नुकतेच तिच्या पतीचे निधन झालेले. कालच तेरावा पार पडला. तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली. शिक्षण जास्त नाही. पण दिसायला देखणी म्हणून एकविसाव्या वर्षी मागणी घालून लग्न झाले. आता पुढे काय असा विचार करुन डोके फुटायची वेळ आली होती. @DrSanjayRakibe @Rohini_indo_aus
चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले. अंघोळ करुन बारीक काळी टिकली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाकघरात आली. सासूबाई भाजी निवडत होत्या. "इकडे ये बाळ" अशी हाक ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली. हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली "जे झालं ते झालं.
आता सगळे विसरायचा प्रयत्न कर. सगळ्यात आधी गळ्यात मंगळसूत्र घाल. पूर्वीसारखी टिकली लाव. जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही. तुला हवं असेल तर पुढे शीक. बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून मुलींना सांभाळू. तुला नोकरी करावीशी वाटली तर जरुर कर. देवदयेने आपल्याला काहीही कमी नाही.
तुझ्या कोणत्याही निर्णयाच्या आम्ही आड येणार नाही. तुला पुनर्विवाह करायचा असला तरीही आमची आडकाठी नाही. तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. एक लक्षात ठेव घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यात पहिला मान तुझा. आता आमच्या तीन मुली आहेत असे आम्ही समजतो."
डोळे भरुन वाहताना तिचे लक्ष देव्हा-याकडे गेले. कुलदेवीची मूर्ती जास्तच तेजस्वी वाटली तिला आणि तिच्या डोळ्यांत तिला आपल्या लहानपणी गेलेल्या आईच्या डोळ्यांचा भास झाला.
अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या छोट्या राष्ट्राने देखील आपली प्रगती साधली ती आपल्या मातृभाषेतूनच. कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही.
आपल्या देशाचा आणि आपला व्यक्तिगत विकास आपणांस साधावयाचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजेत व या मातृभाषेतील थोर ठेवा जपला पाहिजे, वाढविला पाहिजे.
ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते म्हणूनच त्यांनी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प सोडला.
नाथांना मातृभाषेचे हे ऋण मान्य होते. म्हणून तर त्यांनी समाजाचा विरोध सहन करूनही मातृभाषेतच रचना करण्याचा आग्रह धरला.मातृभाषेतून आपले रोखठोक विचार व्यक्त करताना तुकाराममहाराजांना शब्दांची कधीच उणीव भासली नाही आणि लोकानुनय साधण्यासाठी समर्थांना मातृभाषाच उपयोगी पडली.
वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात,
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?"
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये."
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर.?" @TSYIngle@Mrutyyunjay @rt_marathi
मुलगा : "वीस रुपये".
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल,
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल."
वडील : आता मी अनमोल अशा जवाहिरांनी
हा पेला भरतोय."
मुलगा : "आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याहीपलीकडे होईल."
वडील : "बघ हं. नक्की ना.?" असे विचारतात,
आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात.
काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात.
वडील : "आता याचे किती रुपये येतील.?"
एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले, "आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी तुम्हाला काय वाटतं ?"
त्यावर पती म्हणाला "जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला
, पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला, पोहायला शिकविन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन"
हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला "आणि मुलगी झाली तर?"
यावर पतीने खूप छान उत्तर दिले, "जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही"
पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले "का असे का?"
पती म्हणाला " मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.
स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगी सारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री .. @TSYIngle
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्वीकार , अनुकंपा ,क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी
एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे
मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत नाही. बराच वेळ जातो आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढयात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम घाबरते .
पण सखाराम म्हणतो घाबरू नका ताई मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरूस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते.ती स्त्रि सखाराम ला खूप खूप धन्यवाद देते आणि सखाराम ला म्हणते "तुम्ही माझी खूप मोठी अडचण सोडविली