📍स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली.या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग #ThanksDrAmbedkar
कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने
घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा- आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार,
जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा ‘स्वतंत्र मजूर पक्ष' १९३६ साली स्थापन केला
ब्रिटिश संसदेने १९३५ साली भारतासाठी पारित केलेल्या कायद्याने भारतीयांना विधीमंडळावर मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले. त्यानुसार १९३७ साली निवडणूका होणार असल्याने, त्यासाठी तत्कालीन सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत होते. या निवडणुकीत भाग घेण्यासाठी
अस्पृश्यांच्या राजकीय पक्षाची आवश्यकता होती. तसेच काँग्रेस पक्षाने अनेकदा अधिवेशनांमधून समाजसुधारणा घडवून आणण्याविषयी अनेक ठराव केले होते; परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच म. गांधीच्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांना १९३२ साली .
विरोध केला होता. त्यामुळे, अस्पृश्यांसाठी वेगळा पक्ष स्थापन करणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक वाटत होते. म. गांधींनी, असहकार सत्याग्रह, सविनय कायदेभंग, बहिष्कार, खादीचा पुरस्कार यामार्फत काँग्रेस पक्षाला सामान्य जनतेपर्यंत पोहचविले होते. बाकी पक्ष त्या तुलनेत अत्यंत कमकुवत ते
होते. अशाप्रसंगी काँग्रेसला विरोध करायला दुसरा पक्ष अस्तित्वात आला नाही तर, देशात काँग्रेसची एकपक्षीय हुकूमशाही प्रस्थापित होईल.असे होऊ नये यासाठी काँग्रेसला प्रतिस्पर्धी एखादा प्रभावी पक्ष निर्माण व्हावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते.१७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणूक
घेण्यात आली. ही निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची मानली होती. या वेळी मजूर पक्षाने १५ उमेदवार उभे केले होते. व दोन उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: मुंबईमधून उभे होते. पक्षाने उभे केलेल्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार व पाठिंब्याचे दोन असे १५ उमेदवार
विजयी झाले. या निवडणुकीत पक्षाला मिळालेले हे यश घवघवीत होते. १७ यावेळी निवडून आलेल्या काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांनी ब्रिटिश राज्याशी निष्ठेने वागण्याची शपत; भगवद्गीता हातात ठेवून घेतली आणि ते विधीमंडळातील खुच्र्यांवर जाऊन बसले; परंतु ‘विद्वान बुद्धिवादी व लोकशाहीनिष्ठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गीतेला हातात धरून शपत घेण्याचे नाकारले. कारण, त्यांना ज्या दलित श्रमिकांनी निवडून दिले होते त्यांच्याशी त्यांना प्रामाणिक व एकनिष्ठेने राहायचे होते. ‘गीते'सारख्या भोंगळ ग्रंथाला हातात धरून शपत ग्रहण करणे म्हणजे लोकशाहीवरील निष्ठा धुळीस मिळविणे व लोकांना
बेईमान होणे होय.' असे त्यांचे म्हणने होते. म्हणून त्यांनी गीता हातात न घेताच शपतविधी उरकला व विधिमंडळात विरोधीगटात जाऊन बसले.स्वतंत्र मजूर पक्षाने १९३७ ते १९३९ या दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. या पक्षाच्या प्रतिनिधींनी विधिमंडळात अनेक विधेयके मांडली. अनेक विधेयकांवर प्रभावीपणे
मते मांडली. सर्वांनी विधीमंडळ कामकाजात भाग घेतला. त्यामुळे सरकार पक्षाला खरी भिती स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधींची वाटत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दलित, शोषित, कष्टकरी समाजाला एका निश्चित मार्गावर आणून सोडले. त्यांना अनेक निष्ठावान कार्यकर्ते
मिळाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या निष्ठा समर्पित करून एकाच ध्येयाने व त्यागाने आंबेडकरी आंदोलनाची ताकद उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येने दलित, कष्टकरी समाजाने उपस्थिती दर्शविली. कोणत्याही तथाकथित भारतीय नेत्याला मिळाले नसतील तेवढे हात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. त्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षासारखा सुसंघटित व नियमबद्ध असा एकही पक्ष नव्हता. हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष असा होता, की जो संपूर्ण समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सारखा धडपडत होता. या पक्षाची स्थापना वर्गीय जाणिवेतून झाली असल्याने
सर्व कष्टक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक समजले होते. तो दलित असो, श्रमिक असो, शेतमजूर असो अथवा लहान शेतकरी असो. या वर्गाच्या हितासाठी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी या पक्षाचा लढा होता. म्हणूनच हा पक्ष अल्पावधितच मुंबई प्रांतातील शहरांपासून ते खेड्यांमधील कामगार
शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत जाऊन पोहचला.१५ सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर १९३८ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक
दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला.
स्वतंत्र मजूर पक्ष हा अस्पृश्यांचा पहिला राजकीय पक्ष होता. यात सर्व अस्पृश्य, शेतकरी, शेतमजूर व कामगार सामील होणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. “पूर्वाश्रमीच्या महार समाजाने या पक्षाला सहकार्य केले त्याप्रमाणे अस्पृश्यांमधील चांभार
व मातंग, या समाजाने फारसे सहकार्य केले नाही. आणि विविध जातिधर्मातील शेतकरी-शेतमजूर व कामगारवर्ग जातीच्या व धर्माच्या नावाखाली विभागला गेल्यामुळे या सर्वांचे फारसे सहकार्य लाभले नाही.त्यामुळे हा पक्ष शक्तीशाली होऊ शकला नाही. तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे भारतातील इतर सर्व
📍 ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून #ThanksDrAmbedkar#JaiBhim
तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.
तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.
१] " अॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात
📍 स्त्रीयांचे पुनरूत्थान :- समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या मनात स्त्रियांबाबत असलेला आदर स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांचे कार्य, #ThanksDrAmbedkar#JaiBhim
त्यांची चळवळ, दलितांना मिळवून दिलेले हक्क अधिकार याबाबत नेहमी बोलले जाते.हिंदू कोडबिलाच्या संबंधात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांतील
निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. हिंदू संहितेला मी हे महत्त्व देतो.
हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाकरिता व स्त्रियांची विविध प्रकारच्या शोषणातून सुटका व्हावी यासाठी हिंदू कोड बिल,
एप्रिल महिन्याला Dalit history month म्हणणं म्हणजे ही बाबासाहेब दलित उद्धारक होतेची sophisticated line आहे. हा सवर्णवादी खोडसाळपणा थांबणारा नाहीच. गांधी, नेहरु ज्या महिन्यात जन्माला आले तो महिना काही बनिया, किंवा सारस्वत ब्राह्मण history month बनत नाही मग एप्रिल कसा काय
dalit history month बनतो ? ज्याला दलितत्व मान्य नव्हतं, ज्या विरुद्ध ज्याचं बंड होतं त्यांना परत त्याच संज्ञा संकल्पनेत बंदिस्त करायचं ? बाबासाहेबाचं कार्य राष्ट्रीय व मानवतावादी कार्य होतं, त्यांची ध्येय धोरणं वैश्विक, सर्वव्यापी असताना, तसं त्याचं योगदान असताना, दलित महिना
साजरा करनं ब्रामणी मानसिकतेचं नीच लक्षण आहे. बाबासाहेबांचे कार्यव्यापकता लक्षात घेता हा एप्रिल महिना dalit history month ऐवजी... month of fight for equality, month of social revolution, month of human rights, month of fight against discrimination, etc असे कितीतरी साजेसे संकल्पना
📍 पाणी ऊर्जा धोरण आणि नियोजन :-एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. #ThanksDrAmbedkar @MyselfViraj
१७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते
. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.
दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद