क्रिया तशी प्रतिक्रिया..!
#बोधकथा

एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे Image
मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .
पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली
मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ"?तेंव्हा सखाराम म्हणतो काही नको , हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणी मी ही आपणास मदत केली.
तुम्हीही अशीच मदत करा हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान वाटले आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन निघून गेली. एव्हाना खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती.
तिने एका रेस्टोरंट जवळ जेवण्यासाठी कार थांबविली आणि रेस्टोरंट मध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होतो. ती स्त्रि आता जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टोरंट मधील शो पीस , सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या
वेटरकडे पाहू लागली . तेवढयात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले.ती हसतमुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्रिने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी.
हिला सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने तिच्या पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रि ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून
पाहिले तर त्यात एक चिठठी व काही नोटा होत्या तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते तु खूप उत्साही आहेस गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते .तुला खर तर आराम करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस . मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी
तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क दहा हजार रुपये निघाले.एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रिला धन्यवाद दिले.
तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होतो. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची काळजी नका करू आज मला एका स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला दोघांनाही खूप आनंद झाला.
तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो सखाराम...
ह्यालाच म्हणतात 'क्रिया तशी प्रतिक्रिया' मित्रांनो नैसर्गिक न्याय तत्व असतेच आपण जे इतरांना दयाल तेच आपल्याला परत मिळते. आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्या ला दुःख आणि त्रासच मिळणार.
आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही आनंद आणि सुख मिळणारा आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार. कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करुया...
आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ.... सुख , आनंद, मदत दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा हेच तर आहे नैसर्गिक न्याय तत्व अर्थातच
#क्रिया_तशी_प्रतिक्रिया'

@TSYIngle
@nav_me21
@sujitgr8
@Mrutyyunjay
@MarathiDeadpool
@AMINHudda2
@Rmjs444

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas Patil

vikas Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @vikaspatil198

17 Feb
परी..!!

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले, "आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी तुम्हाला काय वाटतं ?"

त्यावर पती म्हणाला "जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला Image
, पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला, पोहायला शिकविन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन"

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला "आणि मुलगी झाली तर?"

यावर पतीने खूप छान उत्तर दिले, "जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही"
पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले "का असे का?"

पती म्हणाला " मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. Image
Read 9 tweets
16 Feb
म्हणुनच संसार देखणा होतो..!!

स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगी सारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
@TSYIngle
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्वीकार , अनुकंपा ,क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी
Read 5 tweets
11 Dec 20
वाचा आणि विचार करा...
Cp
बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी ,
अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात .
आणि ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सागते.
he u man,don't capture, I am not culture
(लेण्याकडे बोट दाखवत )
this is culture, u take their photos
Read 8 tweets
9 Dec 20
आज देशात सर्वत्र अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी देशाला ५ ट्रिलियन इकॉनॉमी बनविण्याच्या घोषणा करताहेत, तर दुसरीकडे अनेक अर्थविषयक संस्था मंदीची चिन्हे असल्याचे सांगताहेत. यातील सत्य काहीही असले तरी, जर आपल्याला अर्थव्यवस्थेची घडी नीट करायची असेल
तर देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या उदरनिर्वाहेचे साधन असलेल्या कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आज शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येची ढासळती आर्थिक स्थिती आणि सर्वांना परवडण्याजोग्या सकस अन्नाची उपलब्धता हे देशापुढील मोठे आव्हान आहे.
मात्र, आजच्या घडीला कृषी हेच असे एकमेव आर्थिक क्षेत्र आहे, ज्यात ‘बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे हात व्यवस्थेने बांधून ठेवले आहेत. ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या कृषी क्षेत्राविषयीचे अनेक कायदे उत्पादकांच्या हिताच्या विरोधात आहेत.
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!