नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
करतीलच,
नेहरूंचा मोठेपणा केवळ कारागृहात व्यतित कालावधीवरून ठरणारा कधीच नव्हता व नाहीसुद्धा!वास्तविक नेहरूनी स्वत:ला भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस वा मागणी केंव्हाही केलेली नाही.या शिफारसीची कोणत्याही दस्ताऐवजात, कोणाच्या पत्रात,डायरीत अथवा अगदी कोणाच्या आठवणीतही याची नोंद नाही
कारण नेहरूंच्या नावाची अशी कोणती शिफारसच अस्तित्वात नाही, कारण ती कोणीच केलेली नव्हती!
जवाहरलाल नेहरूंना भारतरत्न देण्याचे घोषित झाल्यावर नेहरूंचे त्याकाळातील सर्वात मोठे राजकीय टिकाकार राम मनोहर लोहीया, जयप्रकाश नारायण, ई.एम.एस. नंबुद्रीपाद , एन.सी.चटर्जी यांनीही त्याविरोधात
आवाज उठवलेला दिसून येत नाही. अगदी तत्कालीन हिंदुत्ववादी नेते जे कोणी त्यावेळी विविध राजकीय घडामोडीवर लेख लिहीत असत, त्यांनी पण नेहरूंना स्वत:चा स्वत:ला भारतरत्न सन्मान दिला वा घेतला, असा आरोप करून एखादा लेख लिहून वा एखादे पत्रक काढून निषेध केल्याचे आढळून येत नाही!
नेहरूंना भारतरत्न सन्मान का दिला गेला किंवा नेहरू भारतरत्न होऊच शकत नाहीत अशी वृत्ती बाळगणा-यांच्या मनात नेहरूंबद्दल फक्त द्वेष आहे. नेहरूंंना भारतरत्न म्ह्णून गौरविल्याबद्दल आज टिका करणा-यांच्या सर्व वैचारिक पित्यांचे तोंडं त्यावेळी बंद होते.सुर्य मावळल्यानंतरच जसं कोल्हेकुंईला
उधान येतं, तसं नेहरू वारल्यानंतरच्या काळात कांही असामाजीक तत्वांनी नेहरूविरोधी प्रचार-प्रसाराची मोहिम हाती घेतली.
भारतरत्न हा सन्मान जानेवारी 1954 पासून सुरू करण्यात आला व नियमाप्रमाणे नेहरूंच्या शिफारशीनुसार पहिल्या वर्षी हा सन्मान सी.राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व
सी.व्ही.रमण यांना दिला गेला. हा सन्मान प्रदान करण्याची सुरूवात झाली तेंव्हा हा सन्मान मरणोत्तरांत दिला जात नव्हता. तो प्रथम मरणोपरांत दिला गेला 1966 साली शास्त्रीजींना! त्यानंतर हा सन्मान मरणोत्तर देण्यास सुरूवात झाली. नेहरूंना 15 जुलै 1955 रोजी भारतरत्न हा सन्मान तत्कालीन
राष्ट्रपतीनी प्रदान केला,त्या वर्षी म्हणजेच 1955 साली या सन्मानासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून केवळ सर मोक्षगुंडम विश्वेस्वरैया आणि भगवान दास या दोन नावाची शिफारस केली गेली होती.या दोन्ही महान व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला!नेहरूंच्या नावाची मात्र शिफारसच नव्हती!
नेहरूंना भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला तेंव्हा ते युरोप तथा रशियाच्या दौ-यावर होते. नेहरू 15 ते 25 एप्रिल 1955 या कालावधीत आफ्रो-एशियन परीषदेत बांडूग येथे होते त्यानंतर तर ते 'लाईट ऑफ एशिया' म्हणून जगात ओळखले जाऊ लागले होते. तत्पुर्वी रशियाच्या दौ-यावर
असताना मॉस्को विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ' ही सन्मान्य पदवी प्रदान केली होती! विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमात, नेहरूंना भारतरत्न प्रदान करण्यात आला तो कार्यक्रम नेहरूंचा स्वागत समारंभच होता. या वेळी केलेल्या भाषणात डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणतात ....
“We have assembled this evening to express our joy at the safe return of our Prime Minister, Jawaharlal Nehru, from a strenuous tour in different countries of Europe…”
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांनी नेहरूंच्या नावाची या सन्मानासाठी कोणीही शिफारस केलेली नसताना,
स्वत:हून हा सन्मान नेहरूंना देण्याचे ठरवले! हा सन्मान देताना डॉ.राजेंद्र प्रसाद काय म्हणतात ते खूप स्वंयस्पष्ट आणि महत्वाचे आहे
"In doing so… for once, I may be said to be acting unconstitutionally , as I am taking this step on my own initiative and without any recommendation or
advice from my Prime Minister; but I know that my action will be endorsed most enthusiastically"
पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना भारतरत्न प्रदान करायला हवा, ही सर्वौच्च संवैधानिक अधिकार असणा-या राष्ट्रपतींची ईच्छा होती म्हणजेच भारताचे
प्रथम नागरिक तथा जनतेच्या सर्वाेच्च प्रतिनिधीची ईच्छा होती. एका अर्थाने ती समस्त भारतीय जनतेची ईच्छा होती आणि नेहरूंनी या इच्छेचा आदर पुर्वक स्विकार केला!
आश्चर्याची बाब अशी की, नेहरूंचे व राजेंद्रप्रसाद यांचे अनेक मुद्दयांवर वैचारिक मतभेद होते. राष्ट्रपतीपदी प्रसादांच्या ऐवजी
सी.राजगोपालचारी असावे असे जवाहरलाल नेहरू म्हणाले होते,मात्र पुन्हा नेहरूंनीच राजेंद्रप्रसादाच्या राष्ट्रपतीपदाचे सुचक म्हणून स्वाक्षरी केली होती!पण सर्व हे माहीत असूनही नेहरूंवर डॉ.प्रसादांचे अत्यंत प्रेम होते!हिंदु कोड बील आणि सोरटी सोमनाथ जिर्णौद्धार याबद्दल दोघात मतभिन्नता हो
खरे तर डॉ. राजेंद्र प्रसाद हिंदु कोड बीलाचे विरोधक होते व नेहरूंनी हेच बील 1954 ते 1956 या काळात चार स्वतंत्र कायद्याच्या स्वरूपात मंजूर करण्याची प्रक्रिया पुर्ण केली.या अशा अनेक मतभेदाच्या बाबी असतानाही त्यांना जेंव्हा राष्ट्रपतीपदावरून पंतप्रधानांच्या शिफारसीशिवाय कांही निर्णय
घ्यावा व स्वविवेक वापरून भारतरत्न कोणाला तरी प्रदान करावा असे वाटले तेंव्हा, त्यांच्या मनात असलेले भारतीय रत्न जवाहरलाल नेहरू हे होते!
सामान्यपणे भारतरत्न किंवा इतर पुरस्कार देताना हा पुरस्कार वा सन्मान ज्यास दिला जातो, त्याचा परीचय आणि सन्मान का दिला जातो आहे याची माहीती
सांगीतली जाते, परंतु नेहरूंना पुरस्कार देताना केवळ नाव उच्चारले गेले, ना परीचय करून दिला गेला ना योगदान सांगीतले गेले. जणू हे काम नियतीने सभागृहातील टाळ्यांच्या गजराकडे सोपवले होते!
By Raj Kulkarni
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या
"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"
- सोनिया गांधी
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या
दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही
आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही
आंबेडकरांचे हे भाषण आजच्या स्थितीला अत्यंत चपखल लागु पडतंय.
लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा
नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश
महासागरात उसळतंय स्वत:च्या
धुंदीतलं एक गर्विष्ठ जहाज....
त्याच्या टोकावर सुरक्षित पट्टे बांधून
उभा आहे एक
जहाजाहून अधिक गर्विष्ठ फिडलर...
ज्याला वाटतंय,
त्याच्या हातांच्या लयकारीनेच
समुद्र नाचतोय
त्याला हवा तसा !
ज्याला वाटतंय,
सारा महासागर अंथरलाय
आपल्याच बापानं केवळ
आपल्या जहाजासाठी...
ज्याला वाटतंय,
आपलं या टोकावरील
उभं राहून फिडल वाजवत राहणं
हेच या संस्कृतीचे संचित.
ज्याला वाटतंय,
आपल्या साध्या शिंकेलाही
तळातले करोडो मूर्ख दगड
देवू लागले आहेत
टेन कमान्डमेन्ट्सचा दर्जा..
ज्याला वाटतंय,
आपल्याच लयीच्या भारामुळे
जहाज होत राहतंय वरखाली.
झुलत राहतंय
आपल्याला हवं तसं.
ज्याला वाटतंय,
प्रत्येक तयार होणाऱ्या लाटा
निर्माण करीत आहोत आपण
केवळ काही हातवाऱ्यांतून,
पोषाखातून,
स्वत:लाही न आकळलेल्या भाष्यातून.
आणि
जहाजाच्या काठावर सभोवताल
उभीआहेत या फिडलरच्या
सगळ्या समजुतींना
तितक्याच कर्कश्श सुरात
समूह साथ द्यायला
बराक ओबामा यांनी डॉ.सिंग, सोनिया आणि राहुल गांधी यांच्याबद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं त्याचा मराठी अनुवाद 👇
मेजवानी दरम्यान सोनियांबद्दलचं एक निरिक्षण म्हणजे त्यांचा बोलण्याऐवजी ऐकण्यावर अधिक भर होता. धोरणात्मक गोष्टींमध्ये मनमोहन सिंगांपासुन फारकत घेत त्या अधुन मधुन संभाषण
मुलाकडे नेत होत्या.त्या सगळ्यामधुन मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची ताकद ही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा आविष्कार होती.आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला.तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच मधुन मधुन माझ्या 2008
च्या प्रचारयंत्रणेच्या तपशिलांबद्दही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला... म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.