ब्राह्मण मराठा वाद लावणे म्हणजे, केसरकांती हिंदूंअवकाशातील 'ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज' या दोन सूर्यांमधे राहूकेतूंची सावली आणण्याचा प्रयत्न करणे!
अशी ग्रहणं लावणारे कित्येक आले आणि गेले.!
पण या तेजाने ही भूमी अशीच उजळत राहिली!

कुणाची भीती घालता रे? कुणात भांडण लावता?
आमच्यात?
दादा, आपल्याच समाजातील शिर्के, खोपडे, मोरे असे चांगले कुलवंत मराठा गडी छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या मुळावर उठले होते हे लक्षात ठेवा..
फितुरी करण्यात, भांडणतंटे करण्यात, बादशहाला जाऊन मिळण्यात कोण पुढे होते त्याचा अभ्यास करा.. भवानीमूर्ती फोडायला खानाला गाभारा दाखवणारा मंबाजी भोसले-
हा अफझल्याचा निष्ठावान सरदार असेल किंवा राजांवर विषप्रयोग करणारा जावळीचा चंद्रू मोरे असेल..
पण तुम्ही उल्लेख कुणाचा करता? अनाजी आणि भास्कर?
महाराजांच्या गादिशी गद्दारी करणारे किती कुलवंत मराठा दाखवू? पवार, गायकवाड, शिर्के घराणी स्वायत्त झाली पण नानासाहेब पेशवा म्हटला आम्ही मात्र-
-आम्ही मात्र शिवाजीराजांचेच निष्ठावंत शिष्य! राजांचं स्वराज्य सांभाळणारी जात ही, आणि तुम्ही तिलाच द्रोही म्हणता? किती नीच व्हाल अजून?
होळकर,पवार,गायकवाड वगैरे सरदारांपेक्षा कितीतरी श्रीमंत आणि बलशाली असे पेशवे! पण शेवट पर्यंत पेशवेच राहिले, राजे झाले नाहीत. याला निष्ठा म्हणतात.
हीच वृत्ती ओळखून राजांनी यांनाच पेशवेपद दिलं. प्रथम पेशवा देशस्थ ब्राह्मण - मोरोपंत पिंगळे आणि नंतर कोकणस्थ - बाळाजी विश्वनाथ आणि वंश!

राजांनी यांची योग्यता ओळखली, तुम्ही कधी ओळखणार?
महाराजांनी अष्टप्रधान मंडळात विद्वान ब्राह्मण नियुक्त करून स्वराज्याची भरभराट केलेली कधी दिसणार?
तुम्हाला एक कुलकर्णी - अनाजी एवढी उदाहरणं सोडली तर बाकी पुढे जाता येत नाही.. काढायची म्हटली तर आपल्याच बाकीच्या समाजातील शंभर उदाहरणे मिळतील..
समाजाचे चांगले लोक होते तशाच भंगार अवलादीही झाल्या आहेत ज्यांनी राजांना विरोध केलेला..
आणि तुम्ही त्या निष्ठावान जातीला शिव्या घालता?
उगाच फालतूहिंदुधर्मविरोधीनालायक लोकांच्या नादी लागून आपल्याच बांधवांवर चिखलफेक करू नका रे दादांनो.
तुल्यबळ पुण्याई असलेल्या या दोन्ही जाती! यांच्यात फुट नको🙏🙏
या वादळातत हिंदुत्वाची ज्योत आपल्याला जपायची आहे.. एक होण्याचे प्रयत्न करा, एकाच जातीला टार्गेट नका रे करू..🙏
श्रीराम!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रतीक पुष्कराज 🚩🚩

प्रतीक पुष्कराज 🚩🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PraPuDeshmukh

26 Feb
सावरकर आम्हाला का पूज्य आहेत?

त्यांच्याइतकं नेमकं, bull's eye vision ज्याला म्हणतात तितकं थेट समीक्षण दुसर्‍या कुणाचंही नाही.

ते,
हिंदुत्ववादी, पण सनातनी नाहीत
कविह्रदयी, पण कल्पनाविलासी नाहीत
राजनीतिज्ञ, पण राजकारणी नाहीत

त्यांची एकूणएक कृती तार्किक असण्याचं हेच खरं कारण.
हा तोल कसा सावरला?
किती अवघड आहे हे?

पूर्ण हिंदुत्वाकडे जायचं, मात्र एका कलाकडे झुकत बाजू घ्यायची नाही.
आणि पूर्णतः धर्म नाकारून एककल्ली शुष्कही व्हायचं नाही.
फार अवघड सुवर्णमध्य.

जो धर्मावर कठोर भूमिका घेईल आणि
हिंदुस्थान हिंदूंचाच आहे हेही छातीठोकपणे सांगेल.. एकाचवेळी..!
पण याचा दुहेरी फटका त्यांना बसला!

सर्वधर्मसमभावाच्याखालून स्वार्थ साधणारे तथाकथित secular पक्ष त्यांच्यापासून दूर गेले. कारण सावरकरांनी हिंदुत्व पुरस्कृत केलं.

आणि हिंदुत्ववादी म्हणवणारी सनातनी मंडळी त्यांच्यापासून दूर गेली.. कारण त्यांनी हिंदुत्वाला पारखून घ्यायला सांगितलं..
Read 9 tweets
25 Feb
पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..

स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.

जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..

इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!

पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा
Read 6 tweets
19 Jan
थंडीत स्वतःची बसलेली जागा आपल्याला सोडवत नाही..
पण आजच्याच दिवशी हजारो निरपराध लोकांना आपली राहती जागाच काय, घरंदारं, संपत्ती, कपडेलत्ते, अन्नधान्य सारं सारं सोडून पळून जावं लागलं होतं..
स्वताच्याच घरातून..

भर जानेवारीच्या बर्फाळ थंडीत, प्रतिकार करू पाहणाऱ्यांचं रक्त वहावलं होतं
दोष इतकाच, की हल्लेखोरांच्या देवापेक्षा यांचा देव वेगळा होता!
अडीचशेवर्षांपूर्वी जे संपूर्ण भारतभर खुलेआम घडत होतं त्याची झलक 98साली काश्मिरात दाखवली गेली होती!
पण अर्थात,
अकबर-औरंग्यासारख्या क्रूरकर्म्यांच्या कारकीर्दीतही जो निद्राभंग झाला नाही त्या हिंदूना आताही जाग आली नाहीच!
त्यामुळे फार फार मजेशीर गोष्ट घडली..
त्या दुर्दैवी हिंदूंच्या बलिदानाची क्रूर थट्टा झाली..

कुणालाही ते बलिदान लक्षात राहीलं नाही की कुणी त्यांना श्रध्दांजली वाहिली नाही.. प्रतिशोधवगैरे लांबच्या गोष्टी.

निदान, अंगावर काटा येणार्‍या त्या घटनेने आपल्या झोपेची कूस तरी बदलू🙏
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!