📍 ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून #ThanksDrAmbedkar#JaiBhim
तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.
तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.
१] " अॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात
आलेले आहे. त्यातल्या काहींवर तर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे. या आपल्याच बांधवांना जनावरासारखे वागवताना हिंदुंना त्याची लाजसुद्धा वाटत नाही. असे उदाहरण जगात दुसरे सापडणार नाही. कोट्यावधी आदिवासींना शिक्षण, आरोग्य, आधुनिक रोजगार, इतर नागरी सुविधांपासून वंचित ठेवणारी ही
जातीव्यवस्था भयंकर आहे. कसल्या संस्कृतीच्या आणि उच्चत्वाच्या गप्पा मारतात हे वैदीक लोक? या फक्त बढाया आहेत. यांना थोडीजरी लाजशरम असेल तर या बांधवांना ते जवळ करतील. लाजिरवाण्या मागास अवस्थेतून त्यांना बाहेर काढून सन्मानजनक जीवन मिळावे यासाठी झटतील. त्यांच्यात जाऊन राहा. त्यांना
आपले म्हणून स्विकारा. ही आपुलकीची भावनाच त्यांना मागासपणातून, रानटी आयुष्यातून बाहेर काढायला उपयोगी पडेल. पण जातीग्रस्त हिंदू तसे करीत नाहीत. प्रत्येक उच्चजातीय हिंदू माणूस आपली जात जपण्यासाठी राबणारा चिंतातूर जंतुच बनलेला असतो. या पतित मानव्याबद्दल वैदीकांना ना शरम ना लाज.
वैदीकांची मानसिकता अत्यंत गलिच्छ आहे. देशबांधवांप्रती कर्तव्यभावना नसलेले हे निर्लज्ज वैदीक.
उद्या जर अहिंदूंनी, ख्रिश्चन मिशनर्यांनी त्यांना जवळ केले, त्यांच्यात सुधारणा घडवल्या, धर्मांतर करवले तर अहिंदुंच्या संख्येत मोठी भर पडेल आणि याची संपुर्ण जबाबदारी वैदीक आणि त्यांची
घृणास्पद जातीव्यवस्था यावर असेल."
२] आदिवासी बांधवांच्या दु:खावर प्रकाश टाकणारा बाबासाहेबांचा हा मजकूर इतका बोलका आहे की त्यावर कोणतेही अधिक भाष्य करायची गरजच नाही. मला सांगा, आदिवासी भावंडांबद्द्ल कळवळा असल्याशिवाय असे घनाघाती आणि वैदीकांच्या थोबाडीत चपराक मारणारे लेखन शक्य
आहे काय? लक्षात ठेवा हे लेखन ८४ वर्षांपुर्वीचे आहे. तोपर्यंत एकाही हिंदूने वा वैदीकाने आदिवासींबद्दल असे लेखन केलेले नव्हते. म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. बुद्धीभेद करणारे हे **वे दुसरे काय करु शकतात?
३] १९२७ साली बाबासाहेब मुंबई प्रांताचे आमदार झाले. त्यांनी ताबडतोब
अनु. जाती, अनु. जमाती व ओबीसी यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सरकारला कमिशन नेमायला लावले. स्वत: गावोगाव फिरून,पाड्या - झोपड्यांवर जाऊन सर्व्हेक्षण केले. तीन वर्षे [१९२८ ते १९३०] धांडोळा घेऊन या ओ. बी. एच. स्टार्ट कमिशनचा रिपोर्ट बाबासाहेबांनी तयार केला. त्यात आदिवासी
बांधवांना घटनात्मक संरक्षण आणि शिक्षण, आरोग्य, रोजगाराची व्यवस्था व नागरी सुविधा-सवलती सरकारने द्याव्यात अशी मागणी पहिल्यांदा केली. ती शिफारस ब्रिटीश सरकारला मान्य करायला लावली.
४] त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात [मुंबई प्रांत] प्रथमच समाज कल्याण बोर्ड व स्वतंत्र समाज कल्याण खाते
सुरू झाले. आदिवासींसाठी वसतीगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्त्या सुरू झाल्या. आज जे पहिल्या-दुसर्या पिढीतले आदिवासी नेते दिसताहेत हे त्यातनं तयार झालेले आहेत. आणि म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. कृतघ्न वैदीक.
५] १९३५ च्या इंडीया अॅक्टमध्ये आदिवासींना फारसे हक्क दिले गेले नाहीत.
पण हा कायदा बाबासाहेबांनी तयार केलेला नाही. तो ब्रिटीशांनी केला. त्यावेळी ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व होते, ते त्यात
कमी पडले. मग पावती बाबासाहेबांच्या नावावर का फाडताय?
६] राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी देशातील आदिवासींसाठी सर्वाधिक घटनात्मक संरक्षण पुरवले जाईल अश्या तरतुदी
केल्या. भारतीय संविधानाचे कलम १३ ते ५१ आणि कलम ३३० ते ३४२ व ३७१ बघा म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.
७] शैक्षणिक आरक्षण, सरकारी नोकर्यातील राखीव जागा, ग्रामपंचायत ते संसदेतले आरक्षण, ट्रायबल एरियासाठी स्वतंत्र तरतुदी, बजेटमध्ये राखीव निधी, आदिवासी संस्कृतीचा अभ्यास
📍 स्त्रीयांचे पुनरूत्थान :- समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या मनात स्त्रियांबाबत असलेला आदर स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांचे कार्य, #ThanksDrAmbedkar#JaiBhim
त्यांची चळवळ, दलितांना मिळवून दिलेले हक्क अधिकार याबाबत नेहमी बोलले जाते.हिंदू कोडबिलाच्या संबंधात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांतील
निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. हिंदू संहितेला मी हे महत्त्व देतो.
हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाकरिता व स्त्रियांची विविध प्रकारच्या शोषणातून सुटका व्हावी यासाठी हिंदू कोड बिल,
एप्रिल महिन्याला Dalit history month म्हणणं म्हणजे ही बाबासाहेब दलित उद्धारक होतेची sophisticated line आहे. हा सवर्णवादी खोडसाळपणा थांबणारा नाहीच. गांधी, नेहरु ज्या महिन्यात जन्माला आले तो महिना काही बनिया, किंवा सारस्वत ब्राह्मण history month बनत नाही मग एप्रिल कसा काय
dalit history month बनतो ? ज्याला दलितत्व मान्य नव्हतं, ज्या विरुद्ध ज्याचं बंड होतं त्यांना परत त्याच संज्ञा संकल्पनेत बंदिस्त करायचं ? बाबासाहेबाचं कार्य राष्ट्रीय व मानवतावादी कार्य होतं, त्यांची ध्येय धोरणं वैश्विक, सर्वव्यापी असताना, तसं त्याचं योगदान असताना, दलित महिना
साजरा करनं ब्रामणी मानसिकतेचं नीच लक्षण आहे. बाबासाहेबांचे कार्यव्यापकता लक्षात घेता हा एप्रिल महिना dalit history month ऐवजी... month of fight for equality, month of social revolution, month of human rights, month of fight against discrimination, etc असे कितीतरी साजेसे संकल्पना
📍 पाणी ऊर्जा धोरण आणि नियोजन :-एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. #ThanksDrAmbedkar @MyselfViraj
१७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते
. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.
दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद
📍स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली.या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग #ThanksDrAmbedkar
कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने
घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा- आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार,