टीव्हीवरील धार्मिक मालिका चवीनं बघणाऱ्या प्रत्येकासाठी…
झी मराठीवर एका नव्या मालिकेची जाहिरात बघितली "घेतला वसा टाकू नको" 1/n
प्रत्येक सणामागच्या आख्यायिकांवर आधारित असणाऱ्या या मालिकेतील "पाडवा" या सणावरच्या एपिसोडचे ट्रेलर चालू झाले आणि त्यामध्ये हळूच "जय श्री राम" ची राजकीय घोषणा घुसडल्याचं निदर्शनास आलं
लहानपणापासून घरोघरी साजरा होणाऱ्या पाडव्यादिवशी आयुष्यभर कधीही, कोणीही "जय श्री राम" नावाची 2/n
राजकीय आरोळी ठोकल्याचं आमच्या अजिबात ऐकिवात नाही !
मग अचानक ही टूम कोणी आणि का उठवली?
प्रत्येक सणाची आख्यायिका आणि त्याचा धागा पकडून, "घेतला वसा टाकू नको" सारखं इमोशनल वाक्य फेकून लोकांना मनोरंजनाच्या माध्यमांतून सत्यापासून कोसो दूर घेऊन जाणारी यंत्रणा ‘१९२५ ते आजतागायत’ 3/n
अखंड कार्यरत आहे !
माणसाच्या भाबड्या श्रद्धेचा आधार घेऊन त्याला हळूहळू धर्मांधतेकडं घेऊन जाणं ही ‘त्यांच्या’ अनेक क्लूप्त्यांपैकी एक.
संस्कृतीच्या ‘गप्पा’ मारणाऱ्यांना हे आपल्याला कधीच माहिती करून द्यायचं नसतं की भारतातल्या जवळपास सगळ्या सणांची व्युत्पत्ती ही शेती आणि शेतकरी
4/n
या दोनच गोष्टींशी संबंधित आहे ! त्यामुळेच या मालिकेतल्या "पाडव्याच्या" जाहिरातीत हळूच "जय श्री राम" चा राजकीय नारा घुसवून अतिशय बेमालूमपणे आपला कार्यभाग उरकला जातो, मग हे पिल्लू आमच्या संस्कृतीमध्ये हळूच कोण आणि कशासाठी सोडतंय?
5/n
पाडव्याची मूळ संकल्पना शकांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीकरूप असून शकाची कालगणना इ स ७८ ला सुरु होते जी महाभारतानंतर (जर महाभारताचा कालखंड इ पू २००० वर्षांचा मानला तर) २०७८ वर्षांनी चालू झाले म्हणजेच रामायणानंतर (जर रामायणाचा कालखंड इ पू ४००० वर्षांचा मानला तर) ४०७८
6/n
वर्षांनी चालू झाले.
शालिवाहन शकाचे वर्ष या दिवशीच चालू होते.
तसेच रामायण किंवा महाभारत यापैकी कशातही गुढी पाडव्याचा उल्लेख आढळत नाही.
चैत्रामध्ये गुढीपाडव्याच्या दरम्यान शेतीची धान्यउत्पादनाची सर्व कामे संपलेली असतात, शेतकऱ्याला एक निवांतपणा मिळालेला असतो.
7/n
कार्तिक महिन्यामध्ये थांबलेला पाऊस चैत्र वैशाखामध्ये अवकाळी स्वरूपात येत असतो, पुन्हा शेतीची नांगरट, कुळवट, शिवाराची बांधबंदिस्ती, डागडुजीची कामे सुरु होणार असतात, याच महिन्यात जनावरांनाही विश्रांती मिळत असते, सगळी पिके हातात आलेली असतात, या घरात आलेल्या धनधान्यांच्या
8/n
समृद्धीचा उत्सव म्हणजे गुढी पाडवा !
वसंत ऋतूला घरामध्ये धनधान्य आलेलं असतं आणि समाधानी शेतकरी येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करतो तो सण म्हणजे पाडवा !
शेती-शेतकरी आणि सणांची घट्ट वीण बघायचीच झाल्यास काही सणांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल..
9/n
दसरा हा सृजनशील शेतीचे प्रतीक आहे. दसऱ्याला घटाच्या भोवती आपण धनधान्य टाकतो आणि ते उगवतं, हेच सृजनशील शेतीचे प्रतीक !
दसऱ्याच्या आधी ९ दिवस घटस्थापना केली जाते, हा घट शेतातून आणलेल्या काळ्या मातीमध्ये रोवून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य टाकले जाते, 10/n
९ दिवसांमध्ये त्याला अत्यंत तरतरीत कोंभ येतात, हेच कोंभ सृजनाचे व नवनिर्मितीचे प्रतीक मानले जाते व ते शेतीचे प्रतीक रूप ‘तुरे’ दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट उठवताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पोरं ‘गांधी टोपीत’ खोवून राजमुकुटातील तुऱ्यासारखे कौतुकाने मिरवतात ! 11/n
कार्तिक मास उगवला की आपल्याकडे खेड्यापाड्यांमध्ये यात्रा चालू होतात कारण या वेळी शेतकऱ्याला थोडा निवांतपणा आलेला असतो.
दिवाळीला जोंधळ्याची ताटं आणून लावली जातात. दिवाळसणात "बलिप्रतिपदा" तर बळीराजाचाच उत्सव ! या दिवशी तर खेडोपाडी वयोवृद्ध माता बळीराजाच्या शेणाच्या प्रतिकृती 12/n
बनवून त्याची पूजा करतात !!
ज्या ज्या वेळी शेतकऱ्याला शेतीतून विसावा मिळतो त्यावेळीच हे सण साजरे केले जातात. अगदी आषाढी एकादशीही पेरणी संपल्यावरच चालू होते, पेरणीनंतरच्या मिळालेल्या वेळेतच शेतकरी पंढरीच्या वारीला निघतो. 13/n
पण अशा मालिका किंवा सिनेमांच्या माध्यमातून अनेक अख्यायिका ऐकवून ऐकवून या अस्सल गोष्टींपासून आपली नाळ आपल्या नकळत सहजगत्या तोडली जाते.
साधारणतः १०-१५ वर्षांपूर्वी अशाच एका टीव्हीवरील कार्यक्रमात एका प्रसिद्ध सूत्रसंचालकाने बळीराजाचा उल्लेख "दुष्ट बळीराजा" असा केला.
14/n
घरी अनेकदा आज्जीच्या तोंडून "ईडा पीडा टळू दे, बळीचं राज येऊ दे" हे वाक्य ऐकल्याने आज्जीच्या प्रार्थनेतला "बळी" अचानक "दुष्ट" कसा काय झाला याचंच कोडं पडलं
ज्या बळीच्या आगमनाचा आशावाद खेडोपाडच्या शेतकरी कुटुंबातील माता भगिनी हजारो वर्षांपासून जिवंत ठेवतात त्या बळीला
15/n
एका टीव्ही चॅनेल वरील कार्यक्रमात उघड उघड 'दुष्ट' संबोधलं जाणं हे पचायला जड जात होतं.
प्रश्नांची सरबत्ती चालू झाली, उत्तरं मिळत गेली
बळी हा एक असा अत्यंत लोकप्रिय असा शेती करणारा शेतकरी राजा होता ज्यानं शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं हित नेहमी जपलं.
16/n
त्याच्या आज्ञेनुसार शेतकऱ्याच्या शेतात पिकलेल्या धान्यांपैकी थोडा हिस्सा बळीराजाच्या विभागप्रमुखाकडे देण्यात येत असे आणि शेतकरी तो हिस्सा आनंदाने देई, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नसे. आता हा विभागप्रमुख म्हणजेच "सुभा प्रमुख", म्हणजेच "महासुभा" ज्याचा अपभ्रंश
17/n
होऊन "म्हसोबा" (महा-सुभा) तयार झाला !
आजही शेतांच्या बांधांवर अनेक ठिकाणी म्हसोबाची मंदिरे किंवा दगडाला शेंदूर फासून म्हसोबा नामक देव शेतकऱ्यांकडून अत्यंत आत्मीयतेने तयार करून बांधावरच पुजला जातो.
कसा असेल तो राजा ज्याच्या "वसुली अधिकाऱ्यालाही" शेतकरी देवाचा दर्जा देतात? 18/n
या "म्हसोबा" प्रमाणेच खेडोपाडी पुजले जाणारे आपली अनेक कुलदैवतं म्हणजेच खंडोबा, जोतिबा, नाईकबा, बिरोबा यांसारखे अनेक डोंगरवासी देव हे बळीराजाचे अनेक विभागप्रमुखच !
बळीराजाचा फसवून खून झाल्यानंतर शेतकरी बंधू-माता-भगिनींना त्याच्या धोरणांची कमतरता जाणवू लागल्याने 19/n
त्यांनी "ईडा पीडा टळू दे, बळीचं राज येऊ दे" ही प्रार्थना वजा इच्छा बोलून दाखवायला सुरु केली. हजारो वर्षांपासून अजूनही खेडोपाडच्या माता भगिनी या वाक्यातून बळीराजाच्या पुनरागमनाचा ज्यावेळी आशावाद व्यक्त करतात त्यावेळी हेच सिद्ध होतं की
20/n
शेतकऱ्यांची बळीराजाशी जुळलेली ही नाळ काळालाही तोडता आलेली नाही !
शेतकरी हा बळीराजाप्रमाणेच दानशूर असतो, त्यागी असतो, त्याच्या घरातून कोणीही विन्मुख जात नाही, म्हणून शेतकरी हाच "बळीराजा" !
21/n
आज सत्ताधाऱ्यांकडून या बळीराजाच्या भावी पिढीला निरक्षर आणि द्वेषपूर्ण विचारांचा डोस देऊन नासवण्याची धोरणे राजरोस आखली जात आहेत. याच विषारी धोरणांचा आपल्या घरामध्ये शिरकाव हळुवारपणे धार्मिक मालिकांमधूल होत असतो आणि आपल्या मनःपटलावर हळुवारपणे आकारही घेत असतो !
22/n
शेती आणि मातीशी अस्सल इमान राखणाऱ्या मायबाप शेतकरी बळीराजाने व त्याच्या येणाऱ्या पिढ्यांनी या #सायलेंट_पॉइझन पासून अत्यंत सावध राहण्याची वेळ आता आली आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही !
23/23
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
If you are thinking (like me in the past) that Mr. @ShekharGupta is a very knowledgeable and a neutral personality then this thread is just for you…
So, get ready to be surprised 1/n
This guy works so hard to contextualize the hegemony of this government (working so hard cherry picking favourable data points, which is not an easy job!)
I seriously believe (with evidence) that Shekhar Gupta is a more precious asset than even the likes of Arnab or
2/n
even Suresh Chavanke (loose canons, who don't have any sane audiences' trust anymore)
What makes Shekhar Gupta so distinctly lethal is the fact that he cherry picks objective data to contextualize, justify & normalize every Modi-Made Disaster.
3/n
कॉ गोविंद पानसरेंच्या "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचा उल्लेख केला की पोरांना इमोशनल करायला काही दांभिक माणसं शिवरायांचा एकेरी उल्लेख, आदर वगैरेसारख्या पाणचट गप्पा मारतात !
ही तीच लोकं असतात जी पानसरेंचा खून "त्या" एकेरी उल्लेखातून झाला अशी अफवा उठवून 1/n
मूळ कारस्थानी "सनातन संस्थेला" वाचवायचा केविलवाणा प्रयत्न करतात
अशाच काही दांभिक लोकांनी एकदा शिवाजी विद्यापीठाचं नावही बदलायची टूम उठवली
या भामटेपणाचा समाचार घ्यायला आम्ही "शिवाजी विद्यापीठ - एक दर्जेदार नाव" हा ब्लॉग लिहिला होता (लिंक miyodha.blogspot.com/2019/12/blog-p… ) 2/n
त्यातला काही भाग आणि आणखी काही उदाहरणे आज आपल्यापुढं मांडतोय...
आपल्या भगिनी हादग्यामध्ये गाणी म्हणतात - "शिवाजी अमुचा राजा, त्याचा तो तोरण किल्ला..."
अनेक वर्षांपासून आपण घोषणा देतोय - "...जय शिवाजी"
3/n
"शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव व वजन-मापं यावर नियंत्रण ठेवणारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची शासन निर्मित संस्था"!
शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापारी,खरीददार व राज्य शासन या सर्वांचा मेळ घालून मार्केट कमिट्या चालतात 2/n
यामध्ये मुख्यत्वे २ प्रकारचे व्यापारी असतात : आडते आणि खरीददार
बाजार समित्यांचे लायसन्स असणारे अनेक आडते असतात ज्यांच्याकडे प्रतिनिधी म्हणून शेतकरी आपला शेतमाल लावतो. कोणत्या अडत्याकडे आपला माल द्यायचा हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून असते. 3/n
31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा, 1/n
थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत भक्तिभावाने अनेक हिंदू बांधव त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटो फ्रेम बनवून घेऊ लागलेत
रज्जाक यांनी त्याक्षणी तीथूनपुढे आयुष्यभर शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला, 2/n
तेंव्हापासून तब्बल ३६ वर्षे कसल्याही मांसाहारी पदार्थाला त्यांनी चक्क साधा स्पर्शही केलेला नाही !
"माझ्या ग्राहकाच्या निगडित भावनांचा आदर एक व्यावसायिक म्हणून मी करायलाच हवा".. केवढा मोठा विचार ! केवढा मोठा त्याग !
3/n