tweets
6 Dec 20
एक माणूस एकाच जीवनात काय काय करू शकतो हे स्व-कर्तृत्वाने दाखवून देणारा महामानव.

दुःखाचं, दारिद्र्याचं भांडवल करत वेळ नं घालवता, त्याच्या छाताडावर पाय रोवून उभं रहाणं म्हणजे काय हे कृतीतून दाखवून देणारा महामानव.

१+
एकीकडे वर्तमान परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर प्रहार करत, दुसरीकडे, परिस्थिती बदलण्यासाठी "आपण" काय करायला हवं याचा रोडमॅप तयार करणारा महामानव.

नुसता रोडमॅप तयार करून, तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळवून, "आता तुमचं तुम्ही बघा" नं म्हणता -

२+
स्वतः एकेक माणूस हातात हात धरून पुढे घेऊन जाणारा महामानव.

एका मोठ्या समूहाच्या उत्थानासाठी झोकून देऊन काम करत असतानासुद्धा...इतरांकडे पाठ नं फिरवणारा...संपूर्ण समाजासाठी चांगलं-वाईट काय असेल, देशाची भविष्यातील दिशा कशी असावी, जगात घडलेल्या गोष्टींचा आपण काय धडा घेऊ शकतो -

३+
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!