विड्याचे पान शास्त्रोक्त व वैज्ञानिक माहिती..!

आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही.
बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात.
हा वेल पुढे वाढत जातो.
विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा:

समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले.
थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले. भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले.
देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.

१) खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम औषधी गुणधर्म. रुची वाढवणारे, कांतीदायक, कफनाशक, सारक, शक्तीवर्धक, वायूनाशक, पोटसाफ ठेवणारे, पाचक, पित्तकारक, शरीरशुध्दी करणारे.
सर्वसामान्य उपाय सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते.

२) सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो.

३) गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते.
४) नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते.

५) विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते.

६) पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते.
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते.

७) पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते.
८) लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते.

९) पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावे.
विड्याची पाने आणि त्यांचं शास्त्रोक्त महत्व:

१) विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा वास असतो.
२) विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्ह" देवांचा वास असतो.
३) विड्याच्या पानाच्या मधोमध "सरस्वती" देवीचा वास असतो.
४) विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वती" देवीचा वास असतो.
५) विड्याच्या पानाच्या लहान देठा मध्ये "महाविष्णू" चा वास असतो.
६) विड्याच्या पानाच्या मागील बाजूस "चंद्र देवता" यांचा वास असतो.
७) विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मध्ये "परमेश्वराचा' वास असतो.
८) विड्याच्या पाना खाली "मृत्यू देवते" चा वास असतो.
(या कारणाने ताम्बुलसेवन करतांना -
बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत.)
९) विड्याच्या पानाच्या देठात "अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात.
(म्हणूनच पान सेवन करताना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्र्य लक्ष्मी येऊ नये ह्या अर्थी.)
१०) विड्याच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
या सर्व देवतांचा विड्याच्या पानामध्ये वास असल्यामुळे तांबूलास इतके महत्व आहे.

पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडे तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोणत्याही कारणे विड्याची पाने घराबाहेर जाऊ देऊ नये. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावी आणि तांबूल म्हणून द्यावीत...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

19 Jan
श्रीराम मंदिर निर्माण हेतू गृह संपर्क व निधी संकलन अभियान 🚩

हिंदूंना अपमानित करण्यासाठी बाबर ने श्रीराम जन्म भूमी येथील श्रीराम मंदिर उध्वस्थ केले आणि त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने एक बांधकाम उभे केले.
पुढे राम जन्मभूमी मुक्ती साठी तब्बल ७० लढाया झाल्या अनेकांनी प्राणाची आहुती दिली. पण राम जन्मभूमी मुक्त झाली नाही.

१९९२ साली पुन्हा एकदा श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्याचा निश्चय झाला. संपूर्ण भारतातील हिंदू एकवटले.. कुणी दक्षिणेतून श्री अय्यपा स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघाले..
कुणी बंगाल मधून काली मातेचा जय घोष करत निघाले...कुणी उत्तरेतून "जय महाकाल" च्या घोषणा देत निघाले... कुणी राजस्थान मधून "जय एकलींगजी" म्हणत रण मैदानात आले.. कुणी महाराष्ट्रातून "जय भवानी जय शिवाजी" च्या गगन भेदी घोषणा देत श्री मल्हारी मार्तंडाचा भंडारा उधळत निघाले...
Read 9 tweets
5 Jan
या देशात १०० हिंदू कोटी आहेत. पण त्यातले केक कापणारे, दर्ग्यावर माथा टेकणारे, ईद-ख्रिसमसला स्वतःचेच लग्न असल्यासारखे वागणारे किती आहेत? त्यातही हिंदुत्वनिष्ठ किती आहेत? त्यातही जात-पात, भाषा-प्रांत भेद मानणारे किती आहेत? त्यातही पक्षीय हिंदू किती आहेत?
त्यातही गट-तट असणारे हिंदू किती आहेत? त्यातही कर्माने हिंदू किती आहेत? त्यातही जमिनी स्तरावर कार्य करणारे हिंदू किती आहेत? त्यातही 'आम्ही मांडू तेच हिंदुत्व' असा अहंभाव असणारे हिंदू किती आहेत?
त्यातुन जे उरतात तेच प्रखर हिंदू... जे दर्ग्यावर माथा टेकायला जात नाहीत. केक कापत नाहीत. ईद ख्रिसमसला स्वतःचे लग्न असल्यासारखे नाचत नाहीत. जे जात, पात, भाषा, प्रांत भेद मानत नाहीत. ज्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या पक्षाच्या भूमिके प्रमाणे बदलत राहत नाही.
Read 6 tweets
3 Jan
इतकी वर्ष औरंगाबाद होतं आणि आजही आहेच. पण नेहमीप्रमाणे आता निवडणूका आल्यायत. आणि नेहमीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांचे शंभूजी महाराज प्रेम उमड़ उमड़कर वाहू लागलंय.
माझं प्रत्येक राजकीय पक्षाला आव्हान आहे, की त्यांनी निवडणूक जिंकून सत्ता स्थापन केल्यानंतर, महापौराची निवड झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत औरंगाबादचे संभाजी नगर करून दाखवावे. व असे नाही केल्यास स्वतःहून सत्ता सोडून द्यावी आणि उभ्या आयुष्यात संभाजी नगर महापालिका निवडणूक लढवू नये.
अशी शपथच म्हणा किंवा प्रतिज्ञा म्हणा निवडणुकांसाठी प्रचार करताना प्रत्येक प्रचार सभेत घ्यावी. (यासाठी तुमचा छापलेला वचननामा नकोय की जाहीरनामा नकोय.. )

आम्ही हिंदू दबावगट त्या पक्षाचा सर्व ताकदीनिशी प्रचार करू.
Read 5 tweets
23 Dec 20
ॐ चे उच्चारण

१. ॐ चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.

२. ॐ च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.

३. ॐ चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊं लागतो.

४. ॐ चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.
५. ॐ चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पाचन शक्ति मजबूत होते.

६. ॐ चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.

७. ॐ चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.

८. ॐ चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.
९. ॐ चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.

१०. ॐ चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.

११. ॐ चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.
Read 4 tweets
23 Dec 20
● ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम टप्प्याच्या सुरुवातीला हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते लाला मुन्शीराम अर्थात स्वामी श्रद्धानंद !
● ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेल्या रौलट अ‍ॅक्ट कायद्याच्या विरोधात दिल्लीत निघालेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व करणारे क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी !

● दिल्लीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारे एकमेव वीर संन्यासी !
● मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणारे हिंदू महासभाई !

● जवळपास ५ लक्ष धर्मांतरित रजपुतांना शुद्ध करून धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी कार्य करणारे हिंदू धर्माभिमानी !
Read 10 tweets
21 Dec 20
आज स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ७० वर्षे उलटूनही हिंदुस्तानात अशी हजारो गाव-खेडी आहेत जिथे वीज उपलब्ध नाही.. लाखो लोकांना अंधारातच राहावे लागते. आजही देशात अनेक खेड्या पाड्यात १२ ते १८ तास लोड शेडिंग केले जाते. अश्या वेळेस लाल माकडांचे अंधानुकरण करणारी आणि -
त्या लाल रंगाची लागण झाल्याने स्वतःला गोरी समजणारी आपल्याच देशातली लाखो काळी-सावळी माकडं नाताळाच्या दिवसात घरा-घरात छोट्या छोट्या नकली प्लास्टिकच्या झाडांमध्ये रोषणाई करून वीज वाया घालवतील.. मोठ-मोठ्या मॉल्स मध्ये अवाढव्य, मोठमोठे ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.
दुकानाच्या डिस्प्ले विंडोमध्ये ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.

हिंदू सणांच्या वेळेस आवर्जून गळा काढणाऱ्या अनेक समाजसेवी संस्थापैकी दुर्दैवाने कोणतीच समाजसेवी संघटना विजेचा हा अपव्यय रोखण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही..
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!