एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले, "आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी तुम्हाला काय वाटतं ?"
त्यावर पती म्हणाला "जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला
, पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला, पोहायला शिकविन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन"
हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला "आणि मुलगी झाली तर?"
यावर पतीने खूप छान उत्तर दिले, "जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही"
पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले "का असे का?"
पती म्हणाला " मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.
थोडक्यात जणू ती माझी दुसरी आई होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल."
पति पुढे म्हणाला " तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या
वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बहुलीच आहे. माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल. मला त्रास देणाऱ्या कोणाही व्यक्तीला ती कधीच माफ करणार नाही."
यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल, आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही "
यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला, " अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं
शिकावं लागेल, मुलींचं तसं नाही, मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा, आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल"
निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली "पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?"
यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला
"हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्या सोबत नसेल , पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही कारण ती आपल्या सोबत नसली तरी, आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू, तिच्या हृदयात !, तिच्या मनात, कायमचे!! अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.
कारण मुली ह्या परी सारख्या असतात, त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !!!"
"खरोखर मुली ह्या परी सारख्या असतात!!"
वॉट्सपवर फिरत असलेली #पोस्ट
एका इंग्रजी लेखाचा भावानुवाद. @TSYIngle@nav_me21@Mrutyyunjay@Rmjs444
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगी सारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री .. @TSYIngle
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्वीकार , अनुकंपा ,क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी
एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे
मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .
पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली
वाचा आणि विचार करा...
Cp
बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी ,
अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात .
आणि ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सागते.
he u man,don't capture, I am not culture
(लेण्याकडे बोट दाखवत )
this is culture, u take their photos
आज देशात सर्वत्र अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी देशाला ५ ट्रिलियन इकॉनॉमी बनविण्याच्या घोषणा करताहेत, तर दुसरीकडे अनेक अर्थविषयक संस्था मंदीची चिन्हे असल्याचे सांगताहेत. यातील सत्य काहीही असले तरी, जर आपल्याला अर्थव्यवस्थेची घडी नीट करायची असेल
तर देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या उदरनिर्वाहेचे साधन असलेल्या कृषीक्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आज शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येची ढासळती आर्थिक स्थिती आणि सर्वांना परवडण्याजोग्या सकस अन्नाची उपलब्धता हे देशापुढील मोठे आव्हान आहे.
मात्र, आजच्या घडीला कृषी हेच असे एकमेव आर्थिक क्षेत्र आहे, ज्यात ‘बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे हात व्यवस्थेने बांधून ठेवले आहेत. ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या कृषी क्षेत्राविषयीचे अनेक कायदे उत्पादकांच्या हिताच्या विरोधात आहेत.