📍 पाणी ऊर्जा धोरण आणि नियोजन :-एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. #ThanksDrAmbedkar @MyselfViraj
१७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते
. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.
दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद
असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, हुशारी व कामाचा उरक पाहून त्यांच्यावरच या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी कोळसा खाणी, मुद्रण व लेखन सामग्री, लष्कर व मुलकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, लष्कर भरती, गृहबांधणी व सार्वजनिक बांधकाम अशी
अनेक खाती सांभाळीत होते. डॉ. आंबेडकर यांना सुद्धा दामोदर खोरे योजना हा कल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास जावा असे वाटू लागले. त्यांनी अमेरिकेतील टेनेसी नदीचा अभ्यास केला. टेनेसी खोऱ्याच्या योजनेचे अनेक अहवाल मागवून घेतले व स्वतः अभ्यास केला. नोकरशहांवर अवलंबून राहिले नाहीत.
त्याचप्रमाणे भारतातील म्हैसूर येथील तुंगभद्रा व पंजाब मधील छोट्या मोठ्या धरणांचा सुद्धा अभ्यास केला.
त्याचवेळी मजूर खात्याच्या अंतर्गत सेंट्रल पॉवर बोर्ड नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. स्वतः आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. नद्या, धरणे अणि विद्युत प्रकल्प हे सर्व या खात्याकडे
सोपविण्यात आले. सुमारे तीस महिने दामोदर नदीच्या धरण प्रकल्पावर राजकीय विचार मंथन करण्यात आले. शेवटी आंबेडकरांच्या खंबीर धोरणामुळे राजकीय निर्णय घेण्यात येऊन दामोदर प्रकल्प डॉ. आंबेडकरांनी कार्यान्वित केला. सदर योजना राबविण्याकरिता अनुभवी आणि हुशार तंत्रज्ञ हवा होता. त्यासाठी हे
काम इजिप्तमधील आस्वान धरणावर काम करणाऱ्या प्रमुख ब्रिटिश इंजिनीयरला द्यावे असे इंग्रज सरकारचे मत होते. परंतु आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तीर्ण अशा नद्या नाहीत आणि तेथील इंजिनीअरनां अशा मोठ्या नद्यांवर धरणे बांधण्याचा अनुभव नाही असे ठणकावून सांगितले. त्यापेक्षा
अमेरिकन तंत्रज्ञ उपयुक्त आहेत असे आपले म्हणणे त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्य करण्यास भाग पाडले. यावरून तांत्रिकदृष्टया सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सक्षम असल्याचे ब्रिटिशांना कळून चुकले.अमेरिकन तंत्रज्ञांचे काम संपल्यानंतर सेंट्रल वॉटर इरिगेशन नेव्हिगेशन कमिशनचे काम बघण्याकरिता
लायक भारतीय तंत्रज्ञ नेमणे आवश्यक होते. आणि आंबेडकरांना यासाठी केवळ भारतीय माणूसच हवा होता. त्यावेळी पंजाबमध्ये मुख्य अभियंता पदावर ए.एन.खोसला होते. त्यांच्या नावाची शिफारस झाली. परंतू त्यांचे डॉ.आंबेडकरांबद्दल मत कलुषित होते. त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या हाताखाली काम करण्यास प्रथम
नकार दिला. परंतु डॉ.आंबेडकरांनी त्यांना भेटीस बोलावून स्पष्ट सांगितले की एखादा इंग्रजी किंवा अमेरिकन इंजिनिअर नेमणे मला कठीण नाही. परंतु मला भारतीय तंत्रज्ञ हवा आहे. आंबेडकरांचे हे खडे बोल ऐकून मुख्य अभियंता खोसला यांचे डोळे उघडले आणि त्यांनी ते पद तात्काळ स्वीकारले.
दामोदर व्हॅली योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून कार्यान्वित केली. त्याच बरोबर भाक्रा नानगल धरण, सोन रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकुड धरण यांची मुहूर्तमेढ रोवली. पुढे स्वातंत्र्यानंतर व देशाचे विभाजन झाल्यानंतर काकासाहेब गाडगीळ यांच्या कारकिर्दीत दामोदर प्रकल्प
पूर्ण झाला. अमेरिकेत अनेक प्रादेशिक योजनांचा पाया जॉर्ज डब्ल्यू नॉरीस यांनी १९२२ पूर्वी घातला, तेव्हा तेथील जनतेने त्यांच्या स्मरणार्थ एका धरणाला त्यांचे नाव दिले. मात्र दामोदर योजना राबविण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी ज्या खस्ता खाल्ल्या, तांत्रिक अभ्यास केला, जीवाचे रान करून बिहार,
ओरिसा व बंगाल प्रांताला नवजीवन दिले त्याची आठवण म्हणून त्या प्रकल्पास त्यांचे नाव देखील दिले गेले नाही. DVC च्या वेब साईटवर त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञता सुद्धा दिसून येत नाही, म्हणूनच याबद्दल तीव्र खंत आणि खेद वाटतो. #JaiBhim#AmbedkarJayanti#जयभीम@Prksh_Ambedkar@name_is_surya
📍 ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून #ThanksDrAmbedkar#JaiBhim
तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.
तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.
१] " अॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात
📍 स्त्रीयांचे पुनरूत्थान :- समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या मनात स्त्रियांबाबत असलेला आदर स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांचे कार्य, #ThanksDrAmbedkar#JaiBhim
त्यांची चळवळ, दलितांना मिळवून दिलेले हक्क अधिकार याबाबत नेहमी बोलले जाते.हिंदू कोडबिलाच्या संबंधात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांतील
निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. हिंदू संहितेला मी हे महत्त्व देतो.
हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाकरिता व स्त्रियांची विविध प्रकारच्या शोषणातून सुटका व्हावी यासाठी हिंदू कोड बिल,
एप्रिल महिन्याला Dalit history month म्हणणं म्हणजे ही बाबासाहेब दलित उद्धारक होतेची sophisticated line आहे. हा सवर्णवादी खोडसाळपणा थांबणारा नाहीच. गांधी, नेहरु ज्या महिन्यात जन्माला आले तो महिना काही बनिया, किंवा सारस्वत ब्राह्मण history month बनत नाही मग एप्रिल कसा काय
dalit history month बनतो ? ज्याला दलितत्व मान्य नव्हतं, ज्या विरुद्ध ज्याचं बंड होतं त्यांना परत त्याच संज्ञा संकल्पनेत बंदिस्त करायचं ? बाबासाहेबाचं कार्य राष्ट्रीय व मानवतावादी कार्य होतं, त्यांची ध्येय धोरणं वैश्विक, सर्वव्यापी असताना, तसं त्याचं योगदान असताना, दलित महिना
साजरा करनं ब्रामणी मानसिकतेचं नीच लक्षण आहे. बाबासाहेबांचे कार्यव्यापकता लक्षात घेता हा एप्रिल महिना dalit history month ऐवजी... month of fight for equality, month of social revolution, month of human rights, month of fight against discrimination, etc असे कितीतरी साजेसे संकल्पना
📍स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली.या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग #ThanksDrAmbedkar
कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने
घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा- आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार,